शेअर मार्केटच्या या चढ -उतारात स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करायची आहे का ? त्या आधी जाणून घ्या स्मॉल कॅप म्हणजे काय ?
म्युचुअल फंड भाग 1 आणि 2 सविस्तर माहिती या मध्ये आपण स्मॉल कॅप , मिड कॅप , लार्ज कॅप या संकल्पना जाणून घेतल्या. यातल्या स्मॉल कॅप बद्दल गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काय नेमक्या गोष्टी आहेत ज्या मुळे स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक एवढी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अजूनही लोक यात पैसे गुंतवण्यासाठी उत्सुक आहे. या बद्दल सर्व माहीती आपण आजच्या या लेखामधून घेणार आहे. यात आपण स्मॉल कॅप , स्मॉल कॅप निर्देशांक यातील गुंतवणूक या सर्व मुद्द्यावर सविस्तर माहिती घेऊ.
- स्मॉल कॅप म्हणजे काय ? small cap in marathi
- शेअर मार्केट मध्ये असणार्या अशा कंपनी ज्याचे भांडवली मूल्य Rs. 5000 कोटी पेक्षा कमी आहे.
- या कंपनी मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार केला तर तुम्ही स्मॉल कॅप मध्ये तुमचे पैसे गुंतवले असे म्हणता येईल.
- स्टॉक मार्केट मध्ये स्मॉल कॅप निर्देशांक असतो. हा निर्देशांक स्मॉल कॅपचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणता येईल. या निर्देशांकामुळे स्मॉल कॅप मध्ये येणार्या कंपन्याची कामगिरी कळत असते .
- निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक : nifty small cap index in marathi
- शेअर मार्केट मध्ये ज्या 100 कंपनी मध्ये आपण व्यवहार अर्थात ट्रेड करू शकतो अशा 100 कंपनी मिळून जो निर्देशांक तयार झाला आहे तो म्हणजे निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्स. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून स्टॉक मार्केट च्या निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांकाचा हिस्सा होऊ शकता.
- निफ्टी स्मॉल कॅप 50 इंडेक्स , निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स यांचा देखील समावेश आहे. निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 250 कंपनी स्टॉक चा समावेश आहे.
- स्मॉल कॅप कंपनी : small cap company marathi
- चांगल्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर दीर्घ कालावधी साठी पोर्टफोलियो मध्ये ठेवल्यास येणारा परतावा आकर्षक असू शकतो. स्मॉल कॅप मधील कंपनीच्या एका शेअरचे बाजार मूल्य हे मिड कॅप किंवा लार्ज कॅपच्या तुलनेत बऱ्याचदा कमी असते. त्यामुळे आकर्षक किमतीला हे शेअर्स उपलब्ध होऊ शकतात.
- शेअर बाजारात ज्यांना व्यवहार करायचे असेल ते सुरुवातीला एकदम मोठ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला मागेपुढे बघतात, तेव्हा छोट्या रकमेच्या शेअर पासून आणि छोट्या रकमेच्या गुंतवणुकीपासून सुरुवात केली तर ते सोयीस्कर किंवा कमी जोखमीचे वाटत असावे.
लेख वाचा : म्युचुअल फंड म्हणजे काय , संपूर्ण माहिती भाग 1
- स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी कसे आहे ? small cap investment
- स्मॉल कॅप हे मिड कॅप आणि लार्ज कॅप च्या तुलनेत अतिशय अस्थिर मानले जाते. यामध्ये अनेक जण व्यवहार करत असल्यामुळे यात शेअर्स खरेदी आणि विक्री जास्त प्रमाणात होते.
- स्मॉल कॅप म्हणजे थोडक्यात जोखीम जास्त आणि त्यामुळे परतावा ही जास्त !
- गुंतवणूकदारांची संख्या जास्त असल्यामुळे शेअरची किंमत खाली जाणे किंवा वर येणे हेअधिक तीव्रतेने होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना होणारा फायदा आणि तोटा याचे प्रमाण देखील जास्त कमी होत असते.
- शेअर मार्केट तेजीत असताना किंवा बुल मार्केटमध्ये स्मॉल कॅप चांगली कामगिरी करत असतात मात्र बेअर मार्केट मध्ये म्हनजेच मार्केटमध्ये मंदी असताना स्मॉल कॅप तीव्रतेने खाली आल्यामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान होते. अर्थात शेअर मार्केट आणि म्युचुअल फंड म्हटले की जोखीम ही आलीच !
- मात्र यासाठी योग्य वेळेस शेअर बाजारात एंट्री घेऊन ट्रेड घेणे आणि योग्य वेळेस शेअर विकून बाहेर पडणे म्हणजे एक्जिट घेणे हे आवश्यक ठरते. यासाठी तुमचा अभ्यास असणे गरजेचे असते.
- दररोज शेअर मार्केट मध्ये ट्रेड करणारे गुंतवणूकदार वेळ असल्यास मार्केटच्या चढ – उताराकडे लक्ष देऊ शकतात आणि तत्परतेने या गोष्टी लक्षात घेऊन फायदा कसा करुन घ्यायचा आणि तोटय़ात जाताना कमीत कमी तोटा कसा होईल हे जमवून आणू शकतात.
- मात्र वेळेअभावी हे शक्य नसल्यामुळे अनेक लोक म्युच्युअल फंडला पसंती देतात.
