नमस्कार ,
फेब्रुवारी महिना – प्रेमाचा महिना! ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा आठवडा- व्हॅलेंटाईन वीक, म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ येत असताना हा प्रेमाचा महिना आणि आठवडा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. या लेखात व्हॅलेंटाईन वीक मध्ये प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती आणि त्या प्रस्थापित होण्यामागच्या छोट्या गमतीशीर घटना याची माहिती वाचायला मिळेल.
व्हॅलेंटाईन सप्ताहाच्या पाचव्या दिवसाबद्दल म्हणजेच वचन दिवस- प्रॉमिस डे कसा साजरा करावा या बद्दल या लेखात उपयुक्त संकेत (टिप्स) मिळतील. या लेखाचा तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या व्यक्त होण्याच्या दिवसांचे स्वागत करण्यासाठी निश्चित उपयोग होईल .
व्हॅलेंटाईन डे हे नाव कसे पडले याच्या २ वेगवेगळ्या अख्यायिका सांगितल्या जातात. काळानुरूप त्याचे संदर्भ आणि व्याप्ती बदलत गेली .त्यात राजकीय राजकारण मग आर्थिक राजकारण मग विविध देशात विविध संदर्भ देऊन या उत्सवाला वेगवेगळे रूप देण्यात आले. प्रामुख्याने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आणि जीवनभर साथ देणाऱ्या आणि देऊ इच्छिणाऱ्या प्रेमिकांसाठी या दिवसांचे महत्व दिसून येते.
कुठलेच नाते नेहमीसाठी परफेक्ट कधीच नसते. नात्याला मजबूत करणे, मजबूत ठेवणे हीच प्रत्येकाची प्राथमिकता असली पाहिजे आणि त्यासाठी व्हॅलेंटाईन दिवस किंवा सप्ताहासारखे उत्सव जगभरात साजरे केले जातात.दोघांमधील नाते मजबूत करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
पाहूया हे दिवस कुठल्या क्रमाने येतात :
७ फेब्रुवारी पहिला दिवस Rose day – गुलाबाचा दिवस
गुलाबाच्या फुलाला जगभरात प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. व्हॅलेंटाइन्स वीकची पहिल्या दिवसाची सुरूवात गुलाब फुले देण्यापासून पासून होते.
ग्रीक आणि रोमन सभ्यते मध्ये गुलाबाच्या फुलाला प्रेमाच्या देवता एफ्रोडिटी आणि वीनसबरोबर जोडलं गेलं आहे. देवांचं जेवण अमृत होतं. क्यूपिड यांनी प्रेमाची देवता असलेल्या आपल्या आई साठी, देवी वीनससाठी अमृत घेऊन आणले,तेव्हा अमृताचे काही थेंब त्या जागेवर पडले आणि त्याच जागी पहिले गुलाब फुल उगवले, अशी कथा सांगितली जाते.
गुलाब या फुलाला प्रेमाशी अडीचशे वर्षापासून जोडलं गेलेलं आहे.
व्हॅलेंटाईन डेला दिलेल्या गुलाब फुलाचा रंग निवडताना त्या रंगाचा अपेक्षित अर्थ लक्षात घेतला जातो.
लाल गुलाब- पारंपारिक प्रेमाचे प्रतीक आहे
गर्द गुलाबी – आनंदाचे प्रतीक आहे
जांभळा रंग – एकनिष्ठतेचे प्रतीक आहे
पांढरा रंग – समंजसपणाचे, शांततेचे प्रतीक आहे
पिवळा रंग – मैत्रीचे प्रतीक आहे
या गोष्टी लक्षात घेऊन एक किंवा अधिक गुलाबाच्या रंगाची निवड केली जाते.
८ फेब्रुवारी दुसरा दिवस Propose day – प्रेम प्रस्ताव दिवस
व्हॅलेंटाईन वीक चा हा दुसरा दिवस ! या दिवसामागे कोणतीही ऐतिहासिक कथा नाही. वर्षानुवर्षे पाश्चिमात्य संस्कृतीत हा दिवस साजरा केला जात आहे. पण, आता जवळपास प्रत्येक देशात तो आपापल्या पद्धतीने साजरा केला जातो. हव्या असलेल्या व्यक्तीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवणं हे तसे अवघड काम आहे. म्हणूनच लोक या विशिष्ट दिवसाची वाट पाहत असतात.
