MBA साठी भारतातील सर्वोच्च १० कॉलेज l Top 10 colleges in India for MBA

WhatsApp Group Join Now

MBA साठी भारतातील सर्वोच्च १० कॉलेज

आजकाल पदवी संपादन केल्यानंतर MBA करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी असा समाज होता की फक्त कॉमर्स च्या विद्यार्थ्यांसाठी MBA हा कोर्स आहे. परंतु आता कुठल्याही क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी MBA चा  कोर्स करण्यास प्राधान्य देत आहेत. आणि याचे सर्वात महत्वाचे कारण आहे ते यानंतर मिळणाऱ्या जॉब च्या संधी आणि जास्तीत जास्त पगार. तसेच बरेच नवतरुण सध्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास उत्सुक असतात आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळवण्यासाठी ते MBA या कोर्स ची निवड करतात. चला तर मग आज जाणून घेऊया भारतातील टॉप १० संस्थांबद्दल ज्या MBA साठी बेस्ट आहेत. 

MBA म्हणजे काय? (What is the full form of MBA?)

MBA म्हणजे Masters of Business Administration. यालाच MMS (Masters of Management Studies) असेही नाव आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध पैलूंविषयी शिक्षण दिले जाते. त्यांना आवश्यक अशी व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात. हा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम असून हा भारतात तसेच जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. 

हा कोर्स पदवी, डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन अशा तिन्ही स्वरूपात करता येतो. 

MBA कोर्सचे फायदे: (Importance of MBA)

MBA मध्ये प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो तसेच हा कोर्स जगमान्य आहे त्यामुळे याचे अनेक फायदे आहेत. 

  • MBA केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट किंवा सरकारी ऑफिस मध्ये नोकरी मिळू शकते. तसेच जर तुम्ही टॉप इन्स्टिटयूट मधून MBA केलेत तर तुम्हाला परदेशी कंपनी मध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते. 
  • MBA हा कोर्स लोकप्रिय होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुम्हाला पगार खूपच चांगला मिळतो. तसेच तुम्हाला लवकर प्रोमोशन मिळण्यासाठी सुद्धा जा कोर्स मदत करतो. 
  • याशिवाय ह्या कोर्स नंतर तुमचे सॉफ्ट स्किल्स जसे की communication skills, creative thinking, decision making आणि leadership skills हे खूप चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. 
  • जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरु करायचा असेल तर तुम्हाला ह्या कोर्स ची खूप जास्त मदत होते. MBA मध्ये तुम्हाला व्यवसायाच्या विविध पैलूंबाबत शिकवले जाते जसे की, फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्स.
  • MBA हा कोर्स करताना तुमच्या अनेक नवनवीन ओळखी होतात आणि हे तुमचे नेटवर्किंग वाढवायला मदत करते. 

MBA चे प्रकार: (Types of MBA)

  • पूर्णवेळ (Full-Time): ह्या मध्ये पदवी नंतर विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ हा कोर्स करता येतो. ह्याचा कालावधी साधारणपणे २ वर्ष असतो. हा कोर्स डिग्री किंवा डिप्लोमा अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. ह्या साठी मुलांना प्रवेश परीक्षा देणे गरजेचे असते. 
  • अर्धवेळ (Part-Time): हा कोर्स वीकेण्ड ला किंवा संध्याकाळी घेतला जातो. काम करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. ह्याचा कालावधी साधारणपणे २-३ वर्ष इतका असतो. 
  • ऑनलाईन (Online): आताशा बऱ्याच कॉलेजेसनी आपले कोर्सेस हे ऑनलाईन स्वरूपात सुद्धा आणले आहेत. त्यामुळे आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून आपल्या वेळेनुसार हा अभ्यासक्रम करू शकतो. 
  • एक्झिक्युटिव्ह (Executive MBA): हा कोर्स प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या कडे किमान ३-४ वर्षांचा कामाचा अनुभव आहे. हा अनुभव त्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे ज्यात तुम्हाला MBA करायचे आहे. ह्या कोर्स चा कालावधी साधारणपणे १-२ वर्षाचा असतो. 

