काय खास आहे साडेतीन मुहूर्तमध्ये सोने घेणे
फार पूर्वीपासून सोने व चांदीच्या खरेदीला विशेष पारंपरिक असे महत्त्व आहे. आपल्या देशात सोन्याच्या अलंकाराला मानाचे स्थान दिले गेले आहे. सोने आणि चांदी हे दोन्ही धातू ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी केली जाते आणि ती खरेदी जतनही केले जाते. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांवर सोने खरेदी करणे याला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे महत्त्व नेमकं काय आहे, त्या मागे काय इतिहास आहे? असे प्रश्न आपल्याला पडतात. तर आपण आज या इतिहासाची माहीत या लेखात घेणार आहोत.
साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
आपण आधी साडेतीन मुहूर्त कोणते आहेत त्याची माहिती घेऊ. चैत्र महिना हा मराठी पंचांगानुसार हिंदू धर्माची नवीन वर्षाची सुरुवात असते. चैत्र महिन्यापासून हिंदू पंचांग सुरू होते. तर चैत्र महिन्यातला शुध्द प्रतिपदा हा पहिला मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा, दूसरा अक्षय तृतीया आणि तिसरा विजयादशमी म्हणजेच दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा- कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आहेत. या दिवशी जर एखादे शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज असत नाही. या दिवशी आपण नवीन कार्याचा प्रारंभ, गृह, वाहन यांची खरेदी करू शकतो. तसेच या साडेतीन मुहूर्तात आपण सोने चांदी यांचीही खरेदी करतो. या दिवशी खरेदी केलेली संपत्ती ही अक्षय राहते किंवा वृद्धींगत होते असे मान्यता हिंदू धर्मात सांगितली जाते.
१. गुढीपाडवा:-
हिंदू धर्मात मुहूर्ताला खूप महत्व आहे. जर एखादे शुभ कार्य करायचे असेल म्हणजेच गृह खरेदी असेल, नवीन व्यवसायाची सुरुवात असेल तर आपल्याला चांगल्या मुहूर्ताची आवश्यकता असते. पण जर साडेतीन मुहूर्ता पैकी जर एखादा दिवस आपल्याला मुहूर्त म्हणून निश्चित करायचा असेल तर आपणा त्यादिवशी कोणत्याही वेळेत आपल्या शुभ कार्याची सुरुवात करू शकतो. या मुहूर्ताला “स्वयं सिद्ध मुहूर्त” असेही म्हटले जाते. आपल्या मराठी पंचांगानुसार चैत्र महिना हा आपला पहिला महीना म्हणजेच आपले नवीन वर्ष असते त्याला आपण गुढीपाडवा असे म्हणतो. गुढी पाडव्याला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते. याच दिवशी सोने खरेदी केले जाते. यादिवशी केलेली खरेदी ही आपल्या व्यवसायच्या दृष्टीने आणि आपल्या धनसंचायासाठी अक्षय/ वृद्धिंगत करणारी असते. या दिवशी गुंजभर सोने खरेदीही केलीच जाते.
२. अक्षयतृतीया:-
अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तामधील दूसरा मुहूर्त आहे. अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणारा म्हणजेच ज्याचा कधीही क्षय किंवा नाश होत नाही. यादिवशी सुरू केलेल्या कार्याला प्रचंड यश मिळते. यादिवशी नवीन कार्य सुरुवात, दानधर्म, नवीन वस्तूंची खरेदी तसेच सोने खरेदीसाठी हा एक चांगला मुहूर्त असतो. या दिवशी खरेदी केलेले सोने हे आपल्या धनसंचयामध्ये अक्षय राहते. आपल्या धनसंचयाची नेहमीच वृद्धी होते.
३. विजयादशमी:-
विजयादशमी म्हणजेच दसरा. दसरा हा सण सुद्धा साडेतीन मुहूर्तमधील एक मुहूर्त. आश्विन महिन्यातील नवरात्र पूजना नंतर दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. दसरा या सणाला एक पारंपरिक महत्व आहे. या दिवशी रामाने रावणासारख्या अहंकारी राक्षसाचा वध केला. तो दिवस आपण दसरा हा सण म्हणून साजरा करतो. या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रांची पूजाही केली जाते.
हा दिवस विजयाचा दिवस असून साडेतीन मुहूर्ता पैकी एक दिवस आहे. या दिवशी चांगल्या कार्यासाठी मुहूर्त बघितला जात नाही तसेच या दिवशी सोने खरेदी केले जाते.
४. बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा:-
बलिप्रतिपदा म्हणजेच कार्तिक शुध्द प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन मुहूर्तामधील अर्धा मुहूर्त असतो. हा दिवस ही नवीन कार्याच्या शुभारंभासाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी व्यावसायिक लोक आपल्या खात्याच्या वहीचे पूजन करतात. या दिवशी सोने खरेदीलाही प्राधान्य दिले जाते.
५. गुरुपूष्यमृत योग:-
ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात जातो त्या दिवशी गुरुपुष्य योग असतो. हा गुरुपूष्यमृत योग वर्षातून दोन ते चार वेळा येतो यामुळे याची खूप अपूर्वाइ असते. या दिवशी हमखास सोने खरेदी केली जाते तसेच या दिवशी केलेली सोन्याची खरेदी ही लाभदायक ठरते. म्हणून सोनाराच्या दुकानात या दिवशी खूप गर्दी असते.
भारतीय बाजारपेठेचा विषय जर अभ्यासला घेतला तर भारतातील माणसाचा सोने खरेदी वर खूप विश्वास आहे. सोने कितीही महाग झाले तरी या साडेतीन मुहूर्तावर भारतात सोने खरेदी केलीच जाते. सोने खरेदी ही शास्त्र म्हणून, रीत म्हणून किंवा पुढील भविष्याची गुंतवणूक म्हणूनही केली जाते. म्हणून या साडेतीन मुहूर्ताला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे.
मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहेच की सोने खरेदी करणे हा स्त्रियांचा वीक पॉइंट आहे. तुम्हाला ही सोने खरेदी करणे आवडतच असेल तर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. सोन्याचा दर एवढा चढा असतांनाही तुम्ही सोने खरेदी करता की नाही? तुम्हालाही माहिती कशी वाटली, ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आवडली का? तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.”
लेखिका : सपना कद्रेकर मुंबई
अप्रतिम,,,, खूपच छान माहिती