What is MILLETS in Marathi: मिलेट्स (MILLETS)हे अतिशय पुरातन धान्य असून आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेच्या काही भागात त्यांची पिके जास्त प्रमाणात आहेत. पण हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष(INTERNATIONAL MILLETS YEAR 2023) म्हणून घोषित केले असल्यामुळे सध्या मिलेट्स म्हणजेच भरडधान्य या विषयाला अधिक चालना मिळाली. याचा मूळ उद्देश म्हणजे भरडधान्यपिकांची पर्यावरण आणि पोषणासंबंधीचा प्रसार आणि प्रचार करणे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भरडधान्य या धान्याला” श्री धान्य” असेही संबोधले आहे. पुरातत्व काळी भारतीय उपखंडात सुमारे 5000 वर्षापासून या पिकांची लागवड केली जाते म्हणून या पिकांना ” पुरातत्व धान्य” असेही म्हटले जाते. जगातील भरडधान्य उत्पादक म्हणून भारत हा एक प्रमुख देश मानला जातो. मिलेट्स म्हणजेच देव धान्यचा वापर हडप्पा ,मोहेंजोदडो यांच्या संस्कृतीत सुरु झाला. उपयुक्त पोषण तत्त्वांनी समृद्ध भरड धान्याला “सुपर फूड ” म्हणायला हरकत नाही. भरड धान्याचे सेवन आपल्या शरीराला कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते हे आपण बघूया..
भरडधान्य पिकांची वैशिष्ट्ये (Features MILLETS in Marathi):
भरडधान्य म्हणजेच मिलेट्स याचा वापर लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत विविध शारीरिक आजारांसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतो. कारण यात भरपूर प्रमाणात खनिजे कॅल्शियम आणि प्रथिने असतात. त्यांचे सेवन शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायक असते . यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच. त्यासोबतच ही धान्य ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुकोज संवेदनशील रुग्णांना याचे सेवन सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो. ती पचायला हलकी आणि अतिशय पौष्टिक असल्यामुळे रोजच्या आहारात त्याचा नियमितपणे वापर केला पाहिजे. तसेच यांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित आणण्यास मदत होते. त्यातील फायबर, लोह रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि पर्यायाने वजन कमी होण्यास मदत होते.
मिलेट सर्वसामान्यतः दोन वर्गांमध्ये विभागले जातात ते म्हणजे मोठे मिलेट्स ज्वारी आणि बाजरी. आणि छोटे मिलेट्स म्हणजेच नाचणी, राजगिरा, कुटकी, जव, बट्टी,वरई( भगर) ,राळा, सावा, बर्टी, ब्राऊन टॉप, कोडो ही आहेत. विशेष म्हणजे एका लहान दाण्यापासून असंख्य दाणे मिळवता येतात. उताराच्या व कमी सुपीक जमिनीत सुद्धा भरड धान्याची लागवड केली जाते. ते काटक असतात तापमानातील बदल आणि पाण्याचा कमी वापर करूनही हे पीक घेतले जाते.
रासायनिक खतांचा वापर न करताही याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात येते कारण वातावरण बदलात तग धरण्याची क्षमता भरडधान्यांमध्ये असते. 2018 मध्ये भरडधान्य शेतीला भारत सरकारने पोषण धान्याचा दर्जा दिलेला आहे. अनेक पौष्टिक भरत तृणधान्ये हे भारत सरकारच्या मध्यान्ह भोजनाचा एक भाग आहे. कभी खर्चात भरड धान्याचे उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भरडधान्य एक वरदानच ठरू शकेल. खरेदी-विक्री मध्ये त्यांचा वाढता सहभाग पाहता आधारभूत किमतीवर खरेदी सुनिश्चित करावी लागेल सोबतच दर्जा सुधारण्यासाठी चांगल्या वाना चा विकास करण्यावरही भर द्यावा लागेल यामुळे मिलेट्स उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल.भरडधान्य रोग, किड्या पासून स्वतःचे संरक्षण करतात म्हणजेच पिकांवर रोगांचा काही परिणाम होत नाही.
