CAA म्हणजे काय? l What is CAA in Simple Marathi

WhatsApp Group Join Now

What is CAA in Simple Marathi: एक कायदा मंजूर झालेला असूनही तो लागू होण्यासाठी जवळजवळ पाच वर्षे लागली हा कायदा नेमका कोणता आणि या कायद्यामागील पार्श्वभूमी तसेच या कायद्याला लागू होण्यासाठी इतका वेळ का लागला इत्यादी सर्व माहिती आपण आपल्या आजच्या या सदरात पाहणार आहोत. चला तर मग सध्या देशात सगळ्यात जास्त चर्चिला जाणारा सीएए म्हणजे नेमके काय हे पाहू.

CAA म्हणजे काय (WHAT IS CAA?)

                         सी ए ए म्हणजे (सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट) म्हणजेच मराठीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा विधायक. “विधायक” म्हणजे एखादा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यापूर्वी त्या कायद्याचा तयार करण्यात आलेला मसुदा होय. नागरिक म्हणजे देशात राहणारी व्यक्ती आणि त्या देशात राहण्यासाठी किंवा देशाचा सभासद होण्यासाठी दिली जाणारी गोष्ट म्हणजे त्या देशाचे नागरिकत्व होय.हेच नागरिकत्व एखाद्या देशाकडून जर मिळाले तर या नागरिकत्वासोबतच विविध नागरी हक्क व राजकीय हक्क देखील प्राप्त होतात. बऱ्याच देशांमध्ये जिथे जन्माला आलो तेथील नागरिकत्व या नियमाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला नागरिकत्व हे प्राप्त होते.

याखेरीज जर कोणाला नागरिकत्व हवे असेल तर त्या व्यक्तीला संबंधित देशातील वास्तव्याचा पुरावा द्यावा लागतो, यानुसार ती व्यक्ती या देशाची नागरिक होऊ शकतेका हे ठरविण्यात येते. भारतीय राज्यघटना भाग दोन कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. नागरिकत्व कायदा 1955  हा कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणते ठोस कारणे असावे लागतात हे सांगतो जसे की नागरिकत्व हवे असणाऱ्या व्यक्तीचा जन्म कोठे झाला,त्या व्यक्तीचा वंश कुठला आहे, त्या व्यक्तीची जन्माची नोंदणी कुठे झाली आहे,तसेच संबंधित व्यक्तीचे आई-वडील यांचे नागरिकत्व कुठले आहे, एखाद्या व्यक्तीला कोणी स्वीकृती केली असेल तर  यानुसार कोणत्याही नागरिकाला नागरिकत्व हे देण्यात येते.

 सध्याची अमेंडमेंट काय आहे?

तर सीएए या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी आपल्या  शेजारील देशातील हिंदू ,शिख,जैन,बौद्ध आणि पारसी बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय नागरिकत्वासाठी 14 वर्ष भारतात वास्तव्य असावे अशी तरतूद होती.पण या कायद्यानुसार डिसेंबर 2014 पूर्वी भारतात राहत असलेले किंवा स्थलांतरित  झालेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. एखादा विशिष्ट समुदाय किंवा अनेक व्यक्ती स्थलांतर करतात तेव्हा त्यामागील पार्श्वभूमी ही समजून घेणे गरजेचे असते या कायद्यानुसार व्यक्तींना नागरिकत्व मिळून त्यांना नागरी आणि राजकीय हक्क देखील मिळतील.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये या कायद्या हा कायदा मंजूर झाला होता यावर्षी मार्च 2024 पासून हा कायदा संपूर्ण भारतात लागू होणार आहे. शेजारील देशातून स्थलांतरित झालेले प्रसंगी आपला जीव वाचवण्यासाठी भारतात दाखल झालेले  अल्पसंख्याक नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. आजही बऱ्याच देशांमध्ये अल्पसंख्यांक लोकांना टार्गेट केले जाते आणि त्यांना संख्याबळ कमी असल्यामुळे आलेल्या परिस्थितीचा सामना करता येत नाही. अशातच हे  गट स्थलांतरित होताना दिसून येतात. सी ए ए नागरिकत्व सुधारणा कायदा हा कायदा 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक कारणांमुळे पाकिस्तान,बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या,हिंदू,शिख, जैन,बौद्ध आणि पारसी लोकांसाठी लागू होतो.  What is CAA in Simple Marathi

2019 मध्ये विरोध झालेला हा कायदा आणि या विरोधामागील असलेले कारण म्हणजे हा कायदा मुस्लिम समुदायावर परिणाम करत आहे असे वाटत होते.पण सीएए मुस्लिम नागरिकासह भारतातील कोणत्याही नागरिकांवर परिणाम करत नाही.

 नागरिकत्व कायदा 1955 मध्ये करण्यात आलेल्या या आधीच्या दुरुस्ती (Amendments in Citizenship Act of 1955)-

नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सहा वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.याआधी 1986,1992,2002,2005 ,2015आणि 2019 मध्ये घटना दुरुस्ती झाल्या आहेत. प्रत्येक देश हा नागरिकांना काही हक्क आणि विशेष अधिकार प्रदान करत असतो.तसेच या राष्ट्रातील नागरिकांना तेथील कायद्यांचे पालन करणे देखील गरजेचे असते.