कधी, कुठे, कसे इथे जर प्रेमाची गाडी अडकली असेल तर हा दिवस मोठीच मदत करतो.
९ फेब्रुवारी तिसरा दिवस Chocolate day – चॉकलेट दिवस
याची सुदधा एक कहाणी आहे. १८६१ मध्ये कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांच्या मुलाने, रिचर्ड कॅटबरी याने चॉकलेट चा हृदयाच्या आकाराचा फॅन्सी बॉक्स व्हॅलेंटाईन चॉकलेट डे ला विक्री वाढवण्यासाठी तयार करणे सुरू केले. याला लोकांकडून प्रचंड मान्यता मिळाली आणि प्रतिसाद मिळाला.
सध्या तर एका चॉकलेट पासून विविध आकाराचे चॉकलेट गिफ्ट हॅम्पर पर्यंतचे सर्व पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
१० फेब्रुवारी चौथा दिवस Teddy day – टेडी बिअर भेट देण्याचा दिवस
१९०२ साली,अमेरिकेचे अध्यक्ष टेडी रुझवेल्ट जंगलात शिकारीला गेले असता, त्यांना अस्वल दिसले , अस्वलाला त्यांच्या साथीदारांनी झाडाला बांधून ठेवले. अस्वल सुटकेसाठी ओरडत राहिले त्या अक्रोषामुळे टेडी रुझवेल्ट यांना अस्वलाची दया आली आणि अस्वलाला सोडून दिले. टेडी रुझवेल्ट यांना ही अस्वस्थ भावना जाहीर करावीशी वाटली . दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात टेडी रुझवेल्ट यांनी अस्वलाचे चित्र छापून आणले आणि घडलेली घटना मांडली.
ते कार्टून पाहून प्रभावित झालेल्या मॉरिस मिचटॉम या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाला तसेच अस्वल बनवण्याची इच्छा झाली.त्याने तशी अस्वलाच्या कार्टून ची खेळणी बनवली आणि त्याला टेडीबिअर हे नाव दिले. तेव्हा पासून टेडी बिअर हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. व्हॅलेंटाईन डे च्या चौथ्या दिवशी टेडी देण्याची प्रथा पडली. तरुणींमध्ये त्याची लोकप्रियता वाढल्याने टेडी ची मागणी ही दिवसेंदिवस वाढते आहे. छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत हे टेडी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. तरुणींवर छाप पाडण्यासाठी बरेच तरुण या पर्यायाचा भेटवस्तू म्हणून विचार करताना दिसतात.
पहिल्या चारही दिवसात अनुक्रमे गुलाबाची फुले देणे, प्रपोज करणे, चॉकलेट्स देणे, टेडी भेट देणे हे करू शकता.
११ फेब्रुवारी पाचवा दिवस Promise day – वचनाचा दिवस
प्रॉमिस डे दरवर्षी 11 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन आठवड्यातील पाचवा महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
-वचन म्हणजे काहीतरी करण्याची किंवा न करण्याची वचनबद्धता आणि तशी कृती करण्याची घोषणा करणे होय.( उदा. मी यापुढे नेहमीच वेळेत येईन किंवा या पुढे मी कधीही उशीर करणार नाही.)
– यात प्रामुख्याने तुम्ही आयुष्यात जास्त यश मिळवण्यासाठी कष्ट कराल, वाईट सवयी किंवा व्यसने सोडून द्याल,व्यक्तीमत्वात आणि जीवनात आवश्यक ते बदल कराल, नात्यास बाधक असलेल्या गोष्टी करणार नाही , जसे की वेळ पाळणे, संवाद साधणे अशा गोष्टींचा वचन देण्यासाठी उपयोग करू शकता.
– पार्टनर चे मन जिंकायचे असेल तर आपल्या आवडी पेक्षा समोरच्याची आवड, गरज, भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन लक्षात घेणे देखील आवश्यक आहे.
-मुलींना जर टेडी , गुलाब आवडत असतील तर नक्कीच भेट म्हणून देयला हवे पण सोबत च जर त्यांच्या आवडीचे आणि अपेक्षित काही शाब्दिक वचन दिले तर नाते बहरून येयला मदत होईल.
आपण वचनदिन २०२४ कोणत्या मार्गाने साजरा करू शकतो ते जाणून घेऊया.
