कधी विचार केला आहे का? या पांढर्या पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ?
आपण रोजचं रस्त्यावरून चालतो, गाडी चालवितो पण कधी असा विचार करतो का की रस्त्यावर जे पांढरे आणि पिवळी पट्टे असतात त्याचा अर्थ काय? कधी कधी हे पट्टे सरळ एका रेषेत असतात तर कधी तुटक तुटक रेषा मारलेल्या असतात. कधी कधी तर दोन रेषा असतात कधी तर पांढर्या किंवा पिवळ्या रेषा असतात? कधी असा विचार केला नसेल तर आज आपण या लेखात याची सविस्तर माहिती घेऊया. ती वाचा आणि त्या बाबतीतले सर्व नियम तपासून घ्या.
रस्त्यावर वाहन चालविताना वाहनचालक व पादचाऱ्यांना मार्गदर्शन आणि माहिती देण्यासाठी रस्त्याच्या पृष्ठभागावर काही चिन्ह पक्क्या रस्त्यांवर वापरली जातात. या चिन्हांचा इतिहास काय आहे त्याची माहिती घेऊ.

वाहतुकीच्या चिन्हांचा इतिहास :-
सन १५०० पूर्वी लिओनार्द द व्हीन्सी यांनी वाहतूक नियंत्रणाच्या तीव्र प्रश्नांवर वाहनांची व पादचार्यांची वाहतूक ही वेगवेगळी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग बांधण्याचा उपाय सुचविला होता. परंतु विसाव्या शतकापूर्वी रेल्वे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही मार्ग व्यवस्था उपलब्ध नव्हती.
सतराव्या शतकात तर युरोपातील शहरांमध्ये वाहनांच्या गर्दीचा प्रश्न इतका तीव्र बनला की, काही विशिष्ट रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली व एकमार्गी वाहतूक प्रस्थापित करणारे वटहुकूम जारी करण्यात आले. रेल्वेच्या आरंभामुळे वाढत्या वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न तात्पुरता संपला पण रेल्वेच्या शेवटच्या स्थानकाबाहेर मात्र गर्दी वाढली. गाड्यांच्या वेगात तसेच घोडगाडी यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एका नवीन परिस्थितीला सामोरे जावे लागले. विसाव्या शतकात तर नागरी उद्योगप्रधान समाजाची वाहतूक ही एक वैशिष्ट्यपूर्ण समस्याच बनली. साधारण १९४५ पासून अनेक देशांतील रस्त्यांची एकूण लांबी, मोटारगाड्यांची नोंदणी, वाहनांनी प्रवास केलेले अंतर व परवानाधारक चालकांची संख्या यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावरून माणसे व माल यांच्या सुरक्षित व कार्यक्षम स्थलांतरासाठी वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्याची आवश्यकता अधिकच स्पष्ट झाली. शहरातील रस्त्यांच्या लांबीचे प्रमाण थोडेच असते पण त्यांवरील वाहतूक ही जवळ जवळ ५० टक्केपर्यंत असते व यामुळे नागरी क्षेत्रांतील वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जरूरी जास्त असते.
म्हणूनच काही चिन्हांचा वापर रस्त्याच्या पृष्ठभागावर करून वाहन चालक व पादचार्यांना आवश्यक सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे रहदारी कंट्रोल केली जाते. वाहन चालकांनी त्या रस्त्यावर वाहन कसे चालविले पाहिजे अशा सूचना त्यातून सूचित केल्या जातात. आणि नागरिकांनी त्याचे योग्य पालन करावे अशी आशा असते. त्यामुळे रोडवरील वाहनं कोणत्या गतीने चालवावे तसेच अपघात नियंत्रण ठेवण्यास या सूचनांचे पालन करणे हे सर्व नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.
आता आपण बघू नक्की काय असतो या पट्ट्यांचा अर्थ आणि वाहन चालक व पादचार्यांना त्यातून काय सूचित करायचे असते?