- तसेच म्युचुअल फंड कसे काम करतात ? शेअर मार्केटची जोखीम लक्षात घेता म्युचुअल फंड ची उपयोगिता काय आणि कशी हे सर्व आपण मागच्या म्हणजे म्युचुअल फंड भाग 1 आणि भाग 2 मध्ये पहिले आणि शिकलो.( त्यांची लिंक वर दिली आहे. )
- असेट मॅनेजमेंट कंपण्याचे अनेक स्मॉल कॅप म्युचुअल फंड आज बाजारात उपलब्ध आहेत.
- स्मॉल कॅप म्युचुअल फंड : small cap mutual fund
- यामध्ये फंड मॅनेजर जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा कमीतकमी 65% गुंतवणूक ही स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर मध्ये केली जाते .
- कंपनीचा भविष्यातील विस्तार , त्याचे व्यवस्थापन ,भांडवल , नफा , कर्ज , तोटा , कंपनीचे प्रवर्तक या सगळया विषयांचा बारकाईने अभ्यास करून फंडमध्ये त्याची टक्केवारी ठरवत असतात.असेट मॅनेजमेंट कंपनीचे काही नियम आधीपासून ठरलेले असतात त्यानुसार गुंतवणुकीची मर्यादा ठरते.
- स्मॉल कॅप कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन कमी असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून भविष्यात विस्ताराची संधी असते त्यामुळे साहजिक त्याचे बाजारमूल्य वाढीची संधी देखील असते. म्हणजेच गुंतवणूकदारांचा नफा काही पटीत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- स्मॉल कॅप म्युचुअल फंड NAV ( mutual fund NAV ) ही मिड कॅप , लार्ज कॅप च्या तुलनेत कमी असते . त्यामुळे तुम्ही फंडसाठी जास्त यूनिट खरेदी करू शकता.
उदाहरणार्थ , (NAV ची सर्व माहिती 9 फेब्रुवारी 2024 च्या तारखेचा आधारे घेण्यात आली आहे.)
1. कॅनडा रोबेको स्मॉल कॅप म्युचुअल फंड NAV Rs. 36.65
2. एलआयसी स्मॉल कॅप म्युचुअल फंड NAV Rs. 28.52
3. मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप म्युचुअल फंड NAV Rs.10.49
- अर्थात हे सगळे जरी असले तरी तुमची आर्थिक परिस्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता आणि इतर जबाबदारी या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन स्मॉल कॅप म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
लेख वाचा : म्यूचुअल फंड संपूर्ण माहिती – भाग 2
- मागील 5 वर्षामध्ये , उत्कृष्ट परतावा दिलेले काही स्मॉल कॅप म्युचुअल फंड : best returns in small cap mutual fund for last 5 years .
- एस आय पी – सिप (SIP) करून उत्कृष्ट परतावा देणारे फंड – small cap mutual fund – SIP
- क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड – 50.04 % pa
- निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंड – 38.83 % pa
- बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंड – 36.81 % pa
- एच एस बी सी स्मॉल कॅप म्युचुअल फंड 35.25 % pa
- एच डी फ सी स्मॉल कॅप म्युचुअल फंड 34.45 % pa
- वरील परतावा पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आले असेल की स्मॉल कॅप म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरलेले आहे.
- स्मॉल कॅप म्युचुअल फंड कॅल्क्युलेटर : small cap mutual fund calculator
- आजकाल सर्व बँक आणि असेट मॅनेजमेंट कंपनी च्या संकेत स्थळावर कॅल्क्युलेटरची सुविधा दिलेली असते.
- संकेतस्थळावर ज्याप्रमाणे कर्जाची रक्कम ,व्याजदर , कर्जाचा कालावधी हे सर्व टाकले असता कर्जाचा हप्ता आपल्याला कळतो अगदी तसेच आपण एस आय पी – सिप (SIP) किंवा लम्पसम रक्कम भरली असता अंदाजे किती परतावा मिळू शकतो किंवा मिळाला आहे, याची माहिती संकेत स्थळावर असणाऱ्या कॅल्क्युलेटर वरून मिळते.
- मागील 5 वर्षात क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंड ने किती परतावा दिल आहे हे आपण म्युचुअल फंड कॅल्क्युलेटर च्या मध्यमातून एक उदाहरण घेऊन बघू.
अनिल ने 5 वर्षासाठी, एस आय पी – सिप (SIP) करून महिना Rs. 3000 जर भरले असते , तर
त्याची म्युचुअल फंड मधील गुंतवणूक – Rs.1.8 लाख.
तर आज च्या NAV नुसार त्याचे मूल्य – Rs.5.95 लाख इतके झाले असते.
म्हणजेच त्याचा नफा Rs.4.15 लाख झाला.
तुम्हाला टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या म्युचुअल फंडच्या जाहिरातीमधून शेवटची घाईघाईमधून सांगितली जाणारी ओळ आठवत असेल, “ Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. “ तेव्हा कुठलीही गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या.
आजची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. अशाच माहितीपर लेख आणि कथा साठी “ लेखकमित्र ” संकेतस्थळाला भेट देत रहा आणि व्हॉटस्अप चॅनलला जॉइन करा.
लेखिका- सौ.वैशाली जोशी पाठक ,पुणे
छान माहिती दिली.
धन्यावाद 🙏