वर्षापर्यटना बद्दल संपूर्ण माहिती-
पावसाळ्यामध्ये वातावरणात झालेले अमुलाग्र बदल हा पर्यटकांना खुणावत असतात,ज्यांना पर्यटनाची प्रचंड आवड आहे असे लोक या हिरव्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वर्षापर्यटन करतात,तुम्हालाही वर्षापर्यटन करायला आवडते का? तुम्हीसुद्धा वर्षा पर्यटनासाठी जाताय का?तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास लेख “वर्षापर्यटनाला जाताना काय टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती” चला तर मग आपण आपल्या आजच्या ब्लॉग ला सुरुवात करू.

वर्षापर्यटन म्हणजे काय?
वरील हेडलाईन वरून सर्वांना वर्षापर्यंटन म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल.अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वर्षा पर्यटन म्हणजे पावसाळ्यात पर्यटनाला जाणे,पावसाळ्यात निसर्गात झालेला बदल हा अगदी डोळ्यात भरण्यासारखा असतो इतर वेळी ऋतू बदल हा सहसा जाणवत नाही. पण वरूण राजाचे आगमन झाले की निसर्ग अगदीच बदलून जातो.हिरवा शालू पांगरून बसलेला डोंगर, डोंगराच्या कपाऱ्यातून वाहणारे झुळझुळ झरे, पावसाच्या आगमनाने दुथडी भरून वाहणारी नदी आणि पावसाच्या पाण्यामुळे नव्याने पालवी फुटलेले झाड.हे सगळे दृश्य आपल्याला पावसाळ्यातच पाहायला मिळते निसर्ग अगदी मनमुराद हसताना आपल्याला फक्त पावसाळ्यातच दिसतो.हा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपणही वर्षापर्यटन केलेच पाहिजे.
वर्षापर्यटन म्हणजे निसर्गाच्या अगदी जवळ जाणे शहरीकरणापासून थोडेसे विभक्त होऊन निसर्गाशी एकरूप होणे. पावसाळ्यात निसर्गाचा मनमुराद आनंद अनुभवण्यासाठी वर्षा पर्यटननक्की करा. एका वाक्यात सांगायचे झाले तर वर्षापर्यटन म्हणजे पावसाळी सहल होय. वर्षापर्यटना मध्ये कशाचा आनंद घेता येतो, डोंगराच्या माथ्यावरती ढगांची झालेली गर्दी, हिरवा फुललेला निसर्ग, घाटमाथ्यावरती झालेली ढगांची गर्दी,हरित डोंगरामधून वाहणारा धबधबा,कुठे धुके,तर कुठे झाडांवर आलेली हिरवळ सोबतच पावसाच्या रिमझिम सरी इतर वेळी हे निसर्गाचे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळणे अवघडच आहे, वर्षापर्यटनामध्ये आपल्याला या गोष्टीचा आनंद घेता येतो.
वर्षापर्यटनाला जात आहे तर या संरक्षणात्मक काही टिप्स नक्की वाचा-
1) पावसाळ्यात फिरायला जाणे हे जरी आनंद देणारे असले तरी ते तितकेच आव्हानात्मक देखील आहे .वातावरणात झालेला बदल हा पावसाळ्यात निसर्गाचे क्षणात रूप बदलू शकतो त्याची खबरदारी घेऊन आपण वर्षापर्यटन करणे गरजेचे आहे.
2) वर्षा पर्यटनाला जाताना सोबत छत्री आणि रेनकोट घेऊन जावे.
3) पावसाळ्यात फिरायला जातात शक्यतो चप्पल वापराव्यात, शूज चा वापर टाळावा.कारण ओले राहिलेले शूज हे शरीरात थंडावा निर्माण करतात यामुळे थंडी लागून आपण आजारी पडण्याची शक्यता असते.
4) पावसामुळे डोंगरातून प्रवाहित झालेल्या धबधब्यांमध्ये थोडे काळजीपूर्वक जावे.
5) पावसामुळे प्रवाहित झालेल्या नद्यांमध्ये पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज आधी घेणे गरजेचे आहे.
6) वर्षा पर्यटन करताना जर तुम्ही पावसामध्ये भिजत असाल तर घरी येऊन स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आंघोळ करणे गरजेचे आहे.
7) साठलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये जर तुम्ही भिजत असाल तर घरी आल्यानंतर त्वरित स्वच्छ पाण्याने अंघोळ करून कपडे बदलून घ्यावीत
9) जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगला जात असाल तर तुम्ही विशेष वेगळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ट्रेकिंग साठी लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे, जसे की बॅटरी,दोरी,काठी इत्यादी साहित्य तुम्ही सोबत ठेवणे गरजेचे आहे तसेच इमर्जन्सी मध्ये लागणारे खाद्यही सोबत ठेवावे
10) ट्रेक करताना उंचीचा अंदाज घेऊच ट्रेकला जावे.
11) पावसाळी सहलीला जाताना फोर व्हीलर डोंगराच्या आसपास किंवा जिथे डोंगरावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणी पार्क करू नये.
12) वाहत्या पाण्यामध्ये जर पोहायला येत असेल तर आत उतरताना विशेष खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशा ठिकाणी शक्यतो जाणे टाळा.
13) वर्षा पर्यटनाला जाताना जर तुमच्यासोबत एखादे लहान मुल असेल तर त्या मुलाला वाहत्या पाण्यापासून थोडेसे दूर ठेवा.
14) पावसात भिजून ओले झाले असाल तर विद्युत उपकरणापासून थोडेसे दूर राहा, ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते.
15) पावसाळ्यात फिरायला गेल्या नंतर शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे.
16) पावसाळ्यात फिरायला जातात वन्यजीवापासून थोडेसे सावध राहणे गरजेचे आहे, सरपटणारे प्राणी आणि जलचर प्राणी यापासून स्वतःचा बचाव करता येईल असे उपकरण सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.
पावसाळी सहलीला जाताना साहसा सोबतच थोडी खबरदारी घेतली तर तुमची पावसाळी सहज आनंदात पार पडू शकते.
पावसाळी सहल आणखी आनंदित करण्यासाठी काही खास टिप्स-
1) वर्षा पर्यटनाला जाताना सोबत काही गरम कपडे देखील घेऊन जावे, हवेत ओलावा निर्माण झाल्यामुळे थंडी वाजण्याची शक्यता असते.
2) पावसाळी सहलीला जातात जर तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्ही सोबत ताबडतोब बनवता येईल असे काही पदार्थाचे सामान घेऊ जाऊ शकता.
3) पावसाळी सहलीचा आनंद वाढवायचा असेल तर जाताना चहा साठी लागणारे साहित्य घेऊन जा.निसर्गाच्या सानिध्यात गरमागरम चहा पिण्याचा आनंद हा काही निराळाच असतो.
4) खाण्यासोबतच जर तुम्हाला संगीताची देखील आवड असेल जाताना सोबत स्पीकर घेऊन जाऊ निसर्गाच्या सानिध्यात निवांत बसून तुमच्या आवडत्या गायकाची गाणी ऐकणे म्हणजे स्वर्ग सुख होय.
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या अनुषंगाने लिहिण्यात आलेला हा वर्षा पर्यटनाविषयी माझा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, सोबतच मी दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि वर्षा पर्यटनाला जातात तुम्ही या टिप्सचा उपयोग केला होता हे ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की . तुमच्या सूचना आणि कमेंट्स चे स्वागतच राहील. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लेखकमित्र वेबसाईटला भेट देत रहा आणि वाचत राहा.
Adv.विनिता मोहळकर.
Adorable