Sovereign gold bond scheme : सार्वभौम सुवर्ण रोखे योजना भारतामधील बहुतांशी लोकांचा विचार करता त्यांचे गुंतवणुकीचे ठरलेले काही निवडक सुरक्षित पर्याय आहेत. ज्याच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवतात जसे की एफडी फिक्स डिपॉझिट, सोने किंवा सोन्याचे दागिने आणि तिसरा म्हणजे रियल स्टेट घर ,जमीन किंवा फ्लॅट. आपल्याकडे सोन्यामध्ये गुंतवणूक करताना इमोशनल व्हॅल्यू म्हणजेच भावनिक अटॅचमेंट असते. जर सोन्याकडे फक्त आणि फक्त गुंतवणूक म्हणून पाहायचं असेल भावनिक अटॅचमेंट सोडून तर ती गुंतवणूक कशी करायची ते आपण पाहूया.
सोन्यामध्ये जर तुम्हाला इन्वेस्ट करायचे असेल, त्याची गुंतवणूक करायची असेल तर कशी करायची? सोन्याची खरेदी करण्यासाठी सामान्य लोक काय करतात किंवा आपली पारंपारिक पद्धत काय आहे पैशाची गुंतवणूक करायची आहे तर थोडी एफडी केली आणि उरलेले काही पैसे आपण सोन्यामध्ये गुंतवतो. आता सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणजे काय? एखाद्या दुकानामध्ये जायचं आणि तिकडे जाऊन पैसे असतील तितके दोन तोळे, तीन तोळे सोने विकत घ्यायचे म्हणजेच आपण तेवढ्या किमतीचे, तेवढ्या पैशाचे दागिने खरेदी करतो. आता हा दागिना खरेदी केला म्हणजेच ही गुंतवणूक म्हणता येईल का तर मुळीच नाही तर याची काय कारणं आहे ते आपण पुढे सविस्तर पाहू.
सोन्यात गुंतवणूकीचे आधुनिक इलेक्ट्रॉनिक पर्याय डिजिटल म्हणजेच इ फॉर्म मध्ये सोने कसे घ्यायचे
१) SGB
२) डिजिटल गोल्ड
३) गोल्ड mutual फंड
SGB म्हणजे काय
S- Sovereign G – Gold B -Bond जर आपल्याला सोन्यामध्येच गुंतवणूक करायची असेल तर कशी करायची. कशाप्रकारे चांगले रिटर्न्स मिळवायचे आणि कशाप्रकारे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवलेले पैसे अधिक अधिक वाढवायचे.यासाठी बेस्ट पर्याय आहे सुवेरियन गोल्ड बॉण्ड स्किम. याच्यामध्ये काय होतं एका बॉण्ड मध्ये तुम्ही इन्वेस्ट करता.तुम्ही सोन्याची खरेदी करता सोन्यामध्येच पैसा गुंतवता. परंतु ह्याच्या पासून भरपूर फायदे आपल्याला होतात. जर तुम्ही हा बॉण्ड खरेदी केला तर त्यामध्ये कोणतेही मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाही. जेव्हा तुम्ही फिजिकल स्वरूपात, दागिन्या स्वरूपात गोल्ड किंवा सोने खरेदी करता त्यावेळी तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यावे लागतात.
प्रती ग्राम 400 ते 500 रुपये तुमच्याकडून या डिझाईन करण्यासाठी आकारले जातात. पण जेव्हा तुम्ही हे सोन्याचे बॉण्ड खरेदी करता तेव्हा हे मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही दागिना विकत घेताना दुकानदाराला जीएसटी द्यावा लागतो. काही पर्सेंटेज जीएसटी तुम्हाला भरावा लागतो. बॉण्ड्स मध्ये जेव्हा तुम्ही इन्वेस्ट करता तेव्हा कोणताही जीएसटी तुम्हाला भरावा लागत नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला कुठेही कुठल्याही दुकानामध्ये जाण्याची गरज नाही. घरामध्ये बसून ऑनलाइन तुम्ही हे बॉण्ड खरेदी करू शकता आणि आपली सोन्यामध्ये ठरवलेली रक्कम इन्वेस्ट करू शकता. म्हणजेच घरबसल्या गोल्ड मध्ये इन्वेस्ट करू शकता. कोणत्याही एक्स्ट्रा खर्चाची गरज नसते. जी रक्कम असते तेवढी रक्कम भरून तुम्ही हा बॉण्ड खरेदी करू शकता.
