What is Passport Ranking in Marathi:यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जावूयात ? मस्तपैकी बँकॉक, लंडन किंवा रशिया अशी परदेशवारी करूयात; पण यासाठी व्हिसा वेळेत मिळेल का? नाहीतर अशा देशात जाऊयात जिथं आपल्याला या व्हिसाच्या झंजटात पडावच लागणार नाही? हे असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे…
भारतात पासपोर्टचे एकूण किती प्रकार आहेत? कोणत्या देशाचा पासपोर्ट असल्यावर इतर देशांमध्ये जाण्यासाठी visa ची आवश्यकता नाही किंवा visa on arrival मिळू शकतो?
पासपोर्ट रँकिंग म्हणजे काय? ते कोण ठरवते ? कशाच्या आधारावर हे रँकिंग ठरवलं जातं?
कोणते देश या पासपोर्ट रँकिंग लिस्ट मध्ये आघाडीवर आहेत? कोणाचे रँकिंग एकदम कमी आहे? आणि या सर्वांमध्ये भारताचे स्थान किती आहे?
याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

पासपोर्ट (What is Passport Ranking in Marathi) :
शिक्षणासाठी पर्यटनासाठी वैद्यकीय सेवेसाठी अथवा नोकरी धंदा निमित्त देशाभार प्रवास करण्यासाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे पासपोर्ट. इंग्लंडचे किंग हेन्री व्ही यांनी पासपोर्ट या संकल्पनेचा शोध लावला. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची सत्ता असताना 1920 साली भारतात पासपोर्ट ही संकल्पना सुरू झाली. आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘इंडियन पासपोर्ट आर्ट, १९२०’ अमलात आणला गेला बदलत्या आंतरराष्ट्रीय धोरणानुसार या कायद्यातही वेळोवेळी बदल होत गेले. सध्या भारतात एकूण पाच प्रकारचे आणि त्यात चार विविध रंगाचे पासपोर्ट नागरिकांना दिले जातात.
भारतातील पासपोर्टचे विविध प्रकार (Types of Passport in India) :
१) निळा पासपोर्ट (Blue Passport ) :
निळ्या रंगाचे कव्हर असणाऱ्या पासपोर्ट ला ‘Ordinary Passport’ असं देखील म्हटलं जातं. हा ‘टाईप P’ म्हणजेच पर्सनल पासपोर्ट आहे. देशातील सामान्य नागरिकांना पर्यटन, शिक्षण आणि व्यावसायिक दौरे यांसाठी हा पासपोर्ट दिला जातो. हा 36 ते 60 पानांचा असतो.
२) पांढरा पासपोर्ट (White Passport) :
पांढऱ्या रंगाचे कव्हर असणाऱ्या पासपोर्ट ला ‘Official Passport’ असं म्हणतात. हा ‘टाईप S’ पासपोर्ट आहे. यात S म्हणजे सर्विस. हा पासपोर्ट भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जसे की इंडियन आम फोर्स मधील पदाधिकारी अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिला जातो.
३) मरून पासपोर्ट (Maroon Passport ) :
मरून रंगाचं कव्हर असणाऱ्या पासपोर्ट ला ‘Diplomatic Passport’ असेही म्हणतात. हा ‘टाईप D’ प्रकारचा पासपोर्ट आहे यात D म्हणजे डिप्लोमॅटिक. हा पासपोर्ट संसदेचे सदस्, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी (I.AS. officers) यांना दिला जातो. हा 28 पानांचा असतो.
४) नारंगी पासपोर्ट (Orange Passport)
ऑरेंज पासपोर्ट ही संकल्पना 2018 मध्ये अस्तित्वात आली. दहावी पेक्षा कमी शिक्षण झालेल्या नागरिकांना हा पासपोर्ट देण्यात येतो. नोकरी अथवा व्यवसायासाठी इतर देशात प्रवास करताना इमिग्रेशन मध्ये अडचणी येऊ नये याकरता या पासपोर्टची रचना करण्यात आली आहे.
५) ई – पासपोर्ट (E – Passport )
ई – पासपोर्ट हा एक असा पासपोर्ट आहे, ज्याच्यात एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली असते. आणि यामध्ये पासपोर्ट धारकाची संपूर्ण बायोमेट्रिक माहिती आणि इतर वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मदिनांक पत्ता या सर्व गोष्टी डिजिटल स्वरूपात स्टोअर केलेल्या असतात. 25 जून 2008 रोजी सर्वात पहिला पासपोर्ट माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना देण्यात आला होता. पासपोर्ट सेवा दिनानिमित्त 24 जून 2023 रोजी भारतातील सामान्य नागरिकांना देखिल ई पासपोर्ट ही सुविधा द्यायला सुरूवात झाली आहे. सध्या जवळपास 20 हजार राजदूत आणि सनदी अधिकाऱ्यांना असे पासपोर्ट देण्यात आले आहे आहेत.
व्हिसा (Visa – Visitors International Stay Admission) :
परदेशात काही दिवसांसाठी किंवा अधिक काळासाठी वास्तव्य करण्यासाठी पासपोर्ट सोबत व्हिसाची देखील आवश्यक असते . तुम्हाला जितक्या दिवसांचा व्हिसा मिळाला असेल तितकाच काळ तुम्ही त्या देशात राहू शकता. व्हिसा ची मुदत संपल्यानंतर तो देश सोडणे तुम्हाला अनिवार्य असते. प्रत्येक देशाच्या व्हिसाचे नियम हे देशपरत्वे वेगवेगळे असतात. काही देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते. तर काही देशांमध्ये गेल्यावर म्हणजेच Visa on arrival देखील मिळू शकतो.
