Vasant Panchami in Marathi :आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे सण, उत्सव साजरे केले जातात त्यांना केवळ धार्मिक अथवा सांस्कृतिक अधिष्ठान असते असे नाही; तर ऋतुचक्र / निसर्गचक्रानुसार या सणांना स्वत:चे असे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
भारतीय कालगणनेमध्ये सहा ऋतू आहेत – वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर!
प्रत्येक ऋतू हवामानबदलावर आधारित आहे. प्रत्येक ऋतूमध्ये जे सण आणि उत्सव आहेत ते त्या त्या वेळी असलेले हवामान आणि नैसर्गिकस्थिति यानुसार साजरे केले जातात.
आज या लेखाद्वारे आपण ‘सर्व ऋतूचा राजा वसंत ऋतू’ आणि या ऋतूमध्ये साजरा होणारा पहिला सण ‘वसंत पंचमी’ (Vasant Panchami in Marathi)कसा साजरा केला जातो याबद्दल जाणून घेऊ.
मराठी दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुद्ध पंचमी ही ‘वसंत पंचमी’ म्हणून ओळखली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा सण साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस येतो.
‘वसंत पंचमी’ या सणाला नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भावनिक, सामाजिक असे विविध पैलू प्राप्त झाले आहेत.
वसंत पंचमी का साजरी केली जाते?
ऋतूबदल – वसंत पंचमी म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस! मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू असते. त्यादरम्यान हा सण येतो. या काळात शिशिराची पानगळ संपून निसर्ग नव्याने कात टाकतो. वृक्षवल्ली नव्याने बहरतात. कोकीळ पक्ष्याच्या गाण्याने सकाळ होते तर रात्र प्रसन्न, आल्हाददायी असते. डोंगररांगा धुक्याची चादर ओढतात. पाने-वेली रंगीबेरंगी फुलांनी नटतात. सारी सृष्टि मुक्तहस्ताने वसंतोत्सव साजरा करते.
देवी सरस्वती जयंती – देवी सरस्वतीचा जन्म माघ शुध्द पंचमी म्हणजे वसंत पंचमीला झाला असा आपल्या पुराणात उल्लेख आढळतो. यादिवशी देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. सुंदर फुलांची आरास केली जाते. नारळाची बर्फी, बुंदीचा लाडू, निरनिराळ्या प्रकारचे राजभोग असा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात.
देवी सरस्वतीच्या जन्माविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक सर्वमान्य कथा अशी की जेव्हा श्री ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली तेव्हा त्यात कोणताही आवाज, नाद, वाणी नव्हती. सारे काही शांत, निस्तेज, चैतन्यहीन होते. त्यावेळी श्री ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंडलुतिल दिव्य असे पाणी पृथ्वीवर शिंपडले. त्या दिव्य जलाच्या प्रभावाने तेथे साक्षात एक देवी अवतरली. तिने शुभ्रवस्त्रा होती, म्हणजे तीने पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती. ती चतुर्भुजा होती म्हणजेच तिला चार हात होते. एक हातात पुस्तक, दुसऱ्या हातात माला, तिसरा हात वर हस्तमुद्रा धारण करून तर चौथ्या हातात वीणा होती. तीच देवी सरस्वती होय. तिच्या विणेच्या झंकाराने सृष्टीत चैतन्य पसरले. सर्वांना वाणी प्राप्त झाली. म्हणून देवी सरस्वतीस वागीश्वरी, वाग्देवी, शारदा, वीणाधारिणी अशी अनेक नवे आहेत.
सांस्कृतिक उत्सव – देवी सरस्वती ही विद्या आणि संगीतकलेची देवता आहे. म्हणून वसंत पंचमी या तिच्या जन्मदिनी पुस्तके, संगीतवाद्ये, व्यावसायिक उपकरणांची पूजा केली जाते. निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. याठिकाणी ज्ञान आणि कलेची उपासना करणारे साधक देवीच्या चरणी आपली कला सादर करतात. या दिवशी पतंग उडवले जातात.
शिक्षणाचा श्रीगणेशा – वसंत पंचमी या सणाला शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. आजही भारतातील अनेक प्रांतामध्ये हा दिवस लहान मुलांच्या औपचारिक शिक्षणाची सुरवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. काही ठिकाणी दसऱ्याप्रमाणेच या दिवशीसुद्धा शैक्षणिक साहित्यांचे पूजन केले जाते. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सरस्वतीवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
प्रेमाचा ऋतू – असे म्हणतात की वसंत पंचमी हा कामदेवाचा सुद्धा जन्मदिवस आहे. त्यामुळे हा दिवस प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. वसंत ऋतुला प्रेमाचा ऋतू असेही संबोधले जाते. कारण या काळात सृष्टीत जो बहर आलेला असतो, चैतन्य असते ते माणसाच्या मनातील अत्यंत पवित्र अशा प्रेमभावनेला पूरक असते. वसंत पंचमीपासून विवाह तसेच इतर मंगल कार्यासाठी शुभ मुहूर्त सुरू होतात.
कृषि आणि बागायती – वसंत पंचमी हा सण शेतकरी आणि बागायतदार यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या काळात शेतात नवीन पीक तयार झालेले असते. बागेत आंबा तसे अन्य झाडांना मोहोर येतो. भारतात काही प्रांतात या दिवशी कृतज्ञता म्हणून ‘नवान्न इष्टी’ नावाचा यज्ञ केला जातो. शेतातील नवीन पिकाच्या लोंब्या देवाच्या चरणी अर्पण केल्या जातात.