SGB ची फेस व्हॅल्यू म्हणजेच नॉमिनल व्हॅल्यू इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) ने जारी केलेल्या 999 पुरिटी सोन्याच्या मागील तीन दिवसांच्या क्लोजिंग प्राईस वर आधारित असते. हे बॉण्ड्स प्रति युनिट याप्रमाणे विकले जातात. एक युनिट म्हणजेच एक ग्रॅम सोने तर या युनिटचा भाव ठरवला जातो IBJA कडून. मग हा भाव कसा ठरवला जातो, तर 999 शुध्दता सोन्याचे तीन दिवसाचा जो भाव असतो त्याची सरासरी काढली जाते आणि तोच एका युनिटचा भाव असतो.
SGB मध्ये गुंतवणूक कशी केली जाते
आपल्या मनाप्रमाणे कधीही SGB मध्ये गुंतवणूक करता येत नाही. या बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही ठराविक पिरियड सरकारकडून दिला जातो त्यालाच Tranche असे म्हणतात. सध्या 2024 मध्ये फेब्रुवारी 12 ते 16 फेब्रुवारी 2024 हा एक tranche आरबीआयकडून सबस्क्रीप्शन साठी ओपन केला गेला होता त्यालाच SGB 2023-24 series IV असे म्हटले जाते. आणि सरकारकडून दिलेल्या या सबस्क्रीप्शन पिरेड मध्येच तुम्हाला हे बॉण्ड्स खरेदी करता येतात. सरकारला हवं असेल त्यावेळी त्या वर्षांमध्ये कितीही ट्रांचास येऊ शकतात.
एस जी बी मध्ये गुंतवणुकीचे फायदे
स्टोरेजची चिंता नाही स्टोरेज साठी लागणारा खर्च नाही ज्यावेळी आपण फिजिकल स्वरूपात सोने खरेदी करतो त्यावेळी आपल्याला ते बँकेमध्ये किंवा घरातल्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे लागतात. आणि त्यासाठी बँकेला पैसे देखील द्यावे लागतात.
घडणावळीचे चार्जेस नाही जर तुम्ही एखादा दागिना बनवून घेतला तर त्यासाठी मेकिंग चार्जेस द्यावे लागतात परंतु बॉण्ड साठी अशी काही गरज भासत नाही.
भेसळीची चिंता नाही
हरवण्याची काळजी नाही
नियमित व्याज मिळेल यावर सरकार दरवर्षी तुम्हाला अडीच टक्के व्याज देते.
मॅच्युरिटी पर्यंत होल्ड केल्यास कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही.
SGB मध्ये जोखीम काय आहे
गुंतवणूक केल्यावर सोन्याचा भाव वाढेलच याची खात्री नाही. या बॉण्ड्समध्ये तुम्ही मॅक्सिमम आठ वर्षे गुंतवणूक करू शकता. आठ वर्षानंतर जर तुम्हाला पुढे हे बॉण्ड होल्ड करून ठेवायचे असतील तर तसे होत नाही. आठ वर्षानंतर आपोआपच हे बॉण्ड्स mature होतात. तुम्ही जे बॉण्ड्स विकत घेता ते स्टॉक मार्केट वर लिस्ट होतात आणि त्यामुळे तुम्ही हे बॉण्ड्स कोणालाही विकू शकता. पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सरकारला देखील हे बॉण्ड्स विकू शकता. तुम्हाला पैसे मिळतील परंतु याच्यावर लॉन्ग टर्म कॅपिटल टॅक्स गेन भरावा लागेल. आठ वर्ष पूर्ण झाली तर तुम्हाला ही रक्कम टॅक्स फ्री असेल.Sovereign gold bond scheme
टॅक्स किती लागेल?
जर तुम्ही 2024 मध्ये हे बॉण्ड विकत घेतले तर त्याच्या मॅच्युरिटी पिरियड म्हणजेच आठ वर्षानंतर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. आठ वर्षानंतर जर तुम्ही हे बॉण्ड्स विकले तर डिरेक्टली पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात आणि त्यावर एक रुपयाही टॅक्स लागत नाही. परंतु जर तुम्ही एक वर्ष किंवा दोन वर्षानंतर हे बॉण्ड सेल केले तर त्याच्यावर शॉर्ट टर्म गेन टॅक्स भरावा लागेल. तुम्ही ज्या टॅक्स स्लॅब मध्ये येत असाल दहा टक्के किंवा 30 टक्के त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.पण जर 2024 मध्ये विकत घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2029 नंतर तुम्ही हे बोंड विकले तर त्यावर लॉन्ग टर्म capital गेन टॅक्स भरावा लागेल.