भारत, नेपाळ आणि भूतान या देशातील नागरिकांना परस्पर देशांमध्ये जाण्यासाठी विजा ची आवश्यकता नसते.
मालदीव देशाचे नागरिक भारतात व्हिसा शिवाय, 90 दिवस वास्तव्य करू शकतात.
जपान, साऊथ कोरिया, UAE मधील नागरिकांना भारतातील सहा एअरपोर्टवर व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा करून देण्यात आली आहे. आणि हा व्हिसा 30 ते 60 दिवसांसाठीच
मिळतो.
भारताने 140 देशांसाठी E – visa ची सोय केली आहे. हा व्हिसा 30 ते 180 दिवसांसाठी मिळतो.
पासपोर्ट रँकिंग ( Passport Ranking) :
2005 साली युनायटेड किंगडम मधील हेनली अँड पार्टनर्स यांनी पासपोर्ट इंडेक्सिंग ची सुरुवात केली. 2006 मध्ये इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या डेटावर आधारित सर्वात पहिला पासपोर्ट रँकिंग इंडेक्स सादर करण्यात आला होता. हे रँकिंग प्रत्येक देशाच्या मोबिलिटी स्कोर वर म्हणजे इतर देशात जाण्यासाठी visa ची आवश्यकता नसणाऱ्या किंवा visa on arrival ची सोय असणाऱ्या एकूण देशांच्या संख्येवर आधारित असतो.
ही क्रमवारी प्रत्येक देशाचे इतर राष्ट्रांसोबतचे असणारे आंतरराष्ट्रीय हितसंबंध, व्यापारी धोरणे आणि त्या देशाची अर्थव्यवस्था इत्यादी घटकांवर अवलंबून असते. 2006 साली हेनेली पासपोर्ट रँकिंग इंडेक्स मध्ये 187 देश सामील होते. त्यावेळी भारत 71 व्या रँक वर होता आणि व्हिसा ॲक्सेस हा फक्त 25 देशांसाठीच होता. 2024 मधील या रिपोर्ट मध्ये जगातील 199 पासपोर्ट आणि 227 स्थळे इत्यादींचा आढावा घेण्यात आला आहे.
पासपोर्ट रँक मध्ये टॉप टेन असणाऱ्या देशांची यादी (Top 10 Countries in strongest passport list) :
फ्रान्सचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट गणला जातो. हा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीला जगातील 194 ठिकाणी बिना visa अथवा Visa on arrival प्रवास करण शक्य आहे.
पासपोर्ट रँकीग (क्रमांक) | देशाचे नाव | बिना visa or visa arrival जाता येणारी ठिकाणे (संख्या) |
1 | फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन | 194 |
2 | फिनलँड, नेदरलँड, साउथ कोरिया, स्वीडन | 193 |
3 | ऑस्ट्रिया, युनायटेड किंगडम, डेन्मार्क, आयर्लंड,लक्झेंबर्ग | 192 |
4 | पोर्तुगाल, नॉर्वे, बेल्जियम | 191 |
5 | ऑस्ट्रेलिया, ग्रीस, माल्ट, न्युझीलँड, स्वित्झर्लंड | 190 |
6 | कॅनडा, पोलांड, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सियाचीन | 190 |
7 | हंगेरी,लिथुआनियन | 188 |
8 | एस्टोनिया | 187 |
9 | लात्विया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया | 186 |
10 | आइसलँड | 185 |
या लिस्टमध्ये सर्वात शेवटचा नंबर म्हणजे 109 व्या रँक वर अफगाणिस्तान चा पासपोर्ट येतो. यांच्या पासपोर्ट नुसार केवळ 28 ठिकाणी बिना व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवास करू शकतो.
तर भारतीय पासपोर्ट चा नंबर 85 वा येतो. भारतीय पासपोर्ट नुसार इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि इतर देशातील अशा 62 ठिकाणी जाण्यासाठी केवळ पासपोर्ट असणे इतकेच पुरेसे असते.गेल्या वर्षी या लिस्टमध्ये भारताचा क्रमांक 84 वा होता. परंतु यावर्षी हा क्रमांक एका रँक ने घसरला आहे.
भारतीय पासपोर्टचे रँकिंग घसरण्याची कारणे ही पुढील प्रमाणे असू शकतात.
1) डिप्लोमॅटिक रिलेशन :
पासपोर्ट रँकिंग परराष्ट्र हितसंबंधांवर देखील अवलंबून असते. भारताचे शेजारील देशांशी जसे की अफगाणिस्तान, सीरिया अमेरिका अशा इतर देशांशी असणारे हितसंबंध हे म्हणावे तितके चांगले नाहीत. त्यामुळे अशा देशात जाण्यासाठी नागरिकांना त्या देशाचा आधीच व्हिसा घेणे बंधनकारक ठरते.
२) जीडीपी GDP – (Gross Domestic Product):
भारताची अर्थव्यवस्था जगाच्या पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये भारताचा GDP दर 6.3% होता; परंतु या वर्षी , 2024 मध्ये मात्र हा दर 6.2% इतका घसरला आहे. पासपोर्ट रँकिंग हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असल्यामुळे गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी भारताचे पासपोर्ट रँकिंग घसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर यंदा तुम्ही कोणत्या देशात फिरायला जात आहात?
हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन माहितीसाठी (What is Passport Ranking in Marathi) आणि कथांसाठी आमच्या लेखक मित्र https://lekhakmitra.com/ या वेबसाईटला सतत भेट देत रहा. आणि आमच्या wht’s app चॅनल ला देखील लगेच जॉईन करा.
स्नेहल बाकरे, पुणे