वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्याचे महत्त्व
एकविसाव्या शतकाने तंत्रज्ञानाच्या स्वरूपात जगाला अनेक देणग्या दिल्या, ज्या मुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडत आहेत.तंत्रज्ञानामुळे अक्षरशः बोटांच्या हालचालीतून अनेक सोयी सुविधांचा लाभ आपल्याला घेता येत आहे. एका क्षणात शिक्षण, नोकऱ्या, मनोरंजन इत्यादी चे अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध होत आहेत. ह्या सगळ्या उपलब्ध गोष्टींचा उपभोग घेण्याची आपली धडपड सुरू झाली.
एकंदरीत माहीतीचा अवाढव्य साठा आपल्या समोर उपलब्ध आहे . ही सगळी प्रलोभने, अवधानं, व्यवधानं सांभाळताना माणसाची चांगलीच तारांबळ उडते आहे त्यामुळे लहान थोर सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य सध्या ऐकायला मिळते….”काय करणार?…वेळच मिळत नाही…!!!” संपूर्ण मानवी जीवन तणावग्रस्त झाल्याचं दिसून येते आहे. सर्वत्र, मानवी जीवनातील “आनंदी सहजता” नष्ट झाल्याचे आढळून येत आहे.
म्हणूनच आजच्या ह्या गतीमान मानवी जिवनात ” वेळेचे व्यवस्थापन” ह्या संकल्पनेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. जर आपण वेळेचा सुयोग्य वापर केला, तर काही अंशी तणाव कमी होऊ शकतो. इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की, आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी ” वेळेचा सुयोग्य वापर” करणं अपरिहार्य आहे.

आरोग्य, पैसा व कुटुंब – नातेसंबंध हे तीन मानवी जीवनाचे महत्वाचे मुद्दे आहेत. एखादी व्यक्ती जीवनात यशस्वी आहे का? हे ह्या ३ मुद्यांवरून ठरवलं जातं. म्हणूनच आपल्याला उपलब्ध असलेले दिवसाचे २४ तास वरील तीन बाबींसाठी योग्य प्रकारे वापरता यायला पाहिजेत.आरोग्यासाठी आठ तासांची झोप, पैसे कमावण्यासाठी आपण नोकरी/ व्यवसाय करतो त्यासाठी आठ तास ही सरळसोट विभागणी झाल्यावर उरलेले आठ तास आपण कसे वापरतो? हे अतिशय महत्त्वाचे आहे.हे आठ तास आपल्याला अनेक गोष्टींसाठी वापरायचे असतात.
उदाहरणार्थ,
आपल्या कुटुंबियांसाठी नोकरी/ व्यवसाय ह्यासाठी करावा लागणारा प्रवास.
मनोरंजन: तणाव दूर करण्यासाठी रोज किमान एक तास मनोरंजनासाठी देणं आवश्यक असतं.
आपले छंद: आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपले छंद जोपासणे आवश्यक आहे.
सामाजिक जीवन : मित्र – मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्या साठी वेळ देणं आवश्यक असते कारण माणूस समुहात जगणारा प्राणी आहे.
समाज, परिसर, गाव, देश ह्या प्रती असलेल्या जवाबदाऱ्या पुर्ण करण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे कारण आपला समाज, परिसर, गाव, देश प्रगतीशील असेल तर आपणही प्रगतीशील रहातो.
तर आता समजून घेऊया, हे आठ तास सुयोग्य पद्धतीने वापरण्यासाठी आपण काय काय करु शकतो:
प्राधान्यक्रम ठरवा-
#महत्वाची आणि तातडीने करण्याची कामे जी तुम्ही स्वतः करायला हवीत
#महत्वाची पण नंतर केली तर चालतील अशी.
कामे जी तुम्ही स्वतः करायला हवीत
# दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पडण्यासाठी करायची कामे…जी तुम्ही मदतनिसांद्वांरे करून घेऊ शकता.
# अशी कामे जी केली नाही तरी चालतील अशी अनावश्यक कामं, जसं की उठसूठ लहान सहान बाबींसाठी फोन करणं, फुटकळ गोष्टींसाठी वादविवाद करणे.
कामांची यादी लिहून काढा – यादी लिहिल्याने अधिक स्पष्टता येईल, ज्या मुळे उपलब्ध असलेला वेळ आपण अधिक प्रभावीपणे वापरू शकू. ह्या बाबत अधिक माहिती पुढे येणारच आहे, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.एखादं काम पूर्ण करण्यासाठी काय पुर्व तयारी लागेल, हे समजून घ्या. त्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवून ते काम त्या वेळेतच पुर्ण करा.
आता पाहूया वेळ व्यवस्थापनाचे काही नियम व युक्त्या
१. सकाळी लवकर उठणे, त्यासाठी आदल्या दिवशी लवकर झोपणे आवश्यक.