गेल्या काही वर्षांपासून हवामानाने आपल्या बदललेला अंदाज पाहता शेतकऱ्यांनी भरड पिकांकडे वळणे महत्त्वाचे ठरले कारण पारंपारिक पिकांपेक्षा नगदी पिकांकडे शेतकरी अधिक वळू लागले. पण त्यामुळे होणारे नुकसान पाहता भरड पिके ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शुष्क वातावरणात किंवा अर्ध शुष्क भागात वाढतात. पीके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात आणि हवामानाशी जुळवून घेतात त्यामुळे लाखो कोरडवाहू शेतकऱ्यांना अन्न, पशुखाद्य, भरड धान्य पिकांमुळे मिळतो. तसेच गेल्या काही काळात बदलत्या आहार पद्धतीमुळे वाढत्या ग्राहकांच्या मागणीनुसार भरड धान्यासाठी बाजारपेठेत निर्माण सुरुवात होत आहे त्यामुळे अन्न आणि पोषण सुरक्षा साध्य करण्यासाठी भरडधान्य( मिलेट्स) वरदानच ठरतील. भारतात मिलेट्स चा वापर वाढवावा या हेतूने जागरूकता दिसून येते. ग्रामीण भागात भरड धान्यांचा वापर लोक अजूनही करताना दिसतात पण पण शहरवासीयांना याबद्दल प्रारंभिक माहिती देऊन मिलेट्स चा समावेश करावा या हेतूने संयुक्त राष्ट्राने 2023 मिलेट्स मोहीम राबवलेली आहे.
गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून मिलेट्सचे महत्व ( Importance if Millets):
जागतिक व्यासपीठावर पौष्टिक गुणवत्ता ठळक करण्याच्या हेतूने संयुक्त महासभेने “मिलेट्स” लहान आंतरराष्ट्रीय धान्याचा दर्जा दिला असून चांगल्या आरोग्यासाठी विविध पोषक तत्त्वांचा समतोल राखणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून भरत धान्यांना जागतिक पातळीवर पोषणाच्या बाबतीत तोड नाही हे सिद्ध केले गेले. आणि “पोषणाचे पावर हाऊस” अशी व्याख्या दिली गेली.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून असे दिसून येते की मानवी सभ्यतेच्या विकासाच्या काळात शेतीची सुरुवात ही फक्त भरड धान्यांपासून झाली. सिंधू संस्कृतीत म्हणजेच 3000 ईसा पूर्व त्यांच्या उत्पत्तीचे पुरावे सापडलेले आहेत. जगातील 131 देशांमध्ये मिलेट्स ची लागवड केली जाते. आशियाई आणि आफ्रिकन देशात सुमारे 590 दशलक्ष लोकांचे हे पारंपारिक अन्न आहे. जागतिक उत्पन्नाच्या वाट्यात 20% वाटा भारताचा असून आशियाई स्तरावर हा वाटा 80% आहे. मिलेट्स हे गरिबांचे धान्य असे मानले गेले असले तरी अनेक गुणवत्तेच्या संबंधात भरड धान्याला पोषणाच्या बाबतीत तोड नाही असे अभ्यासातून सिद्ध झाले.
हॉवर्ड इन्स्टिट्यूटच्या सांगण्यानुसार, ज्या स्त्रिया दररोज 30 ते 50 टक्के मिलेट्स चे सेवन आहारात करतात त्यांना हृदयवि*काराचा झटका, आणि रक्तवाहिन्या संबंधी होणारे रोग कमी प्रमाणात दिसून येतात. दररोज सरासरी 50 ग्रॅम भरड धान्य खाणाऱ्या महिलांमध्ये मधुमेह संबंधी रोग 30 टक्क्यांनी कमी झालेत. भरडधान्य खाल्ल्याने कोलन कॅ*न्सरचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. त्यात असलेले फायबर आतडे निरोगी ठेवते. संतुलित करण्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. होल ग्रेन कौन्सिल मते मिलेट्स किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने गंभीर धोका कमी होतो. नाश्त्यात याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते तसेच अंकुरित स्वरूपातील धान्य उपयुक्त ठरतात. भारतात प्रामुख्याने मिळणारे काही मिलेट्स (MILLETS)पुढील प्रमाणे आहेत:
बाजरी: बाजरी मध्ये कॅल्शियम, प्रथिने, लोह आणि मॅग्नेशियम प्रामुख्याने आढळतात. शास्त्रज्ञांच्या मते बाजरीला पेनीसेटम ग्लाकम असे संबोधले जाते. इंग्रजीत बाजरीलाpearl millet असे म्हणतात. कन्नड मध्ये कंबु हे नाव आहे. महाराष्ट्रात बाजरी, पंजाबी मध्ये बाजरे-दा- सुट्टा हे लोकप्रिय गीत आहे
ज्वारी: ज्वारी ग्लूटेन मुक्त आहे त्यामुळे त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक असते.
