कुणाशीही बोलताना तुम्हाला अडखळायला होतंय?मत मांडताना आत्मविश्वास कमी वाटतोय?मग याने वाढवा तुमच्यातला कॉन्फिडन्स.
सॉफ्ट स्किल म्हणजे काय? :कुणाशीही बोलताना तुम्हाला अडखळायला होत का?किंवा काही मत मांडताना आत्मविश्वास कमी वाटतो का?किंवा मुलखतीमध्ये तुम्हाला भीती वाटते का? किंवा तुम्हाला कुणी कधी सांगितलंय का की तुम्हाला तुमच्यात बदल करायची गरज आहे.तर सगळं तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला तुमच्यात काही स्किल आत्मसात करायची गरज आहे. त्यातही सॉफ्ट स्किल.तर सॉफ्ट स्किल म्हणजे काय?त्याचे कोणकोणते प्रकार आहेत?त्याचा आपल्या आयुष्यात नेमका फायदा काय आणि बरच काही. तर चला जाणून घेऊया सॉफ्ट स्किल बद्दल सगळं.
सॉफ्ट स्किल म्हणजे काय?What is Soft skills?
एखाद्या व्यक्तीमधल्या काही गोष्टी आपल्याला खूप प्रभावी करतात.त्यांची त्यांच्या क्षेत्रात पकड असते,तसेच त्यांच्या अंगी असे काही गुण असतात की त्यांना यशाकडे खेचत राहतात.ते गुण म्हणजेच त्यांच्या अंगी असलेले सॉफ्ट स्किल्स. वागताना,बोलताना कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल,बॉडी लँग्वेज,प्रॉब्लेम सॉलव्हिंग यासगळ्या स्किल्स आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवत असतात, त्यासाठीच सॉफ्ट स्किल्स माहिती असणं आणि त्याच आपल्या आयुष्यात वापर असणं याने आपलं व्यक्तिमत्त्व खुलून येत.
सॉफ्ट स्किलची गरज का आहे?
आयुष्यात लोकांना हातळण्यासाठी जी कौशल्य लागतात ती सॉफ्ट स्किलमध्ये येतात.लोकांशी संवाद साधन्यापासून त्यांच्यासोबत काम करणे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणे हे या स्किल्सने सोपे होते.सामजिक कौशल्य, संभाषण कौशल्य ते भावनिक बुद्धिमत्ता ते व्यक्तीमत्व कौशल्य यासगळ्यांची आपल्यात भर पडते.खाजगी आयुष्य असो किंवा नोकरी सॉफ्टस्किल जर आत्मसात केली असतील तर दोन्ही ठिकाणी आयुष्य सुटसुटीत सहज होऊन जातं.
सॉफ्टस्किलचे प्रकार कोणकोणते आहेत?
तसे तर सॉफ्टस्किलचे खूप प्रकार आहेत.आपण त्यातले काही मोजके जे रोजच्या आयुष्यात आणि नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अतिशय गरजेचे असलेले सॉफ्टस्किलचे प्रकार बघुयात.
1.Communication skill-
हे स्किल म्हणजे आपल्या खाजगी आयुष्यात असो किंवा नोकरीच्या ठिकाणी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.कुणाशीही बोलताना आपण कसे बोलतोय, आपली त्या विषयावर किती पकड आहे,आपण कशापध्दतीने समोरच्याला आपल्या बोलण्यातून पटवून देत आहोत हे सगळं Communication skill मध्ये येतं.नोकरीच्या ठिकाणी, इंटरव्ह्यूमध्ये ह्या स्किलच महत्त्व खूप जास्त आहे.कधीकधी आपल्याला सगळं येत असत फक्त ते नीटनेटके मांडता न आल्याने आपलं नुकसान होत त्याच कारण आहे आपल्यात Communication skill ची कमी.असं म्हणतात बोलणाऱ्याची फोलकट सुद्धा विकली जातात आणि न बोलणाऱ्याच्या शेंगा सुद्धा विकल्या जात नाहीत हे उत्तम उदाहरण आहे Communication skill च.
