Success story of Sugar cosmetics in marathi :सुंदर मी होणार
प्रत्येक स्त्रीच स्वप्न असते सुंदर दिसायचे आणि त्यासाठी ती सौदर्य खुलवण्यासाठी खूप मेहनत देखील घेते. आणि ही काय आजची पिढी करतेय अस नाही बरं का? सुमारे तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. विश्वास बसणार नाही, पण भारत व इजिप्त हे दोन देश सौंदर्यप्रसाधनशास्त्राचे जनक आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियां सौदर्य प्रसाधनांचा वापर जास्त करतात. आपले व्यक्तिमत्व अधिक आकर्षित करण्यासाठी जे द्रव्य आणि पदार्थ यांचा वापर करतात त्या पदार्थांना सौदर्यप्रसाधने म्हणतात.
विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी:- शुगर कॉस्मेटिक
वाचकहो, अगदी बरोबर वाचलात आजच्या घडीला सौंदर्यप्रसाधानांच्या दुनियेत एक खास ओळख निर्माण केली आहे ती विनीता सिंग व कौशिक मुखर्जी यांनी. जलद गतीने भारतीय मार्केट काबीज करणारा ‘शुगर कॉस्मेटिक‘ हा एक भारतीय ब्रॅण्ड आहे. विनीता सिंग व कौशिक मुखर्जी यांनी दोघांनी मिळून २०१२ साली शुगर कॉस्मेटिकची स्थापना केली. या दोघांनी याआधी दोन, तीन बिझनेसेस सूरु केले होते पण त्यांना यश मिळाले नाही.
दोघेही अपयश आल्यानंतर खचले नाही. दोन वर्षातच शुगर कॉस्मेटिक कंपनी फायद्यात आली. त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ होते. विनिता व कौशिक दोघांनाही भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या होत्या पण त्यांना एन्त्राप्रिन्यूअर व्हायचे होते. विनीता यांना वार्षिक एक कोटी पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी आली होती पण त्यांनी ती नाकारली तसेच कौशिक हे देखील मेंकेन्सी ॲण्ड कं. व ॲमेझोन सारख्या कंपनीत टॉप लीडरशीप मध्ये होते त्यांनी ही नोकरीचा राजीनामा दिला. विनीता सिंग ह्या आयआयटी मद्रास व आयआयएम अहमदाबाद येथे शिक्षण घेतले. कौशिक मुखर्जी हे सुद्धा आयआयएम अहमदाबाद येथे शिकण्यास होते. २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. आणि या दाम्पत्यांना दोन मुलगे आहेत.
दोन ध्येयवेडे:-
विनीता व कौशिक यांना अपयश जरी आले असले तरी बिझनेसचा दांडगा अनुभव मिळाला. नविन बिझनेस साठी मार्केट रिसर्च करत असताना त्यांना असे आढळून आले की, सौंदर्य प्रसाधनांमध्ये सामान्य महिलांना परवडतील व चांगल्या दर्जाची उत्पादने भारतात उपलब्ध नव्हती. बाहेरच्या देशातील कंपनीचे उत्पादने भारतीय महिलांना वापरावी लागत होती. नेमके हेच या दाम्पत्यानी हेरले व भारतीय महिलांच्या त्वचेच्या पोत नुसार खास उत्पादने तयार करण्याचे ठरवले. आणि भारतीय ब्रॅण्ड सूरु झाला. अशाप्रकारे एका यशस्वी व्यवसायाची सुरुवात झाली.