राज्यघटना आणि नागरिकत्व- Constitution and Citizenship

      राज्यघटनेचे कलम 5- हे प्रत्येक नागरिकाला नागरिकत्व कसे दिले जाते याबाबत आहे.
कलम 6- हे पाकिस्तान मधून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे नागरिकत्व यासाठी आहे फाळणी नंतर पाकिस्तान मधून भारतात दाखल झालेले तसेच आई-वडील किंवा आजी-आजोबा यांपैकी कोणी भारतात जन्माला आले असेल  नागरिकत्व दिले जाते.

कलम 7– हे पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही भारतीय लोकांचे नागरिकत्व यासाठी आहे

कलम 8-भारतातील नागरिकत्व भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तीसाठी नागरिकत्व.

कलम 9-स्वच्छने नागरिकत्व स्वीकारणे

कलम 10-हा संसद कायदा करेल त्या कायद्याच्या तरतुदीच्या  आधीन राहून नागरिकत्व मिळणे.

कलम 11-नागरिकत्वाच्या अधिकाराच्या कायद्याद्वारे नियमन करण्यासाठी संसदेत अधिकार.

सी ए ए या कायद्याचा उपयोग कोणाला होईल? (Benefits of CAA)

                  धार्मिक वाद,राष्ट्रातील कलह, युद्धजन्य परिस्थिती आणि अल्पसंख्यांक लोकांना मिळणारी अन्यायकारक वागणूक यातून स्थलांतरित झालेल्या शेजारील देशातील हिंदू,शीख,जैन,ख्रिश्चन,बौद्ध आणि पारशी लोकांना या कायद्याचा उपयोग होईल. या कायद्यानुसार त्यांना राष्ट्रातील  नागरिकांचे सर्व हक्क व अधिकार मिळतील तसेच या लोकांना कायदेशीर पासपोर्ट,मतदान पत्र इत्यादी साठी देखील ते अपील करता येछ शकते. या कायद्यानुसार अल्पसंख्याक लोकांना एक नागरिकत्व मिळून स्वतःची ओळख तयार करता येईल.

सी ए ए आणि एन आर सी कायदा म्हणजे काय? CAA and NCR-

सीएए या कायद्यानुसार केवळ विश्वासाच्या आधारावर नागरिकत्व प्रदान करण्यात येईल.

एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन हे म्हणजे ही एक यादी आहे ज्यात केवळ भारतात राहणाऱ्या लोकांची नावे नोंदविण्यात येतात. एन आर सी मध्ये राज्यातील नागरिकांची कायदेशीर नोंद करण्यात येते तसेच राज्यातील व्यक्तींची नावे संख्या आणि त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता याची देखील यादी यात समाविष्ट असते. एन आर सी चा पहिला मसुदा हा 1951 मध्ये जेव्हा पहिली जनगणना झाली तेव्हा जाहीर करण्यात आला होता. म्हणजे या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. सीएएनुसार भारतात नागरिकत्व मिळण्यासाठी अपील करता येते आणि एन आर सी नुसार भारतात आपण राहतो याचा एक पुरावा आपल्याला मिळतो.

सीएएनुसार अर्ज कसा करावा?

      सीएए हा कायदा स्थलांतरित शेजारी राष्ट्रातील लोकांना भारताचे नागरिक बनण्यास बनण्याचा अधिकार प्रदान करतो. तर स्थलांतरित व्यक्तीने कुठे अर्ज करावा त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. भारत सरकारने  नुकताच भारतात सीएए हा कायदा लागू केला आहे. यानुसार भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी स्थलांतरित व्यक्ती ऑनलाईन अर्ज करू शकतात यासाठी केंद्र सरकारने एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे.जेणेकरून पात्र व्यक्तींना त्यांचे अर्ज  हे ऑनलाईन पद्धतीने सबमिट करता येऊ शकतात. या कायद्यानुसार प्रामुख्याने सहा धार्मिक समुदायाचे व्यक्तीच या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतात.

केंद्र सरकारचे वेब पोर्टल-

    indiancitizenshiponline.nic.in हा एक वेब पोर्टल नुकताच  केंद्र सरकारने  ओपन केला असून,या वेब पोर्टलनुसार अर्जदार व्यक्ती ही अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज दाखल करू शकते शिवाय केंद्र सरकारचा सीएए साठी एक नवीन मोबाईल ॲप तयार करण्याचा देखील विचार आहे.जेणेकरून स्थलांतरित व्यक्तीला अर्ज करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. अर्जदार व्यक्तीने सर्व कागदपत्राची व्यवस्थित परिपूर्णता केली तर त्याला तात्काळ भारताचे नागरिकत्व भेटण्यास मदत होईल या वेब पोर्टलची अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत हे एक अनुकूल असे वेब पोर्टल असून जे अर्जदार व्यक्तीला हाताळण्यासाठी अगदी सहज शक्य होईल.

सीएए बद्दल अनेक प्रश्न पडले आहेत तर वाचा आजचा हा लेख What is CAA in Simple Marathi आणि मिळवा त्यांची उत्तरे. या लेखातून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली का नक्की सांगा आणि सोबतच तुम्हाला माझा हा लेख कसा वाटला हे देखील सांगा. तुमच्या सूचना आणि कमेंट्स स्वागतच राहील.अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लेखकमित्र वेबसाईटला नक्की भेट देत रहा.

2 thoughts on “CAA म्हणजे काय? l What is CAA in Simple Marathi”

  1. Adv Supriya mundhe

    CAA बद्दल अतिशय सोप्या व समर्पक शब्दात सविस्तर माहिती दिली आहे 👌
    👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top