2.Problem Solving-
खाजगी आयुष्य असो किंवा व्यवसाय, नोकरी प्रश्न पडत नाहीत,अडचणी येत नाहीत असं कुठेच नसतं.अडचणी सगळ्यांना येतात पण त्यातून वेळेत सहीसलामत बाहेर पडतात ज्यांना त्या अडचणींना सामोरे जाण्याची कला अवगत असते ती म्हणजे Problem Solving. एखादी घटना घडते,त्याचे काही पडसाद उमटतात, त्याचा परिणाम आपल्यावर होतो, आता नोकरीच्या ठिकाणी किंवा खाजगी आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला आपली सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून काही निर्णय घ्यावे लगतात. अशावेळी न घाबरता शांत राहून त्या प्रश्नांची उकल करणे आणि त्यातून बाहेर पडण्यावर भर देणे,त्यासाठी तसे प्रयत्न करणे याने आपण माणूस म्हणून सुद्धा घडत असतो आणि आपल्या अशा वागण्यातून आपण इतरांना सुद्धा वाचवू शकतो.
3.Leadership Skill-
तुम्ही ऐकलं असेल काहीजण वर्षानुवर्षे एकच नोकरी आहे त्याच पदावर सुरू करतात आणि त्यातच रिटायर सुद्धा होतात.त्यांच्यात काही बद्दल झालेला नसतो,ना व्यक्ती म्हणून ना परिस्थितीमध्ये.
याच महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी कधीही स्वतःहून कोणती जबाबदारी घेतलेली नसते किंवा कुठल्याही परिस्थितीत एक पाऊल पुढे जाऊन अजून काही तरी करण्याचं धाडस त्यांनी केलेलं नसतं.किंवा तुम्ही हेही ऐकलं असेल, काही माणसं सांग काम्या हो नाम्या असतात.म्हणजे जेव्हढ आणि जितकं सांगितले आहे तेव्हढ आणि तेव्हढच काम करायचं आणि शांत बसायचं.याने काय होत स्वतःची प्रगती खुंटते, नवनवीन गोष्टी शिकता येत नाहीत.तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुमच्यात Leadership Skill हे असायलाच हवं.कारण आपल्यात Leadership असेल तर आपल्या प्रगतीचे दहा दरवाजे खुले होतात.
4.Team Work-
ती गोष्ट तुम्ही ऐकली आहे का काठीची? ज्यात एक माणूस त्याच्या मुलांना प्रत्येकी पाच पाच काठ्या मोडायला लावतो,ते प्रयत्न करतात पण एकालाही त्या काठ्या मोडता येत नाहीत, त्यावेळी तो माणूस आपल्या सगळ्या मुलांना एकत्र येऊन त्या पाच काठ्या मोडायला सांगतो,तर क्षणात त्या काठ्या मोडतात.याकथेचा बोध हाच आहे की एकट्याने केलं तर प्रश्न लवकर सुटत नाहीत तेच सगळे मिळून एकत्र प्रयत्न केले तर कोणतंही काम अवघड नसतं.
किंवा तुम्ही हेही ऐकलं असेल ना,गाव करील ते राव काय करील.याच कारण असतं Team Work.
जेव्हा आपण कुठल्या संस्थेत काम करत असतो तेव्हा या स्किलचा सगळ्यात जास्त उपयोग होतो.
सगळ्यांना एकत्र घेऊन काम करता येणं ही एक कला आहे, याने आपण व्यक्ती म्हणून बऱ्याच गोष्टी शिकत असतो.
5.Interpersonal Skill-
हे एक फार मोठे स्किल आहे ज्यात इतर सॉफ्ट स्किल समाविष्ट होतात.हे स्किल व्यक्ती म्हणूनच आपल्याला बदलवून टाकते.या स्किलच्या शब्दामध्येच याची व्याप्ती कळून येते.हे एक वैयक्तिक कौशल्य आहे जे आपण बोलताना, ऐकताना,निर्णय घेताना आपल्याला उपयोगी पडते.इतर सगळ्या स्किलला समाविष्ट करणार हे स्किल आहे,ज्याचे परिणाम आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात दिसून येतात.
6.Decision Making-
पटकन पण योग्य निर्णय घेण्याची क्षमता सर्वांमध्येच असते असे नाही. नोकरीच्या ठिकाणी किंवा खाजगी आयुष्यात सुद्धा बऱ्याचदा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात अशावेळी निर्णय घेणे आणि त्यावर ठाम राहणे हे एक स्किल आहे.
7.Time Management-
वेळेत सगळं झालं तर आपलं आयुष्य किती सुखी समाधानी होईल ना,असं वाटणं आणि त्यानुसार तसं प्लॅनिंग करणं आणि त्याच अनुकरण करणं आपल्याला आयुष्यात यशाकडे खेचत राहतं. आपल्याला रोजच्या आयुष्यात कधी काय करायचे आहे आणि आयुष्यातल्या ध्येयासाठी काय काय करायचे आहे या वेळेच प्लॅनिंग करणे हे आपलं आयुष्य सोपं करत.
