प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना l Vishwakarma Scheme full information  in Marathi

WhatsApp Group Join Now

Prime Minister Vishwakarma Scheme in Marathi :सध्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या बातम्या वाचायला/ ऐकायला मिळतात. एकीकडे देश प्रगतीपथावर चालला आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर पोचली आहे. तर दुसरीकडे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालल आहे. आणि हीच तफावत कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करतच आहे. कुशल कारागीर, शिल्पकार आणि श्रमिक यांच्या कलेला वाव मिळून त्यांना रोजगार प्राप्त  करून देण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने अशीच एक नवीन योजना आणली आहे. ही योजना नक्की कोणती आहे? त्यासाठीची पात्रता काय? त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो? नवीन व्यवसायासाठी अर्थसहाय्य कशा पद्धतीने मिळेल ? कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे ? याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे?

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणासाठी काही योजनांची घोषणा केली. प्रधानमंत्री हर घर जल योजना, मिशन इंद्रधनुष, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, लखपती दीदी योजना अशा योजनां पैकीच एक योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना’. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023 – 24 चा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेचा उल्लेख केला होता. ही योजना 17 सप्टेंबर 2023 पासून देशभर राबवण्यात  येत आहे.

Prime Minister Vishwakarma Scheme in Marathi

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची वैशिष्ट्ये : (Feature of Prime Minister Vishwakarma Scheme)

1. (शिवाजी महाराजांच्या काळात बारा बलुतेदार आणि अठरा पघड जाती पद्धत अस्तित्वात होती. या सर्व जातींना एकत्र करून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 18 वर्णातील 18 पगड्या घालणाऱ्या जातींना अठरापगड जाती असे म्हणतात. )

तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, गुरव, धनगर, गवळी, लाड, वाणी, जैन, कोष्टी, साळी, माळी, रंगारी, चीनारी आणि स्वादी अशा या 18 प्रकारच्या जाती आजही भारतात अस्तित्वात आहेत. या योजनेत अशाच 18 प्रकारात मोडणाऱ्या एकूण 140 जातीतील कारागिरांना सामावून घेण्यात आले आहे.

2. या योजनेअंतर्गत कारागिरांना, शिल्पकारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच यांना कमी व्याजदरात कोणतेही तारण न घेता कर्ज उपलब्ध करून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

3. अर्थसंकल्पानुसार या योजनेसाठी तब्बल तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी असेल.

4. अहवालानुसार या योजनेअंतर्गत अंदाजे 30 लाख  कारागिरांना लाभ मिळू शकतो. 

5. 17 सप्टेंबर 2023 पासून कारागीर, शिल्पकार आणि श्रमिक या योजनेअंतर्गत  नाव नोंदणी करू शकतात.

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजनेचा उद्देश (Aim of Prime minister Vishwakarma Scheme) :

1. यांत्रिकीकरणाच्या युगात एका बाजूला सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राचा वापर केल्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता कमी झाली आहे. परिणामी देशातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे.  अशा या वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

2. गरीब कारागिरांना निरनिराळ्या औद्योगिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नवनवीन संदीप बाबत माहिती पुरवून आणि त्यासंबंधीचे प्रशिक्षण देऊन त्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे.

3. प्रशिक्षणा दरम्यान अथवा कर्जामार्फत त्यांच्या व्यवसायास सहाय्य करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणे.

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे फायदे (Benefits of Prime Minister Vishwakarma Scheme in Marathi)

1. स्वतंत्र ओळख : 

या योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या कारागिरांना व शिल्पकारांना योग्य त्या प्रशिक्षणाद्वारे स्वतःची एक स्वतंत्र ओळख मिळेल. त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक विश्वकर्मा कौशल्य सन्मान प्रमाणपत्र आणि सोबत त्यांच्या नावाचे स्वतंत्र आय कार्ड देण्यात येईल.

2. प्रशिक्षण : 

आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकवून त्यांच्यातील  कलेत गुणवत्तापूर्वक सुधारणा करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. हे प्रशिक्षण साधारण पाच ते सात दिवसांचे असेल. गरजूंच्या प्रशिक्षणासाठी हा कालावधी पंधरा दिवसांपर्यंत वाढवण्यात येईल. 