या रेषा किंवा ओळी या का आखलेल्या असतात? यांचा अर्थ आपल्याला समजला तर अपघात नियंत्रण शक्य होईल. आज आपण या पिवळ्या,पांढर्या आखलेल्या ओळीचा काय अर्थ आहे ते समजून घेऊ.
१. सरळ पांढरी रेषेचा अर्थ काय?
जर रस्त्यावर सरळ एखादी पांढरी रेषा आखली असेल तर त्या पांढर्या ओळीचा अर्थ असा असतो की, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओळीत किंवा त्याच एका ओळीत चालावे लागेल, ज्या ओळीत/लाईनीत तुम्ही आधीच आहात. ती लाईन कोणतेही इंडिकेटर न दाखवता क्रॉस केली तर अपघात होऊ शकतो. म्हणून ती लाईन क्रॉस करताना तुम्हाला ट्राफीक पोलिस अडवून फाईन करू शकतो. कारण तुम्ही ट्राफिक नियमांचे उल्लंघन केलेले असते.
२. रस्त्याच्या मधोमध तुटलेल्या रेषा :-
जेव्हा रस्त्यावरून जाताना तुम्हाला रस्त्याच्या मधोमध तुटलेली पांढरी रेषा आखलेली दिसली तर त्याचा नियम असा आहे की तुम्ही तेथून दुसर्या वाहनाला ओव्हरटेक करू शकता, पण जर लाइन तुटलेली नसेल किंवा ती सरळ रेषा असेल, तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही.
३. रस्त्याच्या मध्ये दोन पांढऱ्या रेषा:-
जर रस्त्याच्या मधोमध दोन पांढऱ्या रेषा आखलेल्या असतील तर तरी तुम्ही तिथे ओव्हरटेक करू शकत नाही. रस्त्याच्या मधोमध जिथे जिथे दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा एकत्र दिसतील तिथे तुम्हाला एकाच लाईनने गाडी चालवावी लागेल, तेथे चुकूनही ओव्हरटेक केले तर यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ शकते.
४. रस्त्यावर आखलेली पिवळी रेषा :-
जर रस्त्यावर मधोमध पांढऱ्या ऐवजी पिवळ्या रंगाची सिंगल लाईन असेल तर तुम्ही तिथे ती पिवळी रेषा ओलांडू शकत नाही. तुम्हाला तुमच्या रांगेत राहून तुमचे वाहन तुम्ही ओव्हरटेक करू शकता पण क्रॉस करू शकत नाही.
५. दोन पिवळ्या रेषा :-
रस्त्यावर जर दोन पिवळ्या रेषा असतील तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही किंवा एखाद्या गाडीच्या पुढे जाऊ शकत नाही. रस्त्याच्या कडेला पिवळी लाईन असल्यास तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकत नाही. अशा रस्त्यावर तुम्ही तुमची गाडी किंवा वाहन उभे केल्यास तुम्हाला दंड आकाराला जाईल किंवा चालान कापले जाऊ शकते.
कधी कधी रस्त्याच्या मधोमध तुटलेल्या लाईन बरोबर एक सरळ लाईन असते, याचा अर्थ असा की जिथे तुटलेली रेषा आहे तिथून तुम्ही ओव्हरटेक करू शकता आणि जिथे सरळ रेषा आहे त्या बाजूने ओव्हरटेक करू शकत नाही. अशी रेषा डोंगराळ भागातील रस्त्यावर पाहायला मिळतात.
मैत्रिणींनो तुम्हाला रोडवर पांढरे आणि पिवळे पट्टे का असतात याची माहिती कशी वाटली? तुम्हाला ही माहिती आवडली का? तर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.”
लेखिका : सपना कद्रेकर मुंबई
खूप छान माहिती आहे. गाडी चालवताना व पायी चालताना याचा खूप उपयोग होईल..
माहितीपूर्ण लेख आहे.
धन्यवाद
Good information