श्री स्वामी समर्थ! नमस्कार सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो खुप महत्वाचा विषय आहे. तो म्हणजे ज्या व्यक्तींना श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायची इच्छा असते, पण ते कसे करावे हे माहित नसल्यामुळे त्यांना परायण करण्यास अडचणी येतात. आणि विशेष म्हणजे जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे ते चांगले असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात सुख- शांती येते, आपल्या अनेक अडचणी दूर होतात, आपल्याला आयुष्यात स्थिरता मिळते, त्यामुळे आज आपण या बद्दल माहिती जाणून घेऊया.
श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे?
बरेच लोक स्वामींची सेवा करत असतात, पण त्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा असते, तेव्हा त्यांना संपूर्ण अशी माहिती मिळत नसल्यामुळे आणि त्यांनी पारायण जरी केलं तरी, त्याच फळ त्यांना हवं तसं मिळत नाही. त्यामुळे आज तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे? याची माहिती सांगणार आहे, चला तर आपण पाहूया.
पारायण कधी आणि कसे करावे -:
खर तर स्वामींची भक्ती आणि सेवा करण्यासाठी काळ बंधानाची गरज नसते. पण प्रत्येक भक्ताला एक चांगला ठराविक दिवशी व वेळेला पारायण करण्याची इच्छा असते. अशा वेळी तुम्ही ठराविक वार निवडून पारायण करू शकता, जसे की, पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ खूप शुभ मानला जातो.
1) तुम्ही दशमी, एकादशी आणि द्वादशी तिथीच्या दिवशी सुध्या तीन दिवसांचे पारायण करू शकता ते शुभ मानले जाते.
2) तुम्हाला शक्य असेल तर, तुम्ही एकाच दिवशी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करू शकता.
3) आपल्या श्रद्धा, आणि भक्तीनुसार नुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करू शकता, नाहीतर रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालू शकते.
4) पारायण करताना कोत्याही प्रकारची शंका मनात आणू नये, जसे की, हे पारायण माझ्या कडून होईल का, कोणते विघ्न येईल का, किंवा आपली इच्छा पूर्ण होईल की नाही?
5) पारायणाच्या काळामध्ये पारायण करणाऱ्याने सदाचाराने राहावे. तसेच घरात वातावरण शांतपूर्वक ठेवावे. घरामध्ये वादविवाद,भांडण, तंटे सक्तीने टाळावेत.
6) परायणाच्या काळात ब्रह्मचर्य पाळावेत आणि स्वामींचे नामस्मरण करावे.
7) परायणाच्या दिवशी उपवास करावा, त्यामुळे पारायण पूर्णत्वास जाते. तसेच परायनाच्या दरम्यात तामसी पदार्थ ग्रहण करू नये, जसे की कांदा, लसूण, मांसाहारी आहार खाऊ नये.
8) परायणाची वेळ ही सकाळच्या अंघोळीनंतर, नित्याची देवपूजा करून, भोजनापूर्वी पारायण करावे. खरं तर ब्राम्हमूहर्तावर केलेलं पारायण हे खूप लाभ दायक असते. त्यावेळेला देवाचा वास जास्त असतो.
खर तर पारायण करणे म्हणजे प्रत्येक्ष परमेश्वराच्या संपर्कात येणे होय. स्वामीच पारायण हे फक्त पुरुष वर्गच नाही तर, महिला वर्ग सुद्धा करू शकतात. पण यात पारायण करतांना महिलांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, ते आपण पाहूया. चला तर पाहूया
स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी?
1) मासिक पाळीच्या काळात – मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी पारायण करणं टाळलं पाहिजे. जर पारायण चालू असताना मासिक पाळी सुरू झाली तर, पारायण थांबवून शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू केले पाहिजे. तसेच या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर भर दिला पाहिजे.
2) गर्भवती स्त्रियांनी – गर्भवती स्त्रियांनी शक्यतर पारायण करू नये, नामस्मरणावर भर द्यावा आणि पारायण करायचं असे तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
3) वेळेच नियोजन – तुमच्या घरात जर लहान मुल असेल तर, त्याचा सांभाळ करण्याच्या दृष्टीने मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास, पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीने करणे आवश्यक आहे.
4) समतोल राखणे- घरातील जबाबदाऱ्या स्रियांकडे असेल तर, त्यांनी जास्त करून पहाटे पारायण केलेले उत्तम ठरेल. त्यामुळे त्यांना बाकीचा दिवस मोकळा मिळेल आणि पारायण यांच्यात समतोल राखणं सोपे होऊन जाईल.