फक्त विचार केला आणि व्यवसाय सुरू झाला एवढा सोपा प्रवास नव्हताच. २०१२ मध्ये जरी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली असली तरी त्याची फळे चाखण्यासाठी बरीच वर्षे वाट पहावी लागली. तोपर्यंत ह्या व्यवसायात चिकाटी, धैर्य व मेहनत प्रंचड होती. निव्वळ पैसा गुंतवून व्यवसाय सुरु होत नाही तर तो व्यवसाय चालवण्यासाठी नवनवीन कल्पना राबवाव्या लागतात. सौदर्यप्रसाधने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने ही सौदर्यप्रसाधने भारतीय महिलांच्या पसंतीस उतरली पाहिजे होती. आणि त्यासाठी वाट बघणे जरूरी होते. अखेर दोन वर्षाच्या अथक परिश्रमाने व उत्तम दर्जाची माफक किंमतीतली सौदर्यप्रसाधने भारतीय त्वचेनुसार मिळू लागल्याने शुगर कॉस्मेर्टीक लवकर नफ्यात चालू लागली. कंपनी चालवताना विनीता व कौशिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भांडवल उभे करणे, विश्वासू सप्लायर्स शोधणे व योग्य संघ बांधणी करणे या आव्हानांना सामोरे जावे लागले.
२०१४ पासून शुगर कॉस्मेटीक कंपनी फायदा देऊ लागली. तेव्हा पासून कंपनी प्रगतीपथावर चालू लागली. भारतीय मार्केट मधील एक नावाजलेला बॅण्ड म्हणून ओळख निर्माण झाली. पूर्ण भारत देशात दहा हजारा पेक्षा जास्त रिटेलर्स आहेत. आणि ऑनलाईन विक्री देखील होते.
शुगर कॉस्मेटिक्सच्या यशाचे रहस्य (Success secret of Sugar cosmetics in marathi)
१) खास भारतीय महिलांचा विचार करून बनवलेली उत्तम दर्जाची, परवडणाऱ्या किमंतीत भरपूर वैविध्य असलेली उत्पादने.
२) आपल्या उत्पादनांचा बाजारात नाविन्य पूर्ण केलेला प्रचार
३) ह्या उत्पादनांसाठी चांगले कस्टमर बॉण्डिंग व सोशल मिडियाचा वापर यामुळे प्रसिद्धी मिळाली.
भारतातील यशस्वी एन्त्राप्रेन्युअर म्हणून विनिता व कौशिक यांच्याकडे बघितले जाते. ज्यांना आपला बिझनेस सुरु करायचा आहे त्याच्यांसाठी हे दोघे निश्चीतच आदर्श आहेत.
शुगर कॉस्मेटिक्सचा संघर्षमय प्रवास (Journey of Sugar cosmetics in Marathi):-
चला बघूया शुगर कॉस्मेटिक्सचा टप्या टप्यानुसार प्रवास:-
२०१०:- विनीता आणि कौशिक यांनी त्यांचा पहिलावहीला फॅशन इ-कॉमर्स कंपनी हा व्यवसाय सुरु केला पण अपूऱ्या भांडवलाअभावी व अनुभव नसल्यामूळे तो लवकरच तोट्यात गेला.
२०११:- विनीता आणि कौशिक यांनी कन्सल्टींग चा दूसरा बिझनेस सुरू केला. पण क्लाएंट अभावी हा देखील अपयशी ठरला.
२०१२:- या वर्षात विनीता आणि कौशिक यांनी शुगर कॉस्मेटिक्स चा व्यवसाय करायचा ठरवला. यावेळी त्यांनी विनीताच्या वडिलांकडून थोड़े कर्ज घेतले व स्वतःची सेव्हिंग्स वापरायची असे ठरले.
२०१३:- शुगर कॉस्मेटिक्सने क्रेयॉन लिपस्टिक ची पहिली रेंज लाँच केली. लिपस्टिक्सच्या आगळ्या वेगळ्या रेंजने कस्टमर्सचे लक्ष वेधून घेतले आणि कंपनीकडे लक्ष जाऊ लागले.
२०१४:- शुगर कॉस्मेटिक्स प्रॉफिट मध्ये येण्यास सुरु झाली असली तरी या कंपनीला इतर ब्रॅण्डेड कंपनींशी स्पर्धा होतीच आणि भांडवल हा देखिल एक मुद्दा होता.
२०१५:- शुगर कॉस्मेटिक्स ने पहिले ऑफलाईन स्टोर मुंबईत सुरु केले आणि त्वचेसाठी व केंसासाठी दर्जेदार उत्पादने विक्रीस उपलब्ध केली.
२०१९:- या वर्षात काही खाजगी इन्व्हेस्टर्स कडून जादा भांडवल मिळवले. या भांडवलाचा त्यांनी चांगला उपयोग करून व्यवसायाचा पाया मजबूत केला.