काही लक्षात घेण्यासारखे महत्वाचे मुद्दे –
१)वचन देणे ही एक अत्यंत परिणामकारक कृती आहे. कुणालाही अपेक्षित किंवा अनपेक्षित वचन मिळाले की आनंद होतो. परंतु आपण कोणते वचन देत आहोत याचे भान मात्र हवे.पूर्ण करता येईल असेच वचन देता आले पाहिजे.
२) वचन देताना वचनपूर्ती ची जबाबदारी घेतली पाहिजे.
३)विचारपूर्वक आणि मनापासून दिलेल्या वाचनामुळे नाते दृढ होण्यासाठी मदत होते.
४) वचन दिल्याने नात्यात आणि व्यक्तीमत्वात देखीलसकारात्मक बदल होतात.
५)नात्यात सहजता आणण्यासाठी, नात्यात आलेले आधीचे सर्व अवघड क्षण, प्रसंग, अनुभव लक्षात घेऊन प्रेमाने आणि काळजीपूर्वक एकमेकांना वचने दिली पाहिजेत. जसे की एखादी गोष्ट आपल्या पार्टनरला आवडत नाही असा जर पूर्वी अनुभव आला असेल तर ती गोष्ट लक्षात ठेऊन टाळली पाहिजे आणि ती पुन्हा घडणार नाही असे वचन दिले पाहिजे , जेणे करून नात्यातील ताण निघून जाईल.
वचनाच्या दिवशी प्रामुख्याने लक्षात घेण्याच्या गोष्टी
वचन देताना
-नाते अधिक दृढ होईल हा विश्वास निर्माण झाला पाहिजे,
-नाते अधिक फुलून येईल हे पहिले पहिजे.
-नात्यात पारदर्शकता असणे महत्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
– नात्यात निरपेक्षता दिसली पाहिजे.
– आनंदात आणि दुःखात तुम्ही नेहमीच पार्टनर च्या बरोबर असाल याची खात्री पार्टनर ला वाटली पाहिजे.
– दीर्घकाळ नाते टिकवण्यासाठी एकनिष्ठ राहण्याचे वचन प्रमुख भूमिका बजावते हे लक्षात घेतले पाहिजे.
आपण वचनदिन २०२४ कोणत्या मार्गाने साजरा करू शकतो ते जाणून घेऊया.
१) हस्तलिखित पत्र – स्व हस्ताक्षरात लिहिलेले पत्र हे नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी साधन आहे.
वचनदिवशी तुम्ही असे स्वतः लिहिलेले पत्र देऊ शकता. तुमच्या जोडीदाराला देऊ इच्छित असलेल्या प्रतिज्ञा एका रंगीत आणि सुगंधी पानावर लिहू शकता.
२) प्रॉमिस कार्ड्स
तुम्ही तुमच्या वचनांची यादी तयार करून ती प्रॉमिस कार्ड्स वर लिहून छान रोल मध्ये घालून भेट देऊ शकता. हे देखील जोडीदाराला खुश करण्याचे प्रभावी तंत्र आहे. अशी प्रॉमिस कार्ड्स बाजारात उपलब्ध आहेत.
३) प्रेम करार
प्रेम करारामध्ये नात्यातील दोन्ही व्यक्तींचा विचार करून मुद्दे मांडता येतात. वदेण्याऐवजी काही आश्वासक गोष्टींची पूर्तता आणि काही गोष्टींचा मागण्या दोन्हींचे मिळून करार स्वरूपात कच्चा मसुदा लिहून त्या वर एकमेकांच्या साक्षीने सह्या करा. या कृतीतून एकत्रपणाचा वेगळा आनंद तुम्हाला मिळेल.
४)दागिने: सर्वसाधारणपणे तरुणीं अंगठी आणि लॉकेट हे दोन्ही दागिने अखंड प्रेमाचे प्रतीक म्हणून स्वीकारतात. एखाद्या वचन वाक्या सोबत तुम्ही हे भेटीचे क्षण प्रेयसीच्या मनात कायमस्वरूपी कोरू शकता.
