Shiv Jayanti 2024:छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक महान योद्धा, प्रतिभाशाली व्यक्तिमत्व, यशस्वी प्रशासक या अनेक परिचित नावांनी त्यांना ओळखले जाते. शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास कवी परमानंद यांनी रचलेला आहे हे चरित्र” श्री शिवभारत” यात समाविष्ट केलेले आहे. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात दोनदा भारताला भेट देणारा फ्रेंच प्रवासी ‘कॅरे’ याने आपल्या प्रवास वर्णनात शिवाजी महाराजांचे वर्णन” एक महान नायक” म्हणून केलेला आहे. 1699 मध्ये प्रकाशित झालेल्या या वर्णनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना” एक पूर्वेकडील सर्वात महान व्यक्ती” या शब्दांनी ओळख अधोरेखित केलेली आहे.
“प्रौढ प्रताप पुरंदर…..
क्षत्रिय कुलावंतस…..
सिंहासनाधीश्वर……
महाराजाधिराज….
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!!”
हे नाव घेताच डोळ्यासमोर आठवते ते म्हणजे धडधाकट शरीर, एक धैर्य मूर्ती, महान देशभक्त, बुद्धिमान, शूरवीर, कुशल प्रशासक श्री छत्रपती शिवाजी शहाजी भोसले हे त्यांचे पूर्ण नाव. एक धर्मनिष्ठ हिंदू राजे, सर्वसमावेशक, सहिष्णू राजे, उत्कृष्ट योद्धे, आदर्श व्यक्तिमत्व, आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक म्हणून मोठ्या दिमाखाने डोळ्यासमोर येतात.
शिवाजी महाराजांचा जन्म:
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाबाई यांच्या पोटी झाला. महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यामध्ये सेनापती होते. आई जिजाबाईंनी शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी राजांचे नाव ठेवले. त्यांचे बालपण हे आईच्या मार्गदर्शनाखाली गेले. आईने त्यांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण तसेच परकीय शक्तीवर सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते युद्धकलेचे प्रशिक्षण दिले.
तसेच दादोजी कोंडदेव यांनी देशप्रेम, कणखरपणा, स्वराज्याचे रक्षण करण्याचे धडे महाराजांकडून गिरविले. या लहान वयातच त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली आणि स्वराज्य स्थापनेची इच्छा त्यांनी व्यक्त केली. महाराजांचे बालपण शिवनेरी, माऊली आणि पुण्यातच गेले. महाराष्ट्र राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजाबाई यांच्याकडे सोपवून शहाजीराजे यांनी त्यांना पुण्याला पाठवले.
आईप्रमाणेच देशप्रेमाने कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय महाराजांमध्ये होते त्यामुळे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्यांना आईकडूनच मिळाली आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे म्हणजेच आपले स्वतःचे राज्य निर्माण करणे, त्या किल्ल्यांवर आपला ताबा असणे असे महाराजांना वाटत असे. म्हणून त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी मोहीम राबविल्या. त्यांच्या वयातील शूर तरुणांना गोळा करून किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली तोरणा महाराजांचा पहिला किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्या गुरूंकडून प्रेरणा घेऊनच कोणतेही महान कार्य करायचे. त्यात समर्थ रामदासांचे महत्त्वाचे योगदान आहे.
शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ:
फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. रायरेश्वर किल्ला याच घटनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट स्थापन केला ज्याला त्यांनी” मावळे” असे संबोधले. या मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले, धर्मप्रेम निर्माण करून स्वराज्याची संकल्पना शिकविली. आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 27 एप्रिल या दिवशी तानाजी मालुसरे, सूर्याची मालुसरे, येसाजी कंक, सोनोपंत डबीर, कान्होजी, बाजी पासलकर यांच्यासह रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपला जीव पणाला लावला आणि फक्त पन्नास वर्षाच्या कालावधीत विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकविले. याच रायरेश्वराच्या किल्ल्यावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली आणि हिंदू धर्माला आपला “जाणता राजा “मिळाला.