पारायण कसे करावे? याची पद्धत पाहूया –
1) वेळ निश्चित करणे – पारायण करताना सर्वात प्रथम परायनाची निश्चित वेळ ठरवणे गरजेचे आहे. एखादी वेळ निश्चित केली की, त्याच वेळेत परायणाला सुरवात करावी. वेळत कोणताही बदल करू नये. त्यामुळे आपल्या पारायनातील एकाग्रता वाढते आणि पारायण उत्तम होते.
2) स्नान करून, स्वच्छ वस्त्रे नेसावीत – एकदा पारायणाची वेळ निश्चित झाली की, त्यावेळे नुसार सुशिर्भूत (स्वच्छ अंघोळ करून) होऊन, देवा समोर पारायणाला बसावे.
3) कपाळाला गंध लावावा – सुशिर्भूत झाल्या नंतर, पारायणाला बसण्यापूर्वी कपाळाला गंध लावावा.
4) नित्याची देवपूजा करावी – पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्वाची म्हणजे देवपूजा ती आधी करून घ्यावी.
5) पारायणाची तयारी – देवपूजा झाल्यावर, एका चौरंगावर स्वच्छ असे वस्त्र-अंथरूण ठेवावे. चौरंगाच्या सभोताल सुंदर अशी रांगोळी काढावी. तसेच चौरंगवर श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. श्री स्वामी समर्थ महाराजांन समोर समई लावावी. तसेच स्वामींची गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचार यांनी पूजा करावी आणि गंधाक्षता आणि पुष्प वाहून स्वामींच्या पोथीची ही पूजा करावी.
6) संकल्प करावे – सर्वात आधी परायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे, मग आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून, आपल्या मनातली जी कोणती इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पारायण करीत आहोत हे बोलावे. थोडक्यात सांगायचे झाले तर, पारायणाचा संकल्प करावा. तसेच उद्देश सफल व्हावा म्हणून, स्वामींना प्रार्थना करून ते पाणी तामनात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.
7) आपल्या इष्टदेवतना आव्हाहन करावे – पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी मनात संकल्प करून (मनात ईच्छा धरून), कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थाचे स्मरण करून संकल्प सोडावा. त्यामुळे पारायण पूर्ण केल्याचे फळ मिळते. आपले जे काही काम अडकले असेल, ते लवकर पूर्ण होण्यास मदत होते.
8) वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे – पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी घरातल्या आई-वडीलाचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग पारायणाला सुरुवात करावी.
स्वामींच्या पारायण वाचनाला सुरुवात कशी करावी ते पाहूया-
1) आसनावर बसणे- स्वामींच्या सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छ आसनावर बसावे. नंतर श्री स्वामी समर्थाचे नाव घेऊन, पोथीला नमस्कार करावा आणि स्वामींच्या पोथीमधला प्रत्येक ओळीचा अर्थ नीट समजून घेणे. मग त्यानंतर शांतपणे वाचन करावे.
2) खरा भाव ठेवणे- स्वामींचे परायण करत असताना, या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत, असा मनात खरा भाव असावा. तसेच मनोभावे परायण करावे.
3) चित्त प्रसन्न असावे – परायण करत असताना सर्वात आधी आपले मन प्रसन्न ठेवावे आणि चित्त स्थिर ठेवावे.
4) अखंड दिवा लावणे- परायणाच्या वेळेस वाचन चालत असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. कारण अश्यावेळी स्वामींचा वास (शक्ती) तेथे राहत असतो. म्हणजे स्वामी प्रत्येक्ष तिथे अदृश्य रुपात येऊन आपले परायण ऐकत असतात.
आता आपल्याला पारायण कसे करावे ते तर कळलेच असेल, तर आपण पारायण झाल्यानंतर काय केले पाहिजे ते पाहूया –
1) गंध लावणे- स्वामीच परायणाच वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद-कुंकू आणि फुले व्हावी. तसेच स्वामींच्या पोथीला उदबत्ती आणि धूप ओवाळून, नमस्कार करावा.
2) नैवेद्य दाखवणे – परायणाच्या शेवटी स्वामींना गोड पदार्थाचा नैवैद्य दाखवावा, तसेच सर्वांना प्रसाद द्यावा.