8.Body Language-
आपल्या वागण्यातून, हालचाली मधून देखील आपण बोलत असतो.आपली बॉडी लँग्वेज बऱ्याचदा आपले आचार विचार दर्शवते. समजा तुम्ही कुठल्या संस्थेत नोकरीस आहात आणि तिथे एखादा तुमच्या वरिष्ठ अधिकारी तुम्हाला काही सूचना करत असेल आणि तुम्ही भिंतीला पाठ करून,बाक काढून बसून असाल किंवा तुमच्या हातांची सतत हालचाल सुरू असेल किंवा त्यांच्या बोलण्याकडे न बघता तुम्ही इतरत्र कुठेतरी बघत असाल किंवा तुम्ही जर खुर्चीत बसला असाल तर सतत तुमच्या पायांची चुळबूळ चालू असेल तर हे सगळं समोरच्याला डिस्टर्ब करणार आहे आणि त्याच्यावर व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याची छाप पाडणार आहे.हेच खाजगी आयुष्यात सुद्धा लागू होत.समोरच्याशी बोलताना,वागताना कस बोलायला हवं,हात पाय,डोळे, मान यांच्या कशा हालचाली हव्या हे सगळं Body Language मध्ये येतं.
9.Positive Attitude-
कुठल्याही गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याची एक कला असते आणि ती वैयक्तिक आयुष्य आणि नोकरीत सुद्धा फार फायद्याचे ठरते.बऱ्याच वेळेला असे प्रसंग येतात की काहीतरी अनुचित घडतं आणि आपण हिरमुसून जातो.अशात Positive Attitude हा आपल्याला बऱ्याचदा फायद्याचा ठरतो पुढे जाण्यासाठी.
10.Confidance-
आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं सगळ्यात जास्त गरजेच आहे.बाकी सगळं नंतर होत राहील, आधी आपला आपल्यावर विश्वास हवा.आयुष्यात अनेकदा अशी वळण येतात जेव्हा आपल्यासमोर अवघड परिस्थिती निर्माण होते,सगळ्या वाटा बंद होतात, अशावेळी न डगमगता चालत राहणं हे आयुष्यात पुढे जाण्यासाठीच सगळ्यात मोठं स्किल आहे.
11.Patience-
कधीकधी काही घटना आपल्याला फार कमकुवत करून टाकतात किंवा काही काळ आपला परीक्षेचा असतो.अशात बिथरून न जाता काही चुकीचे निर्णय न घेता संयमाने वागणं हे एक कौशल्य आहे.
नोकरीच्या ठिकाणी कुणी वरिष्ठ काही म्हणल्यास किंवा आपल्या हातून काही चूक झाल्यास गोंधळून लगेच त्यावर व्यक्त झाल्यास परिस्थिती अजून बिघडू शकते,अशात संयमाने काम केल्यास सगळा गुंता सहज सुटू शकतो.आयुष्यात कुठेही पोहचायच असल्यास संयमाची शिदोरी सोबत ठेवावीच लागते.
12.Handle Criticism-
आपण त्या जगात राहतो,जिथे लोक काय म्हणतीलचा बोलबाला आहे.लोक काय म्हणतील म्हणून बरेचजण बऱ्याच गोष्टी करतही नाही. खरंतर लोक कायम म्हणतच असतात,म्हणून आपण थांबायचं नसतं. लोकांना जज करण्याची मुभा आपणच दिली आहे, तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष किंवा मग त्यांना योग्य उत्तर आपल्याला देता यायला हवं.ज्यांना Criticism हाताळायला जमलं ती माणसं कधीही कशाने झुरत नाहीत.हे कौशल्य आपल्याला आतून फार कणखर बनवत.
तर तुम्ही यातली कोणती सॉफ्टस्किल (What is Soft skills?) आत्मसात केली आहेत?तुमचं सर्वांत आवडीचं सॉफ्टस्किल कोणतं आहे?आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला,ते आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका.अशीच नवनवीन माहिती आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद !
लेखक- निलम घाडगे
mi handle Criticism he skill atmasat karnyache try karen. khup chan lihile aahe.
Thank You So much.!😊
mast write kela aahe. mi try karel je mazyat kami skill aahet te aatmsat karel.❤️
mast write kela aahe. mi try karel je mazyat kami skill aahet te aatmsat karel..❤️
अतिशय माहिती पुर्ण लेख
Thank You So much.!😊
Khup Chan mahiti ahe soft skills is very important for our daily life..
👌👍
Great information about Development of General Skills
I will definitely try to develop above all soft skills 👍🙏
छान माहिती. धन्यवाद!