म्युच्युअल फंड – भाग 2 l What is Mutual fund information in Marathi 

WhatsApp Group Join Now

म्युच्युअल  फंड भाग 2  

म्युच्युअल फंड – भाग 1  यामध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय ? त्याचे प्रकार कोणते ? तर यामध्ये आपण विभाग एक मध्ये ओपन इंडेड , क्लोज इंडेड , एक्सचेंज ट्रेडेड फंड  हे प्रकार पाहिले. 

तर विभाग दोन मध्ये इक्विटी फंड , हायब्रीड फंड , मनी मार्केट , गोल्ड फंड असे प्रकार पाहिले. त्यानंतर म्युच्युअल फंड चे कामकाज कसे चालते , शुल्क आकारणी कशी केली जाते , कमीत कमी किती रुपयांपासून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येते हे देखील पहिले. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही एस आय पी आणि लम्प सम या दोन पर्यायांमधून केली जाते हे सर्व आपण पाहिले. 

आता म्युच्युअल फंड -भाग 2 यामध्ये आपण विभाग दोन मध्ये नमूद केलेल्या फंडचे वर्गीकरण ज्या प्रकारांमध्ये केले जाते ते प्रकार कोणते ते आज बघूयात. 

भाग १ वाचण्यासाठी इथे क्लीक करा

आजकाल  टीव्ही  किंवा  वर्तमानपत्रात लार्ज कॅप , मिडकॅप , स्मॉल कॅप  हे शब्द ऐकले किंवा वाचले असतील. 

यामध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या इक्विटि फंड गुंतवणूक कशी केली जाते किंवा याचा नेमका अर्थ काय हे आपण बघू.

इक्विटि फंड मध्ये कंपनीच्या भांडवलानुसार ( मार्केट कॅपिटलायजेशन ) लार्ज कॅप , मिडकॅप , स्मॉल कॅप ,फ्लेक्सी कॅप असे वर्गीकरण केले जाते. 

अ . लार्ज कॅप म्युच्युअल फंड : 

  • ज्या कंपनीचे भांडवल 20 हजार करोंड रुपयांपेक्षा अधिक आहे  ती कंपनी लार्ज कॅप मध्ये येते किंवा अशा 100 कंपनी ज्याचे मार्केट कॅपिटलनुसार 1 ते 100 मध्ये क्रमांक येतो. त्या म्हणजे लार्ज कॅप कंपनी आणि अशा कंपनीमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जातात तेव्हा ते पैसे लार्ज कॅप फंड मध्ये गुंतवले आहे असे म्हणतात. 
  • यालाच ब्लू चिप फंड असेही म्हणतात. 
  • लार्ज कॅप मध्ये केलेली गुंतवणूक ही इतर कंपनी मध्ये केलेल्या गुंतवणूक की पेक्षा कमी जोखमीची  मानली जाते . जास्त कालावधीसाठी लार्ज कॅप मध्ये केलेली गुंतवणूक ही फायदेशीर असू शकते. उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड ,  कंपनी विस्तार होताना स्थिर राहण्याची क्षमता जे की कंपनी आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते.
  • त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता या फंडामेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या कंपनी मध्ये असते. 

ब  . मिडकॅप म्युच्युअल फंड : 

  • ज्या कंपनीचे भांडवल अंदाजे पाच हजार करोड 20 हजार करोड रुपयांपर्यंत असते किंवा अशा कंपनी ज्यांची मार्केट कॅपिटल नुसार 101 ते 250 मध्ये क्रमांक येतो ती कंपनी मिडकॅप मध्ये येते, आणि अशा कंपनीमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जातात तेव्हा ते पैसे मिडकॅप फंड मध्ये गुंतवले आहे असे म्हणतात. 
  •  मिडकॅप मध्ये केलेली गुंतवणूक ही तुलनेने थोडी जोखमीची मानली जाते . मिडकॅप मध्ये गुंतवणूकीसाठी अधिक व्याप्ती आहे असे म्हणत येईल. मागील का वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पहिला असता मिडकॅप म्युच्युअल फंड चा परतावा खूप चांगला दिसून येतोय. 
  • त्यामुळे मिडकॅप म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. 

क. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :

  • ज्या कंपनीचे भांडवल अंदाजे पाच हजार करोड रुपयांपर्यंत असते किंवा अशा कंपनी ज्यांचे मार्केट कॅपिटल नुसार 251 पासून पुढे क्रमांक येतात ते स्मॉल कॅप मध्ये येतातआणि अशा कंपनीमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जातात तेव्हा ते स्मॉल कॅप म्युचल फंड मध्ये गुंतवले आहे असे म्हणतात. 
  • स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही मिडकॅप मध्ये केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक जोखमीची मानली जाते.
  • अधिक  कालावधीसाठी स्मॉल कॅप मध्ये केलेली गुंतवणूक ही फायदेशीर असू शकते .
  • शेअर बाजाराच्या चढ उतारामध्ये स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये देखील तीव्र चढ उतार होत असते.
  • स्मॉल कॅप मध्ये गुंतवणुकीसाठी अधिक व्याप्ती असल्यामुळे अधिकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळू शकतो.  याचमुळे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये देखील गुंतवणूकदारांची संख्या  दिवसेंदिवस वाढतच आहे. 