शैक्षणिक पात्रता: (Educational Qualification) 

MBA ला ऍडमिशन घेण्याआधी विद्यार्थ्यांनी कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेणे अनिवार्य आहे. तसेच विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. MBA च्या कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. CAT, MAH CET, NMAT, SNAP, XAT, ATMA या काही मान्यताप्राप्त प्रवेश परीक्षा आहेत ज्यांचे गुण भारतातील बऱ्याच कॉलेजेस मध्ये स्वीकारले जातात. याशिवाय काही खाजगी कॉलेज च्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा असतात. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन साठी बोलावले जाते. आणि मग त्यांचा interview घेतला जातो. या सर्व प्रवेश प्रक्रियेतून जे विद्यार्थी निवडले जातील त्यांना कॉलेज मध्ये प्रवेश दिला जातो. 

MBA मधील स्पेशलायझेशन: (Specialisation in MBA)

MBA चा कोर्स हा साधारणपणे ४ सेमिस्टर्स मध्ये विभागलेला असतो.  पहिल्या २ सेमिस्टर्स मध्ये बिझनेसशी संबंधित अनेक विषय शिकवले जातात. आणि मग ३ सेमिस्टर ला तुम्हाला तुमच्या आवडीचे कुठलेही एक किंवा दोन विषय निवडण्याची मुभा असते. ह्या विषयांना तुमचे स्पेशलायझेशन असे म्हटले जाते. MBA करत असताना खालील काही विषय हे स्पेशलायझेशन साठी लोकप्रिय आहेत. 

  • फायनान्स 
  • मार्केटिंग 
  • ह्यूमन रिसोर्सेस 
  • माहिती तंत्रज्ञान (IT)
  • व्यवसाय विश्लेषण (Business Analytics) आणि बिग डेटा 
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
  • आंतरराष्ट्रीय व्यापार 
  • लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट
  • ऑपरेशन्स 

भारतातील टॉप १० कॉलेजेस: (Top 10 Institutes for MBA in India)

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) तर्फे दिलेल्या २०२३ च्या रँकिंग नुसार भारतातील टॉप ची १० कॉलेजेस खालीलप्रमाणे आहेत:

  1. भारतीय व्यवस्थापन संस्था (अहमदाबाद) 
  2. भारतीय व्यवस्थापन संस्था (बेंगलोर)
  3. भारतीय व्यवस्थापन संस्था (कोझिकोड)
  4. भारतीय व्यवस्थापन संस्था (कलकत्ता)
  5. भारतीय तंत्रज्ञान संस्था (दिल्ली)
  6. भारतीय व्यवस्थापन संस्था (लखनऊ)
  7. भारतीय व्यवस्थापन संस्था (मुंबई)
  8. भारतीय व्यवस्थापन संस्था (इंदोर)
  9. झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI जमशेदपूर)
  10. भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई)

सरासरी फी आणि पगार: (Fee and Salary)

वरील नमूद केलेल्या कॉलेजेस ची फी हि साधारणपणे ८ लाख ते ३० लाख या मध्ये असते. परंतु याशिवाय सुद्धा अनेक चांगली कॉलेजेस भारतात आहेत ज्यांची सरासरी फी हि ५ लाख रुपयांपर्यन्त असते. 

तसेच जर तुम्ही टॉप १० कॉलेजेस मधून MBA चा कोर्स केला तर तुम्हाला पहिल्या वर्षी साधारणपणे २५-३५ लाख रुपये पगार वर्षाला मिळतो. आणि तुम्ही बाकीच्या चांगल्या कॉलेज मधून MBA केलात तर तुम्हाला वर्षाला सरासरी १०-१५ लाख पगार मिळू शकतो. 

MBA च्या वेगळ्या वाटा: (Uncommon Specialisation)

वरती नमूद केलेल्या लोकप्रिय विषयांशिवाय असेही काही विषय आहेत ज्यामध्ये विद्यार्थी स्पेशलायझेशन करू शकतात. हे विषय फार माहित असलेले किंवा लोकप्रिय नाहीत. परंतु यामध्ये सुद्धा करिअर करायला खूप वाव आहे. 

  • आरोग्य व्यवस्थापन 
  • ऑइल आणि गॅस 
  • पॉवर आणि एनर्जी 
  • एव्हिएशन 
  • पायाभूत सुविधा
  • गुन्हेगारी अन्वेषण 
  • क्लिनिकल संशोधन 
  • पर्यटन 
  • रिअल इस्टेट

आपल्याला ही MBA बद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top