शेअर निफ्टी , बँक निफ्टी ,सेन्सेक्स गेले काही दिवस रेकॉर्ड वर रेकॉर्ड तोडत आहे .इतकेच काय गोल्ड ही सध्या चांगली कामगिरी करत आहे. याच बरोबर दिग्गज अशा टाटा समूहातील टाटा मोटर्स देखील शेअर बाजारात धुमाकूळ घालत आहे.
सध्या सगळ्यांच्या नजरेत असणारा हा शेअर म्हणजे ऑटो मोबाइल क्षेत्रातील एक नामांकित शेअर आहे. तसेच हा शेअर लार्ज कॅप मध्ये येतो ज्याचे बाजार मूल्य (मार्केट कॅपिटलेजेशन ) 3,37,476 करोंड इतके आहे. ही आकडेवारी 5 मार्च 2024 च्या तारखे नुसार आहे. आज आपण टाटा मोटर्स बद्दल जाणून घेणार आहे कारण सध्या तो एक विशेष कारणामुळे चर्चेत आहे.
याआधी आपण टाटा मोटर्स ने मागील दोन वर्षात किती परतावा (return) दिला यावर एक नजर टाकू. आज पासून बरोबर 2 वर्ष मागे जाऊन पाहिल्यास आणि टाटा मोटर्स च्या शेअर च्या किंमती मधील वाढ बघू शकतो.
दिनांक | टाटा मोटर्स शेअर किंमत |
7 मार्च 2022 | Rs. 394 |
6 मार्च 2023 | Rs. 430.95 |
6 मार्च 2024 | Rs.1025 |
- टाटा मोटर्स चा तक्ता पहिला तर लक्षात येईल मागच्या एक वर्षातच या शेअर ची किंमत दुप्पट हून अधिक झाली आहे. टाटा मोटर्स ने गुंतवणूकदारांना तब्बल १०० % पेक्षा जास्त परतावा मागील एक वर्षात दिला आहे.
- कंपनीचे Q3 चे निकाल देखील चांगले आले आहे . त्यामुळे रेव्हिन्यू देखील वाढला आहे. एकूण कंपनी ची घोड दौड सुरु आहे .
टाटा मोटर्स विभाजनाची अधिकृत घोषणा ( Authorised announcement of demerger of Tata Motors ) :
- टाटा मोटर्स ने नुकतेच त्याच्या कंपनीचे विभाजन होणार म्हणून अधिकृत घोषणा केली आहे.
यात त्याच्या व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहने अशा दोन विभागात विभाजन होणार असल्याचे सांगितले आहे.
- व्यावसायिक वाहने म्हणजे ट्रक , बस आणि प्रमुख्याने व्यवसायाला मदत होणाऱ्या माल वाहतुकीच्या वाहनाचा यात समावेश असतो. आणि प्रवासी वाहने म्हणजे सध्या बाजारात असलेल्या कार याच्याशी निगडीत व्यवसायाचे विभाजन होणार आहे.
- प्रवासी वाहने अर्थात पॅसेंजर वेहिकल मध्ये पेट्रोल-डिझेल , इलेक्ट्रिक वाहनांचा ( EV ) आणि JLR ( Jaguar Land Rover ) चा समावेश असेल.
- शेअर धारकाकडे टाटा मोटर्स शेअर असतील तर त्यांना प्रत्येकी एक एक शेअर टाटा मोटर्स कडून मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
- म्हणेजच या विभाजनामुळे तुमच्या कडे टाटा मोटर्स चे 50 शेअर असतील तर तुम्हाला विभाजित झालेल्या दोन्ही विभागामध्ये प्रत्येकी 25 , 25 असे शेअर मिळतील. सध्या शेअर चा बाजार भाव
Rs.1017 आहे . ( 6 मार्च च्या दिवसाच्या क्लासिंग प्रमाणे आकडेवारी आहे.)
- विभाजन झाल्यावर दोन्ही कंपनीचे मूल्य किती असेल किंवा दोन्ही चे मूल्य जवळपास समान असेल का या संदर्भात अजून माहिती जाहीर केली नाही .
- या सर्व प्रक्रियेसाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागेल अशी माहिती आहे.
हे वाचा : कमी खर्चात ट्रीप चे नियोजन कसे करायचे ?
हे विभाजन कशासाठी ? ( why this Demerger ?)
- विभाजनामुळे व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहने या दोन्ही व्यवसायावर स्वतंत्रपणे विशेष लक्ष दिले जाईल.
- तसेही 2019 पासून हे व्यवसाय स्वतंत्र पणे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करत आहे.
- त्यामुळे अधिक लक्षणीय कामगिरी करण्यास मदत होईल. गुणवत्ता तसेच सध्याच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ( EV ) च्या स्पर्धात्मक वातावरणात चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
- तसेच व्यवसाय वाढीसाठी भांडवल उभे राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय असे म्हटले जाते आहे.