ड. फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :

  • या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचे पैसे लार्ज कॅप,  मिड कॅप , आणि स्मॉल कॅप या तिन्ही मध्ये गुंतवले जातात.
  • तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे जोखीम कमी होते. तसेच चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.

2. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा –

  • पारंपारिक गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणारा परतावा हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक गेल्यानंतर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कमी असतो. 
  • वाढत्या महागाईच्या काळात तुलनात्मक दृष्टीने विचार केल्यास परतावाही तसाच हवा,  म्युच्युअल फंड मुळे ही गोष्ट शक्य होऊ शकते. 
  • म्युच्युअल फंड निवडल्यानंतर तुमचा फंड मॅनेजर तुमच्यासाठी योग्य गुंतवणूक करत असतो त्यामुळे सहाजिकच तुम्हाला तासंतास शेअर मार्केट वर नजर ठेवणे गरजेचे राहत नाही.
  • विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा म्युच्युअल फंड मध्ये मिळते त्यामुळे अगदी सोन्यातही गुंतवणूक करणे शक्य होते. यात सोने  गहाळ होण्याची भीती किंवा चोरीला जाण्याची भीती देखील नाही, शिवाय  एन ए व्ही वाढल्यास  तुमच्या  गुंतवणुकीचे मूल्य देखील वाढते. 
  •  कुठल्या कारणास्तव  पैशाची गरज भासल्यास म्युच्युअल फंड मधील युनिट्स विकू शकता आणि सहजतेने रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये मिळवू शकता. 
  • म्युच्युअल फंड मध्ये कर बचत योजना देखील आहे त्यामुळे बचत आणि गुंतवणूक असा दुहेरी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. 

3. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्याचा तोटा –

  •  म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला कालावधी ठरवणे आवश्यक आहे.  तुम्ही  जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली मात्र काही कारणामुळे तुम्हाला  लगेचच गुंतवलेले पैसे परत हवे असल्यास एक्झिट लोड चे शुल्क भरावे लागते आणि तोटा सहन करावा लागू शकतो.
  • म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवताना जोखीम लक्षात घेऊनच पैसे गुंतवणे आवश्यक आहे कारण कुठल्याही निश्चित परताव्याची खात्री म्युच्युअल फंड देत नाही. 

4. मागच्या काही वर्षात काही उत्तम परतावा देणारे अॅसेट मॅनेजमेंट कंपनी : 

  • Quant स्मॉल कॅप फंड 46.15%
  • निप्पॉन स्मॉल कॅप फंड 37.47 %
  • Quant मिडकॅप फंड 34.45 %
  • बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड 34.44%
  • मागील पाच वर्षामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त इक्विटि फंड ने एस आय पी ( SIP ) मधून 30 % पेक्षा जास्त परतावा ( रिटर्न्स ) दिला आहे.

( वरील कुठलाही म्युच्युअल फंड या लेखामधून गुंतवणूक करण्यासाठी सूचित करण्यात येत नसून हे उपलब्ध आकडेवारी आणि माहिती नुसार लिहिण्यात आलेले आहे. यात लेखकाची आणि संकेतस्थळाची कुठलीही जबाबदारी गृहीत धरू नये.) 

5म्युच्युअल फंड निवडताना काळजी घेणे आवश्यक : 

  • आपण निवडलेला म्युच्युअल फंड हा आपल्या भविष्यातील ध्येय आणि धोरण लक्षात घेता निवडलेला असावा. 
  • आपल्या जवळ असणारा पैसा आणि जोखीम लक्षात घेऊनच कुठल्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी  किती रक्कम गुंतवणे योग्य आणि किती कालावधी असावा या गोष्टींचा विचार करावा. 
  • कुठलाही म्युच्युअल फंड निवडताना अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची आणि पर्यायाने फंड मॅनेजर ची माहिती घेणे आवश्यक आहे.
  • म्युच्युअल फंड ने मागील काही वर्षांचा परतावा उत्तम दिल असेल याचा अर्थ पुढेही तसाच आणि तितकाच  परतावा मिळेल हे आवश्यक नसते. म्युच्युअल फंड वरील परतावा हा शेअर बाजाराशी तसेच इतर पर्यायच्या मूल्यावर अवलंबून असतो.
  • म्युच्युअल फंड निवडताना फंडशी निगडीत शुल्क आकारणी तपासून घेणे गरजेचे असते. 
  • लक्षात ठेवा, आपला कष्टाचा पैसा वाचवणे आणि वाढवणे हे आवश्यक आहे  त्यामुळे सर्व गोष्टीची तपासणी तज्ञ आणि माहीतगार व्यक्तीकडून करून मगच गुंतवणूक करा . 

म्युच्युअल फंड भाग 2 कसा वाटला ते नक्की कळवा.असेच माहिती पर लेख आणि विविध रोचक कथा वाचण्यासाठी वेबसाईटला भेट द्या आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “म्युच्युअल फंड – भाग 2 l What is Mutual fund information in Marathi ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top