शिवाजी महाराजांचा विवाह:
सईबाई निंबाळकर यांच्याशी महाराजांचा पहिला विवाह 14 मे 1640 रोजी संपन्न झाला . त्यानंतर व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी त्यांनी आठ विवाह केले.सोयराबाई मोहिते, पुतळा बाई पालकर, सकवार गायकवाड, काशीबाई जाधव, सगुणा शिंदे, गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाले. सईबाई ना एक मुलगा संभाजी आणि सोयराबाईंना राजाराम हे अपत्य झाले.
स्वराज्याचे तोरण:
1647 मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा गड किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ केली हे स्वराज्याचे नवीन तोरणच ठरले. त्यांनी आपल्या मावळ्यांसह हरणाच्या वेगाने, आणि धडाडीने झपाझप तोरणा किल्ला सर केला. सगळ्या मोक्याच्या जागा मावळ्यांनी ताब्यात घेतल्या आणि तानाजी मालुसरे यांनी ऐन दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला आणि सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात नाद दुम दुमला. त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी पुरंदर, कोंढाणा हे किल्ले जिंकून आदिलशहाच्या प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. तोरणा गडा समोरील डोंगर जिंकून त्याचे नाव “राजगड “ठेवण्यात आले.
अफजलखानाचा वध:
1649 मध्ये आदिलशाही, निजामशाही यांनी हाहाकार माजवला होता आणि त्यांनी आपल्या सैनिकांना समज दिला शिवाजीला मारण्याचे धाडस कोण करेल. यापैकी अफजलखान समोर ठेवून त्याने शिवाजी महाराजांना संपवायचे धाडस दाखविले. ताबडतोब 10,000 सैन्य घेऊन अफजलखान विजापूर येथून चाल करण्यास सुरुवात केली, अनेकांचे बळी घेतले , मंदिरे उध्वस्त केली अशा प्रकारे तयारीनिशी प्रतापगडावर पोचला. महाराजांनी अंतिम बोलण्यासाठी स्वतः यावे हा त्याचा आग्रह होता.
शिवाजी महाराजांना त्याच्या दगाबाजी ची कल्पना आधीच आल्यामुळे अंगात त्यांनी चिलखत घातले, बिचवा ,वाघ नखे सोबत ठेवली आणि अफजलखानाच्या भेटीला निघाले. शिवाजी राजांना मारून टाकायचे या हेतूने अफजलखानाने भेटीचे निमंत्रण दिले होते. शिवाजी राजांसोबत त्यांचा विश्वासू सरदार” जीवा” आणि अफजलखान यांच्यासोबत “सय्यद बंडा” हे सरदार होतेच. जशी अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली तसेच शिवाजी महाराजांचे प्राण दाटून आले अफजलखानाने कट्यार छातीत घातली परंतु महाराजांनी चिलखत घातल्यामुळे ते बचावले. महाराजांनी वाघनखे अफजलखानाच्या पोटात खुपसली. आणि धाड धिप्पाड अफजलखान जमिनीवर कोसळला .महाराजांनी त्याचे अंतिम संस्कार इस्लाम धर्माप्रमाणे करून प्रतापगडावर एक कबर बांधली.Shiv Jayanti 2024
पन्हाळगड काबीज:
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाची गाथा गाजवत पन्हाळा किल्ला जिंकला .वाई ते पन्हाळा हा मोठा भाग मराठा सामावून घेण्यासाठी महाराजांनी फजल खान आणि विजापूर येथील रुस्तम- ए- जमान यांच्या साम्राज्यावर आगेकूच केली. महाराजांनी केवळ 5000 सैनिकांच्या सोबतीने 18 डिसेंबर 1659 रोजी या दोघांचा पराभव केला. यामुळे आदिलशाही सैन्य शिगेला पेटले. सिद्धी जोहरने महाराजांचा पराभव करण्यासाठी 20,000 घोडदळ, 40 हजार पायदळ तोफखाने दाखल केले. आणि मराठा साम्राज्यावर आगे कूच केली .2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहर ने पन्हाळगडाला वेढा घातला हा वेढा इतका गंभीर होता लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारूगोळा खरेदी करून सिद्धी जोहर ने पन्हाळगडावर गोळीबार सुरू केला. त्यावरही शिवाजी महाराजांनी पराक्रम दाखविला म्हणून संतापून आदिलशहाने शाहिस्तेखानाला 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ सैन्य पाठवून मराठा साम्राज्यावर आक्रमण केले.