२.प्रत्येक दिवशीच्या कामाची यादी करणं ( to do list) यात तुम्ही करणार असलेली ३ महत्वाची कामे व ३ जास्तीची नंतर केली तरी चालेल, अशी कामं.
३. पुढच्या दोन मिनिटात करण्याची कामं..ती करून टाकावी,जसं की वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन/ मेसेज करणं, धुण्यासाठी चे कपडे भिजवणं
४. जी रोज करायची , अंगवळणी पडलेली कामं, जसं की स्वयंपाक करणं, ही कामं करताना फोन बंद असणं आवश्यक आहे तसंच door बेल वाजली तर स्वतः न जाता इतरांना request करावी.
५. प्रत्येक कामाची एक वेळ व त्या वेळी ते काम. आपल्या एनर्जी लेव्हल व सवयी ह्या नुसार काही कामं फास्ट होतात…ह्या विभागात ,बरीचशी घरकामं व आपल्या व्यवसायाची रोज करायची कामं येतात.
६. प्रत्येक वस्तूची एक जागा व त्या जागेवर ती वस्तू.जसं की चाव्या, कागदपत्रे, मोजे-रुमाल-मास्क- छत्री,स्क्रु ड्रायव्हर ,इत्यादी … शोधण्याचा वेळ वाचतो.
७.कपाटं आवरणं साफसफाई करणं ही कामं एकाच दिवशी सुट्टी घेऊन करण्याऐवजी रोज घराचा एक विभाग आवरून घ्यावा किंवा साफसफाई करून घ्यावी.
८. Screen time ( mobile-TV) आटोक्यात ठेवणं.
९. Tecnology चा वापर…बिलं-हप्ते भरण्यासाठी , तुम्ही केलेल्या कामाचे पैसे स्विकारण्यासाठी, गुगल पे – online transaction चा वापर करणं. तुमचे products ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी courier services, pickup – drop services चा वापर करणं.
१०.एकाच प्रकारची कामं एकाच वेळी करणं..जसं की फोन / मेसेज करणं, Google Pay द्वारा पेमेंट करणं .Social media वर active रहाण्यासाठी तुमच्या व्यवसायाशी संबंधित posts प्रकाशित करणं, काही इतर posts नां reply देणं.
११. रोजची अंगवळणी पडलेली कामं फास्ट करण्याचा प्रयत्न करणं, हे करताना तटस्थ राहून ही कामं चक्क मॅकॅनिकली पार पाडणे,
१२. नव्या गोष्टी शिकताना विचारांचा गुंता न करता , वर्तमानात रहाणं.
१३. काही कामांसाठी इतरांच्या निर्णयाची आवश्यकता असते, योग्य संवाद साधत निर्णय प्रक्रिया पूर्ण करणं आणि एकदा योग्य निर्णय घेतल्यानंतर ते काम लवकरात लवकर पूर्ण करणं.
१४. आळशी, सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहाणं. त्या मुळे मनाचा उत्साह कायम रहातो व कामं जलद होतात.
१५. करायचं असं एखादं काम , जे एका ठराविक तारखेला पुर्ण करणं आवश्यक आहे, ते काम शक्यतो लवकरात लवकर पूर्ण होईल असं पहावं, त्या मुळे मनावर दडपण येत नाही आपली इतर कामं जलद होतात. ह्या विभागात ग्राहकांच्या ऑर्डर तसेच , हप्ते किंवा बिलांचं पेमेंट, कागदपत्रांचं नूतनीकरण ही कामं येतात.
१६.plan A, B,C तयार ठेवणं…जसं की मदतनीस गैरहजर राहिल्यास…
१७. फोनचा काटेकोर वापर… जसं की एक कॉल फक्त ३ मिनिटे ( अर्थात काही व्यक्ती/ परिस्थिती चा अपवाद)
१८.काही कामांसाठी पुर्व तयारी आवश्यक असते, जसं सण साजरे करणं, त्याची आखणी व कामाची आप- आपसात विभागणी करून घ्यावी.
१९. आवश्यक तिथे योग्य संवाद साधत मदतीची देवाणघेवाण करत काम पूर्ण करणं. ( शेजारी व आपली मित्र – मंडळी) त्या मुळे दडपण न येता ,कठीण कामही आपण पार पाडू शकतो.
२०. इतरांसाठी उपलब्ध न रहाणं : काही नवं शिकताना, किंवा , कधीतरी खुप कामं साचून रहातात ( जसं मोठ्या सुट्टी नंतर ) ती पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२१.” एका वेळी एकच काम ” हा कामं जलद पुर्ण करण्याचा मुलमंत्र आहे आणि अतिशय महत्त्वाचे, व्यसनांपासून दूर रहा.
व्यसनं म्हणजे वेळेचा दुरूपयोग…!!
तुम्हाला हा लेख कसं वाटला , कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या whatsapp ग्रुप ही जॉइन करा.
आभार ….!!
सौ. मुग्धा राणे , मुंबई