टाटा समूहाचा इतिहास : ( history of tata group )
टाटा मोटर्स ची स्थापना 1945 मध्ये झाली. यांची सुरुवात व्यावसायिक वाहनापासून झाली.त्यांनी अनेक वर्ष या व्यवसायात स्वतः ला सिद्ध करून दाखवले आणि 1991 मध्ये व्यवसाय वाढीच्या दिशेने पुढे जात प्रवासी वाहनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. टाटा सियरा पासून सुरुवात झाल्यावर सुमो , सफारी , इंडिका अशा या गाड्या नव्वद च्या दशकात भरपूर नावाजल्या गेल्या. त्यानंतर टाटा समूहाने दक्षिण कोरियाच्या व्यावसायिक गाड्याच्याशी निगडीत देवू ग्रुप चे अधिग्रहण केले . त्यानंतर टाटा समूहाने अनेक भागीदारी आणि अधिग्रहण केले. त्यापैकी जॅग्वार लँड रोव्हर या ब्रिटिश कंपनी चे अधिग्रहण केले त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील टाटा समूहाने जे यश मिळवले ते अभिमानास्पद आहे.
टाटा समूहाने कायम नवीन आणि लोकांच्या फायद्याचा विचार केला आहे. याच विचारातून कमी किमतीची आणि जगातील सर्वात स्वस्त कार भारतातील लोकांसाठी बनवायची आणि प्रत्येकाचे कार चे स्वप्न पूर्ण व्हावे या ध्येयाने टाटा समूहाने टाटा नॅनो चे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले . मात्र ते फार काळ टिकाव धरू शकले नाही.
वाढते प्रदूषण , इंधनाच्या किमती या समस्येला तोंड देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आणला गेला यात ही टाटा समूहाने नेक्सॉन ( ev ) , पंच ( ev ) , टाटा टिआगो ( ev ) , टाटा टिगॊर ( ev ) या गाड्या बाजारात आणल्या. नेक्सॉन ( ev ) ला ही चांगली बाजारपेठ मिळवण्यात टाटा समूह यशस्वी झालेत.
शेअर धारकांना फायदा : ( benefits for shareholder )
- शेअर धारकांना चांगला परतावा देत टाटा मोटर्स ने गेल्या काही महिन्यात मजबूत कामगिरी केली आहे.
- टाटा मोटर्स च्या विभाजनाची अधिकृत घोषणा होताच टाटा मोटर्स च्या शेअर जवळपास 4 % ने वाढला आणि Rs. 1000 ची पातळी ओलांडली.
- ज्यांनी टाटा मोटर्स चा शेअर दीर्घ कालावधीचे ध्येय ठरवून पोर्टफोलिओ मध्ये घेऊन ठेवला त्यांना याचा घसघशीत परतावा शेअर धारकांना मिळाला.
- अनेक ब्रोकरेज हाउसेस अजूनही टाटा मोटर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. यासाठी अजून काही कालावधी ठरवून गुंतवणुकीच्या विचाराने खरेदी केले तर भविष्यात टाटा मोटर्स आणखी वर जातांना पाहू शकू असे मत या ब्रोकरेज हाउसेस तर्फे देण्यात आले आहे.
- भारतामधील स्टॉक ब्रोकर जे गुंतवणूकदार आणि स्टॉक एक्सचेंज मध्ये दुआ म्हणून काम पाहतात . यांचे काम म्हणजे गुंतवणूकदारांसाठी शेअर तसेच मार्केटच्या इतर घटकांमध्ये खरेदी विक्री चे व्यवहार पाहणे . याबदल्यात ते गुंतवणूकदारांकडून ब्रोकरेज म्हणजे ठराविक शुल्क घेतात.
- शेअर मार्केटच्या चढ उताराचा फायदा घेत शेअर ची किंमत कमी झाल्यास सरासरी करण्यास मदत होते. यामुळे चढ्या भावाने कुठलाही शेअर घेतला असल्यास खालच्या पातळीला शेअर आला असल्यास खरेदी केली जाते. अर्थात प्रत्येक शेअर खाली जातोय याचा अर्थ नक्कीच असा नाही की खरेदीची वेळ आहे.
- कंपनी फंडामेंटल किती मजबूत आहे. बॅलन्स शीट या सगळ्या गोष्टी तपासून मगच अधिक पैसे गुंतवण्याचा विचार करावा. यासाठी वेळोवेळी आपल्या शेअर मार्केटच्या पोर्टफोलिओ शी निगडित मॅनेजर शी संपर्कात राहून सल्ला मसलत करून निर्णय घ्यावा .
हे वाचा : स्मॉल कॅप इंडेक्स म्हणजे काय ?
आपल्या दर्जेदार उत्पदनासाठी लोकप्रिय असणारे टाटा समूह या पुढे देखील भविष्यात नवनवीन संधी घेऊन शेअर धारकांना या सर्वांचा फायदा करून देतील अशी आशा करू शकतो.
आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. या सारखे माहितीपूर्ण लेख घेऊन पुन्हा लवकर भेटू. माहितीपर लेख आणि रंजक अशा कथा वाचण्यासाठी ‘ लेखकमित्र ‘ ला भेट द्या. आणि व्हॉटस अँप वर चॅनेल ला जॉईन व्हा.
धन्यवाद .
लेखिका : सौ. वैशाली जोशी पाठक ,पुणे