3) ब्राह्मणाचा सन्मान करावा – पारायणाच्या शेवटच्या दिवशी घरी आलेल्या ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र, दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा. तसेच एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे.
4) दान-धर्म करणे – पारायण झाल्यावर गोरगरिबांना अन्नदान करणे, तसेच एखाद्या आश्रमात जाऊन वस्त्रदान केले पाहिजे.
5) मठात जाणे- पारायण झाल्यावर न चुकता सर्वप्रथम स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतले पाहिजे. तसेच स्वामींना नारळ अर्पण करून, गोडाचा नैवद्य दाखवला पाहिजे.
स्वामीच पारायण केल्यावर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला अनुभवला मिळते आणि त्यातून अनेक फायदे ही होतात. तर आपण पारायण का करावे व त्यातून काय फळ मिळते ते पाहूया.
श्री स्वामी समर्थ महाराजांचे संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणाचे फायदे-
1) आध्यात्मिक प्रगती- स्वामींच्या पारायण केल्यामुळे आपली तर्क शक्ती वाढते. तसेच आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. आपल्यामधील नकारात्मक शक्ती निघून जाते. आणि आध्यात्मिक प्रगती होते.
2) मन एकाग्र होण्यास मदत होते – पारायणामुळे आपले मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होण्यास मदत होते. तसेच आपल्याला आत्मिक सुख मिळते.
3) नकारात्मक विचार दूर होतात – पारायणामुळे नकारात्मक विचारांपासून मुक्तता होऊन, सकारात्मक विचार विकसित होण्यास मदत होते.
4) श्रद्धा दृढ होते – पारायणामुळे आपली देवारची भक्ती, श्रद्धा दृढ होते आणि आत्मविश्वास वाढतो. आपल्या सभोताली देवाचे सुरक्षित कुंडल तयार होते.
5) जीवन सुधारणे – आपल्याला मनुष्य जन्माचे सार्थक करायचे असेल तर, आपल्याला भगवंताचे नामस्मरण, पारायण या मार्गाचे अवलंब करायला पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला पाहिजे. आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.
6) संकट दूर होतात – पारायणामुळे आपली अशक्य कामही शक्य होतात. येणारी संकटे टाळण्यास मदत होते. जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते.
7) आरोग्य सुधारते – पारायणामुळे आपले मानसिक, शारिरीक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आणि कुटुंबात सुख-समृद्धी, प्रेम वाढण्यास मदत होते.
8) एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते – पारायण करताना मन एकाग्र करून शांत बसून वाचन करावे, त्यामुळे मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
9) नैतिक मूल्ये शिकण्यास मदत- श्री स्वामी समर्थ चरित्र परायनातून या अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहेत. ज्यातून माणसाचे जिवन सुधारण्यास मदत होते. घरातील वातावरण शांत राहते.
10) धार्मिक आणि आध्यात्मिक गोडी निर्माण होते- पारायणामुळे आपल्या मनात धर्माविषयी, अध्यात्म विषयी गोडी निर्माण होते तसेच आपली प्रगती होते.
11) व्यक्तिमहत्व विकास- पारायनामुळे आपल्याला शिक्षण, व्यवसायात यश मिळण्यासाठी मदत होते. आपल्यामधले क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी गुण विकसित होण्यास मदत होते. तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यास मदत होते.
12) सामाजिक सबंध सुधारतात- पारायणाच्या माध्यमातून आपली प्रगती होऊन, समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढते, तसेच बंधुभाव, प्रेमभावना आणि परोपकाराची भावना वाढते. समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे मनःशांती आणि समाधान प्राप्त होते.
स्वामी समर्थाचे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळतात ते खूप अनमोल असतात. ज्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जिथे स्वामीच पारायण सुरु असते, तिथे प्रत्येक्ष श्री स्वामी समर्थ महाराज आपले पारायण बसून ऐकत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन, आपल्या पाठीशी उभे राहतात. आपण कधी भरकटलो तर, स्वामी आपल्याला मार्ग दाखवता. म्हणून तर स्वामी आपल्याला नेहमी संदेश देत असतात की, सेवा करा सेवेकरी व्हा!
उगाची भितोसी, भय हे पळू दे,
वसे अंतरीही, स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
“अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय”
मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि आपल्याला जर लेख आवडला असेल तर नक्की सांगा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. धन्यवाद!
लेखिका – हर्षदा पाठक