एका बाजूला सिद्धी आणि दुसऱ्या बाजूला आदिलशहा यामुळे महाराजांचे स्वराज्य धोक्यात आले होते. कारण पुण्याचा लाल महालातच शाहिस्तेखानाने आपला तळ ठोकला होता. आता जिजाबाईंना शिवबाची फार काळजी वाटत होती कारण विजापूरच्या हल्ल्यावर त्यांच्या सैन्याने मराठा साम्राज्याचा पराभव केला. म्हणून जिजाबाईंनी स्वतः शस्त्र उचलून पन्हाळ्याचा गुंता सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराजांना एक युक्ती सुचली महाराजांनी एक पत्र सिद्धी जोहर यांना पाठवले त्यातली लेखी लिहिले की सर्व पैसे आणि किल्ले तुमच्या ताब्यात येणार आहेत या पत्रा त लिहिल्याप्रमाणे पत्र वाचून मोगलांना अतिशय आनंद झाला. या संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य पन्हाळगड सोडून विशाल गडावर निघाले.Shiv Jayanti 2024
पावनखिंड युद्ध:
सिद्धी जोहरच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज व त्यांचे सैन्य विशाल गडाकडे रवाना झाले त्यांचा पाठलाग करतच सिद्धी जोहरच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले तेव्हा शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना जाण्याची विनंती केली. बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली आणि शौर्याची सीमा गाठत सिद्धीच्या सैन्यांना रोखून ठेवण्यात आपल्या प्राणाची बाजी लावली. जेव्हा शिवाजी महाराज गडावर बसल्याचा संदेश त्यांना समजला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. अशा प्रकारे अनेक सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती देत मराठा साम्राज्याचे रक्षण केले याच घोडखिंडीचे नाव महाराजांनी” पावनखिंड” असे ठेवले.
आग्रा भेट:
1664 मध्ये औरंगजेबाचा खात्मा करण्यासाठी सुरत वर आक्रमण करून सैन्यावर वार केले मात्र यात महाराजांना हार पत्करावी लागली होती. त्यामुळे मिर्झाराजे यांना 23 किल्ले आणि 4 लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली होती याच तहानुसार औरंगजेबाने महाराजांना आग्रा भेटीसाठी बोलविले. ठरल्याप्रमाणे महाराज औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या म्हणजेच 9 मे 1666 या दिवशी त्यांच्या महालात पोहोचले सोबत शंभुराजे देखील होते. पण तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मुघलांच्या नजर कैदेत ठेवण्यात आले. महाराजांनी सुटकेचे अफाट प्रयत्न केले पण तेथून त्यांची सुटका अशक्यच होती. शेवटी शिवाजी महाराजांनी एक योजना आखून आपली आणि शंभुराजांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. 13 ऑगस्ट 1666 रोजी मिठाईच्या पेटीत बसून विजापूर मार्गे ते रायगडावर पोहोचले . बराच भाग या काळात त्यांनी मुघलांच्या ताब्यातून मिळविला. 1681 ते 1684 या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना रस्ता करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते सारे प्रयत्न असफल ठरले. यानंतर भारतात प्रथमच गनिमी युद्धाची सुरुवात झाली या या युद्धाचे पडसाद” शिवसूत्र” या रचनेत सापडतात.
शिवाजी महाराजांचा महाराजांचा राज्याभिषेक:
अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची सर्व मराठा साम्राज्य आतुरतेने वाट बघत होते ती म्हणजे 6 जून 1674 रोजी गंगा भट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास सुरुवात केली. सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या सोहळ्यास उपस्थित होती. महाराजांचा राज्याभिषेक करणे महत्त्वाचे होते कारण विजापूरचे काही बंडखोर मुले त्यांच्या निष्ठेची अपेक्षाभंग करत होते तशातच महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे, मराठा साम्राज्याच्या भविष्याची आणि सुरक्षिततेची हमे घेण्यासाठी महाराज राज्याभिषेक सोहळ्यास तयार झाले.
तत्कालीन जनता महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारा नेता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. राजा होण्यासाठी क्षत्रिय असणे अत्यावश्यक होते महाराज हे भोसले कुटुंबातील असल्यामुळे अशा कुटुंबातील कुणी राजा होणे शक्य नव्हते पण सर्व ब्राह्मणांचे आशीर्वाद आणि महाराजांची जनता राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना लाजवणारी होती. शेवटी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुलवंत म्हणून स्वीकार झाला.