SGB कुठून विकत घ्यायचे?
RBI website
All commercial banks
Public sector banks
Private banks
Foreign banks
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या ऑफिस मधून CCIL च्या ऑफिस मधून
पोस्ट ऑफिस मधून
स्टॉक एक्सचेंज ब्रोकर यांच्या पोर्टलवरून
ऑनलाइन SGB परचेस केल्यानंतर तुम्हाला चक्क पन्नास रुपये प्रति युनिट नफा मिळतो.
SGB मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
वैयक्तिक गुंतवणूकदार , ट्रस्ट युनिव्हर्सिटी अँड चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन , HUFs.जर तुमची कंपनी असेल तर कंपनीसाठी SGB मध्ये गुंतवणूक करता येत नाही.
SGB मध्ये किती गुंतवणूक करू शकता?
कमीत कमी एक युनिट म्हणजेच एक ग्रॅम सोने आणि जास्तीत जास्त चार किलो फॉर indivisual आणि HUF साठी आणि मॅक्सिमम 20 किलो ट्रस्ट साठी.
जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करतात तेव्हा घरात ठेवल्यानंतर ते चोरी जाण्याची आपल्याला सतत भीती वाटत असते.परंतु तुम्ही जर ते लॉकरमध्ये ठेवले त्यासाठी काही चार्जेस पे करावे लागतात.बँकेला काही पैसे तुम्हाला या सिक्युरिटी साठी द्यावे लागतात. पण सोवेरियन गोल्ड बॉण्ड साठी तुम्हाला असे कुठलेही सिक्युरिटी चार्जेस द्यावे लागत नाही. कारण ते चोरी होण्याची भीती नाही. म्हणूनच ही इन्व्हेस्टमेंट सेफ मानली जाते. कधी कधी बँका बंद होण्याची देखील शक्यता असते परंतु हे बॉण्ड स्वतः आरबीआयकडून इशू केले जात असल्यामुळे अशी भीती आपल्याला राहत नाही. याची गॅरंटी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली आहे. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. ही गुंतवणूक खूप सिक्युअर आहे.
इम्प्युरीटीज जेव्हा तुम्ही दुकानांमधून एखादा सोन्याचा दागिना खरेदी करता तेव्हा तो 100% प्युअर किंवा शंभर टक्के सोन्याचा नसतो. सोन्याची पुरिटी 91% असते इथे फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. जर तो ९१% शुद्ध तेचा सोन्याचा दागिना असेल तर तुमच्याकडून मात्र शंभर टक्के सोन्याचे पैसे चार्ज केले जातात. समजा दहा हजार रुपये सोन्याची किंमत आहे एका तोळ्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागत असतील तर 90% पुरिटी असलेले सोने असेल तर त्याची किंमत 9000 घेतली पाहिजे पण तुमच्याकडून दहा हजार रुपये घेतले जातात. कारण सोनार तुमच्याकडून पूर्ण रक्कमच वसूल करतो.
पण SGB मध्ये तसं होत नाही हंड्रेड पर्सेंट प्युअर सोनं तुमच्या नावावर होतं आणि 100% सोन्याचेच पैसे तुम्हाला रिटर्न मध्ये मिळतात. जसजशी किंमत वाढत जाईल तस तशी त्या बॉण्ड ची किंमत सुद्धा वाढत जाते उदाहरणार्थ 2019 साली सोन्याची किंमत होती 32000 ते 35000 च्या दरम्यान पण 2024 ला त्याची प्राईज गेली होती 65 हजार रुपयांच्या घरात. म्हणजेच जवळ जवळ वीस तीस हजार रुपयांची इन्क्रिमेंट पाहायला मिळते. जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर 32 हजार 35000 गुंतवणूक करून वीस हजार ते 25 हजार रुपये नफा झाला.
सोने खरेदी करणे हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.आपण भारतीय दरवर्षी सुमारे तीनशे टन सोने खरेदी करतो जे इतर देशांमधून आयात करावे लागते. त्यासाठी भारत सरकारने पर्याय म्हणून नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्णरोखे म्हणजेच सोवेरियन गोल्ड बॉण्ड किंवा एस जी बी योजना Sovereign gold bond scheme सुरू केली.जर तुम्ही सोन्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छित असाल तर प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी तुम्ही सवेरियन गोल्ड बॉंड चा विचार करू शकता.
लेखकाचे नाव – प्रिती यादव, पुणे
खूप छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद🙏🏻