राजगिरा: यामध्ये विटामिन बी-2, बी-6, झिंक, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते.
नाचणी: यामध्ये लोह ,कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. अगदी लहान बाळाला कुठल्याही जीवनसत्त्वांची कमतरता भासू नये यासाठी नाचणी चा उपयोग केला जातो.
रागी: हे मिलेट्स उष्ण असल्याने हिवाळ्याच्या दिवसात आहारात समावेश केला जातो. यात कॅल्शियम, प्रथिने जास्त प्रमाणात असतात. यांना ब्राऊन टॉप मिलेट्स असेही म्हटले जाते. हा एन्टी -ऑक्सीडेंट चा मुख्य स्त्रोत मानला जातो.
वरी( भगर): हे मिलेट्स थंड असल्याने कोणत्याही ऋतूमध्ये वरी, वरई चा वापर केला जातो.
कोडो: कोडो मिलेट्स मध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि सल्फर युक्त फोटो केमिकल्स असतात म्हणून त्याला “न्यूट्रीया ग्रेन” असेही संबोधले जाते.कोडो मिलेट्स मध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हे ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
मिलेट्स मध्ये विरोधी पोषक तत्वे असतात स्तनाचे क*र्करोगाचा धोका कमी करतात, यात फिनोलेक्स असतात कोडो मिलेट्स हे दुष्काळ प्रतिरोधक आणि कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे मिलेट्स आहे. कोडो मिलेट्स उत्पादनात भारत आघाडीवर आहे. प्रोसो मिलेट्स याला भारतात “चीना” म्हणून ओळखले जाते. त्यापासून प्रोसो मिलेट्स दूध, आईस्क्रीम, पुडिंग, शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी उपयोग केला जातो. यात फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ते आरोग्यास पाचक असतात. पोषणतज्ञ अपूर्वाअग्रवाल म्हणतात दुधाऐवजी विविध पाककृती मध्ये मिलेट्स दूध वापरू शकतो तसेच मसालेदार आणि गोड दोन्ही पाककृती मिलेट्स वापरून तयार करू शकतो ते एक चांगले घटक म्हणून काम करते.
MILLETS पाककृती (Millets Recipes in Marathi):
1. मिलेट(MILLETS) चे घावन:
साहित्य:पाऊण कप मिलेट चे पीठ, पाव कप तांदुळ, दीड कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती: मिलेट्स चे पीठ, तांदळाचे पीठ, मिठाने पाणी एकत्र करून मिश्रण पातळ करावे. तव्याला तेल लावून तवा गरम होईपर्यंत ठेवावा. त्यात एक-दोन चमचे मिश्रण तव्यावर पसरवून झाकण ठेवावे .दोन मिनिटे त्यावर झाकण काढून शिजू द्यावे आणि आपल्या आवडत्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
2. मिलेट्स(MILLETS) ची खिचडी:
साहित्य: अर्धी वाटी बाजरी, अर्धी वाटी मुगडाळ, पाव वाटी तांदूळ, पाव वाटी वरी, पाव वाटी नाचणी, सर्व फळभाज्या, दालचिनी, तमालपत्र, हळद, मीठ, तिखट चवीप्रमाणे, तेल.
कृती: वरील सर्व साहित्य थोडे तूप टाकून कढईमध्ये परतून घ्यावेत. नंतर एका कुकरमध्ये तेल गरम होऊ द्यावे. त्यात तमालपत्र ,दालचिनी , जिरे टाकून पुढे आले -लसून पेस्ट चांगले ढवळावे. त्यात काही फळभाज्या ॲड करून हळद , मीठ, तिखट घालून वरील मिलेट्स घालून दुप्पट पाणी घालावे आणि मंद आचेवर चार-पाच शिट्ट्या होऊ द्याव्यात. गरमागरम सर्व्ह करावे.
ही माहिती (What is MILLETS in Marathi )आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली. हा माझा छोटासा लेख स्वरूपी प्रयत्न तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कळवा….. आणि अशाच माहितीपर लेखासाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. नमस्कार!!
लेखिका: शुभांगी चुनारकर, नागपुर.
Ash xjdjdfu