भोसले कुळाने प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू रामचंद्राच्या शुद्ध क्षत्रिय वंशातील आपण आहोत हे सिद्ध केले .आणि गागाभट्ट यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा पदभार सांभाळला. महाराज केवळ शूरवीर आणि युद्धात निपून नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक होते. याच काळात शिवराई हे चलन उदयास आले. त्यांच्या साम्राज्यात काही अधिकारी आणि काही अंगरक्षक मुस्लिम समुदायाचे होते. स्त्रीचा त्यांनी कधी अनादर केला नाही आणि शत्रूंच्या स्त्रियांना देखील सन्मानाची वागणूक दिली छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यास 32 मन वजनाचेसिंहासन घडवण्यात आले यावर आपले ” जाणते राजे” विराजमान झाले. महाराज पुण्याचा कारभार सांभाळत असताना शहाजीराजांनी त्यांना एक स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली अति संस्कृत भाषेत होती.
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ:
6 जून 1674 ला रायगड येथे झालेल्या राज्याभिषेकाच्या वेळेस आपले प्रधानमंत्री नियुक्त केले त्यांची आठ खात्यात विभागणी केली आणि आठ खात्यांसाठी एक प्रमुख नियुक्त केला .त्यांना रोख स्वरूपात पगार देत असत. जहागिरी ,वतने, इनामे दिली जात नसे. गुण आणि कर्तृत्वाच्या जोरावर अष्टप्रधान मंडळातील मंडळींची नेमणूक केली होती.
1. प्रधान: यांचे कार्य म्हणजे राज्यकारभार चालविणे आणि जिंकून दिलेल्या प्रदेशांची व्यवस्था पाहणे. मोदक त्र्यंबक पिंगळे हे प्रधान मंडळ होते.
2. अमात्य: त्यांचे कार्य म्हणजे राज्याचा आर्थिक व्यवहार पाहणे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य म्हणून नेमले होते.
3. सचिव: महाराजांचा पत्रव्यवहार सांभाळणे, आणि परराज्यात मोहरांचा हिशोब ठेवणे हे सचिवाचे कार्य होते. अण्णाजी दत्तो यांना सचिवपदी नेमले होते.
4. वाकनीस( मंत्री): दैनंदिन कामांची नोंद करणे, गुप्तहेरांची माहिती करणे, दरबारी पाहुण्यांचे स्वागत करणे. ही सगळी कामे वाकनीस सांभाळीत असत. दत्ताची त्रिंबक हे वाकनीस पदी होते.
5. सेनापती: लष्कर भरती,आक्रमण, संरक्षण, लष्करी मोहिमा ही प्रमुख कामे सेनापतींची होती. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते.
6. सुमंत: परदेशी संबंध ठेवणे यांचे कार्य होते. रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत पदी होते.
7. न्यायाधीश: न्याय विषयक सारे कामकाज हे नीरज रावजी पहात असत.
8.पंडित राव( दानाध्यक्ष): हे धर्मविषयक कामगिरी पार पाडत असत या व्यतिरिक्त इतर मंत्र्यांना युद्धावर जावे लागे तेव्हा त्यांच्या कार्याची विभागणी करणे, चे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणे हे यांचे कार्य होते. मोरेश्वर पंडितराव हे या पद्धतीने नेमले गेले होते. या अष्टप्रधान मंडळाच्या सानिध्यात त्यांनी जवळपास सहा वर्षे राज्य केले.
शिवाजी महाराजांचा मृत्यु:
मार्च 1680 च्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराज यांना ताप आणि अमांश यांनी ग्रासले. तशातच त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठा साम्राज्याचे संस्थापक, एक उत्तम राजा, उत्तम शासन , एक महान रणनीतीकार योद्धा मराठाकालीन इतिहासात कायम अविस्मरणीय राहील.
याचप्रमाणे(Shiv Jayanti 2024) अनेक वैविध्य पूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या” लेखक मित्र” या संकेतस्थळाला लगेच भेट द्या. हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल अभिप्राय कळवा आणि watspp चॅनलला जॉईन करा.
धन्यवाद!!
लेखिका: शुभांगी चुनारकर, नागपुर.