५) गाणे – प्रेम व्यक्त करणारी असंख्य गीते you tube वर उपलब्ध आहेत. गाण्यातून प्रेमाचे वायदे देणाऱ्या ओळी भावूक आणि कलात्मक रीतीने मैत्रिणीचे,प्रेयसीचे मन जिंकू शकतात.तुम्ही गाऊ शकत असाल तर तुम्ही अशा ओळी गाऊन त्यातून एखादे वचन देऊ शकता. गाण्यातील शब्द वाक्यातील शब्दांचा भार नेहमीच हलका करतात. तुम्ही यासाठी वैयक्तिक स्पॉटीफाय प्लेक देखील मिळवू शकता.
६) स्वतः बनवलेले भेट कार्ड तुमच्या प्रियजनांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही हाताने बनवलेले कार्ड बनवू शकता आणि त्या कार्डमध्ये सुंदर छोटी वचने लिहू शकता.
७) भेट वस्तूंनी भरलेली सुबक टोपली /गिफ्ट हॅम्पर बास्केट भेट म्हणून देऊ शकता. तुम्ही कधीही मोडणार नाही असे अनुकूल वचन त्या वर लिहू शकता.
८) कॉफी मग तुमच्या दोघांची नावे कोरलेला. आणि किंवा दोघांचा फोटो छापलेला कॉफी मग देऊ शकता.त्यावर छोटेसे वचन देखील लिहू शकता
या पैकी तुम्हाला आवडेल ती एक किंवा अधिक कल्पना तुम्ही तुमच्या पद्धतीने साकार करा.
१२ फेब्रुवारी hug day – मिठी मारून आपुलकी आणि जवळीक निर्माण करण्याचा दिवस .
तुमच्या मिठीतुन समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना संक्रमित होत असतात.प्रेमिकेला तुमच्या योग्य प्रकारे मारलेल्या मिठीतुन निर्मळ मैत्री, कोमल प्रेम, भक्कम आधार, विश्राम या भावना पोहोचतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
१३ फेब्रुवारी kiss day – चुंबन देऊन एकमेकात एकरूपता आणण्याचा दिवस.
जिच्याशी तुम्ही आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिले आहे, आणि जिने त्याचा सहर्ष स्वीकार केला आहे, अशा प्रमिकेला तुम्ही या दिवशी चुंबनाचा उपहार देऊ शकता.
१४ फेब्रुवारी – प्रेमाचा पवित्र दिवस
हा पूर्ण दिवस तुम्ही आवडी प्रमाणे celebrate करू शकता .
-उपलब्ध वेळेनुसार दोघांच्या सोयीने लाँग ड्राईव्ह वर जाता येईल.
-स्वतः बनवलेले जेवण किंवा नाश्ता देऊ शकता
-एखादी अशी गुपित गोष्टीची भेट वस्तू जी आधीच्या तुम्हा दोघांच्या सुंदर क्षणांना परत जिवंत करेल .
– आवडीची कुठलीही गोष्ट जसे की सिनेमा पाहणे, बागेत जाणे, ट्रेक ला जाणे, आवडत्या भेटीच्या ठिकाणी जाणे असे ठरवता येईल.
– जर आधीच्या ७ ते १३ तारखेच्या दिवसात तुम्हाला भेट देणे जमले नसेल तर गुलाब, टेडी, कॉफी मग, दागिना आणि इतर भेटवस्तू तुम्ही या दिवशी भेट देऊ शकता .
शेवटचा पण महत्वाचा मुद्दा :
व्हॅलेंटाईन वीक मध्ये फक्त जीवन साथी किंवा प्रेयसीच नाही तर, ज्या व्यक्तीविषयी आपल्याला हृदयापासून प्रेम, माया, कृतज्ञता वाटते त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी सुधा हा दिवस म्हणजे एक संधी आहे.
आपले आई, बाबा आणि भाऊ, बहिण शिवाय बेस्टफ्रेंड यांना त्यांच्या आवडत्या भेट वस्तू, पत्र,कार्ड इत्यादी देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात.
त्यासाठी प्रामाणिक पणे जे वाटते ते करणे हे सर्वात उत्तम होय.
आपल्याला हा लेख कसा वाटला ? प्रतिसाद नक्की द्या. शिवाय आपल्याकडे अजून काही नवीन कल्पना असतील तर त्याही कॉमेंट मधे नक्की सांगा.
माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारा सोबत लगेच शेअर करा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका : सौ.ज्योती आनंद एकबोटे
Sweet article for a sweet celebration of Valentines day !
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.