3. आर्थिक मदत :

तसेच या प्रशिक्षणा दरम्यान कारागिरांना दररोज रुपये पाचशे इतका भत्ता देखील देण्यात येणार आहे. आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपकरणे खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मदत देखील केली जाणार आहे.

4. अल्प दराने कर्ज :

या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल. हे कर्ज केवळ पाच टक्के दराने दिले जाईल. साधारणतः सुरुवातीच्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये पर्यंतचे 18 महिने मुदतीचे कर्ज दिले जाईल आणि यानंतर व्यवसाय वाढीसाठी 30 महिने मुदतीसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल

5. व्यापक बाजारपेठ :

या योजनेत समाविष्ट झालेल्या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेशी विविध मार्गाने जोडले जाईल. त्यामुळे त्यांच्या कलेचा विस्तार जगभर होऊ शकेल.

6. मार्केटिंग सपोर्ट :

प्रशिक्षणामार्फत उच्च गुणवत्तापूर्वक उत्पादन, ब्रॅण्डिंग, जाहिरात तसेच ई-कॉमर्स द्वारे खुली बाजारपेठ अशा प्रकारचा मार्केटिंग सपोर्ट कारागिरांना या योजनेअंतर्गत मिळेल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य  सन्मान योजनेसाठीची पात्रता (Eligibility for Prime  Minister Vishwakarma Scheme in Marathi)

1. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी कारागीर अथवा शिल्पकार हा एक भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे.

2. ही योजना केवळ अठरा प्रकारातील व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी उपलब्ध आहे.

3. सहभागी होणाऱ्या कारागिराचे वय 18 वर्षे पूर्ण आणि 50 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.

4. केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या  जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या PM स्वनिधी, मुद्रा किंवा अशा विविध योजना अंतर्गत गेल्या पाच वर्षात कारागिराने कोणतेही कर्ज घेतलेले नसावे.

5. या योजनेचा फायदा सरकारी सेवेत काम करणाऱ्या कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना घेता येऊ शकणार नाही.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( Documents required for Prime Minister Vishwakarma Scheme)

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. शिधापत्र

4. पासपोर्ट साईज रंगीत फोटो

5. ई-मेल आयडी

6. फोन नंबर

7. बँकेचा तपशील

8. जाती प्रमाणपत्र

9. अधिवास प्रमाणपत्र

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया (How to register your name in Prime Minister Vishwakarma Scheme )

• या योजनेत कारागीर स्वतः त्यांचे नाव ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकत नाही.

• प्रत्येक राज्याच्या गावागावात सरकारने कॉमन सर्विस सेंटर उभारले आहेत करा की तिथे जाऊनच आपले नाव नोंदवू शकतात.

•  या कॉमन सर्विस सेंटर मध्येच वर्णमूद केलेल्या कागदपत्रांचे छाया प्रत जमा करावी लागते.

• यानंतर रजिस्टर केलेल्या नंबर वर आधी दिलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन झाल्यावरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होते.

• कारागिरांना योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज सहाय्य हे रजिस्ट्रेशनच्या वेळी देखील उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे फॉर्म भरतानाच तुम्ही योग्य तो पर्याय निवडून कर्ज मिळवू शकता.

•  आपल्याजवळ असणाऱ्या कॉमन सर्विस सेंटर बद्दलची माहिती मिळवण्यासाठी https://pmvishwakarma.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.

तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या टोल फ्री नंबर वर देखील संपर्क करू शकता.

 टोल फ्री क्रमांक   18002677777 आणि 17923

तुम्हालाही माहिती कशी वाटली? तुम्हाला सरकारच्या अशा कोणत्या नवनवीन योजनांबद्दल माहिती वाचायला आवडेल ?

हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा.

तसेच अशा नवनवीन माहितीसाठी आणि कथांसाठी आमच्या लेखक मित्र  वेबसाईटला सतत भेट देत रहा.  आणि आमच्या wh’s app चॅनल ला देखील लगेच जॉईन करा.

तसेच ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्या  पेजची लिंक आपल्या जवळच्या लोकांसोबत जरूर शेअर करा.

3 thoughts on “प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना l Vishwakarma Scheme full information  in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top