पिवळा रंग – वसंत पंचमीच्या उत्सवामध्ये पिवळ्या रंगाचे फार महत्व आहे. या दिवशी लोक पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. सजावट, आरास करताना पिवळ्या रंगाच्या फुलांचा, विशेषत: झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. नैवेद्य आणि जेवणामध्ये केशरचा वापर करून पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवले जातात.
वसंत पंचमी कशा पद्धतीने साजरी केली जाते?
आतापर्यंत आपण वसंत पंचमी हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो पाहिले. भारतात निरनिराळ्या राज्यात हा सण निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो ते जाणून घेऊ.
पंजाब – पंजाबमध्ये वसंत ऋतूचे आगमन या दृष्टीने वसंत पंचमी साजरी करतात. येथे गुरुद्वारांमध्ये निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. घरावर, गच्चीवर, शेतात, मोकळ्या मैदानात पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो.
उत्तर प्रदेश – येथे काशी, वाराणसी या ठिकाणी ‘गंगाउत्सव’ साजरा होतो. कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केले जाते. मथुरा वृंदावन मध्ये राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाचा उत्सव साजरा करतात. लोक पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. पिवळ्या, भगव्या रंगाच्या फुलांनी देवाची आरास करतात.
पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल मध्ये वसंत पंचमीदिवशी अत्यंत मोठ्या प्रमाणात सरस्वतीपूजेचे आयोजन केले जाते. मोठे मंडप उभारून त्यात देवी शारदेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. सुंदर आरास, सजावट केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्त्राला खूप महत्व आहे. देवीच्या चरणी पुस्तके, वह्या, लेखणी ठेवून पूजा करतात. देवीचरणी फुले वाहतात. लहान मुलांच्या पाटीवर मुळाक्षरे काढून त्याची पूजा करतात. त्या दिवशी त्या मुलांचा शिक्षणाची सुरुवात होते.
मध्यप्रदेश – मध्यप्रदेशामध्ये या दिवशी देवी सरस्वती जयंती उत्साहात साजरी केली जाते. शाळा आणि शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ठिकठिकाणी पारंपारिक संगीत आणि नृत्याचे सादरीकरण केले जाते.
बिहार – बिहारमध्ये सरस्वती पूजन केले जाते. काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करतात, मनोभावे पूजा करतात आणि यथासांग नदीकिनारी मूर्तीचे विसर्जन करतात.
राजस्थान – वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त येथे घराघरत तसेच सार्वजनिक ठिकाणी पिवळ्या फुलांची आकर्षक सजावट केली जाते. सारेजण पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. गळ्यात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा घालतात.
तामिळनाडू – या राज्यात वसंत पंचमीला ‘श्री पंचमी’ असेही संबोधले जाते. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्म झालं तसेच कालांतराने याच दिवशी देवी पार्वतीचा भगवान शिवशंकरांसोबत विवाह झाला असे मानतात. शाळा, शिक्षणसंस्था तसेच निरनिराळ्या धार्मिक स्थळी कार्यक्रम आणि उत्सवाचे आयोजन होते.
थोडक्यात वसंत पंचमी हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक बहुरंगी, बहुढंगी आणि बहुआयामी असा सण आहे. माणसाच्या दैनंदिन जीवनातील अनेक आनंददायी गोष्टींना स्पर्श करणारा, त्यांचा उत्सव साजरा करणारा असा हा सण आहे. आनंद, उत्साह, प्रेम, समर्पण, भक्ति, कृतज्ञता अशा अनेकविध भावभावनांचे प्रतीक असं हा सण आहे. आपली संपन्न प्राचीन परंपरा, एकता आणि अखंडतेचे उदाहरण आहे.
वसंत पंचमी 2024 कधी आहे ?
यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारी रोजी आहे. पाश्चात्य देशात हा दिवस जागतिक प्रेमाचा दिवस मानला जातो. आपण या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार उत्सव साजरा करूया. ऋतुराज वसंताच्या आगमनाचा आनंद घेऊया. ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील वसंतऋतूच्या आगमनाचे तसेच त्यावेळी होणाऱ्या ऋतूबदलाचे अतिशय सुंदर आणि चपखल वर्णन करणारे गाणे पुन्हा पुन्हा म्हणूया
“ऋतुराज आज वनी आला,
ऋतुराज आज वनी आला
नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेउनी आला..”
तुम्हाला वसंत पंचमी (Vasant Panchami in Marathi) या सणाची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेयर करायला विसरु नका. अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटल नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
धन्यवाद
कविता सामंत नायक
वसंत पंचमी ला सरस्वती पूजन करतात. पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणावर हा उस्तव साजरा करतात हे माहीत होते पण बाकीच्या राज्यात सुद्धा विविध पद्धतीने साजरा करतात हा लेख वाचल्यावर कळले.
अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे.
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
सुन्दर माहिती… विषय आणि शब्दरचना सुद्धा छान..
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
खूपच सुंदर आणि आताच्या पिढीसाठी आवश्यक असं उपयुक्त लिखाण.
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
खूप छान सुंदर माहिती
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
very informative write up, congratulations…
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
खूप छान आणि मुद्देसुद माहिती. लिहित रहा धन्यवाद.
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.
भारतात वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे याचे सुंदर विश्लेषण केले आहे.🙏
धन्यवाद 🙏
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या. तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.