२०२०:- या वर्षांपर्यंत शुगर कॉस्मेटिक्स कंपनीने चांगले नाव व ब्रॅण्ड स्थापन केले. दुबई येथे पहिले आंतरराष्ट्रिय स्टोर उघडले. अशाप्रकारे शुगर कॉस्मेटिक्स ने राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय स्तरावर आपल्या ब्रॅण्डचा दबदबा निर्माण केला.
जबरदस्त व्यक्तिमत्व- विनीता सिंग
विनीताला तिच्या वयाच्या सतराव्या वर्षी कॉलेजच्या प्रोफेसरांनी एक बिझनेस वूमन होण्याची प्रेरणा दिली. तेव्हाच तिने ठरवले आणि त्यानुसार स्वःताला तयार करण्यास सुरु केले. तिची धडाडी आणि सगळीकडे आघाडी घेण्याच्या वृत्तीमुळे ती एक यशस्वी व्यवसायिक होऊ शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला. तिच्या म्हणण्यानुसार तिचे प्रेरणास्थान तिचे वडिल होते. विनीता कधीही आव्हांनाना घाबरली नाही कारण तिचा स्वतःवर असलेला विश्वास. स्वताच्या दिलेल्या शब्दांना जागत आज कंपनीमध्ये ७५% महिला काम करत आहेत. अजून दहा हजार महिलांना काम देण्याचे ध्येय कंपनी लवकरच गाठेल. २०१५ साली सुरु केलेल्या एक स्टोर पासून आताचा प्रवास १२५ पेक्षा अधिक स्टोर्स पूर्ण भारत भर सुरु झाली आहेत.
कंपनीच्या सर्व उत्पादनांमध्ये जसे की लिपस्टिक, आयशॅडो, फाऊंडेशन, आय लाइनर आणि इतर यांमध्ये कुठेही प्राण्यांचा वापर केला गेला नाही. १००% वेगन असल्यामूळे ही उत्पादने लवकरच हिट ठरली आहेत.
सारांश:-
यशस्वी उद्योगाची गोष्ट वाचणे खूप सोपे वाटते. पण जेव्हा या दाम्पत्याकडे आपण बघतो, तेव्हा त्यांनी घेतलेले परिश्रम आणि दोघांच्या ही अंगात असलेले गूण जसे जिद्द, चिकाटी, आव्हाने स्विकारणे, नवनवीन कल्पना राबवणे, सतत कस्टमर्स विशेषतः महिला यांच्या पंसतीस उतरणारी उत्पादने निर्माण करणे, व्यवसायासाठी लागणारे भांडवल उभे करणे एवढे सोपे नक्कीच नाही. आणि स्थापित इतर ब्रॅण्ड च्या बरोबरीने आपला ब्रॅण्ड निर्माण करणे व टिकवून ठेवणे यासाठी धैर्य लागते. म्हणून कमी वेळात एवढा बिझनेस एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. विनीता म्हणते की, स्वप्न बघा आणि ले पूर्ण करण्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवा. ग्राहकांना दर्जेदार उत्पादन व परवडणाऱ्या किमतीत आणि नाविन्य असलेली उत्पादने नेहमीच आकर्षित करतात. ज्या लोंकाना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ग्राहकांचे समाधान हेच केंद्रस्थानी मानायला हवे.
तुम्हाला गाथा एका यशस्वी उद्योगाची (successful journey of Sugar cosmetics) माहीती कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरीवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला भेट दया. तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा.
लेखिका:- सौ. वैदेही उदयकुमार बाबरदेसाई.
धन्यवाद!
विषयाची अतिशय नेटकी मांडणी आणि शुगर कॉस्मेटिक्सचे चढउतार आणि त्यातून घेण्यासारखे प्रेरणादायी सुंदर विचार.
Thank u
खूप छान लेख Vaidehi
Thank u
Very informative and motivating story of these businessmen.
Vaidehi has written it very nicely.
Thank u
Very interesting and informative
Thank u
Well written by Vaidehi Mam
Thank u