उन्हाळ्यातही रहा (cool) थंड, या कुलरचा कितीही वापर करा येणार नाही वीज बील
आपण आज माहिती घेणार आहोत उन्हाळ्यातही आपण AC आणि विजेचा पंखा न वापरता सुद्धा कुल राहू शकतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एखाद्या थंड प्रदेशात विजेशिवाय आपण थंड राहुच शकतो. पण नाही आज आपण माहिती घेणार आहोत सोलार कुलरची. जो आपण सूर्यकिरणा पासून वीज निर्माण करून वापरू शकतो.
· बाजारात उपलब्ध आहेत सोलार कूलर
· सोलर कूलरची किंमत काही हजारांच्या आसपास
· सौर उर्जेवर काम चालत या कुलरचे
या वर्षी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेची लाट येण्याचे संकेत दर्शविते आहे हवामान खाते. त्यामुळे बाजारात एसी, पंखे आणि एअर कूलर घेण्याची झुंबड लागली आहे. पण या एसी आणि एअर कूलर मुळे तुमच्या घरात, ऑफिसमध्ये थंडावा तर निर्माण होईलच पण त्याचा मेंटनस परवडण्यासारखा आहे का? आपले एसी आणि कूलर शिवायही जे विजेचे बील असते तेच एक ते दोन हजार असते. मग जर एसी लावला तर निश्चित आपले वीज बील हे चार ते पाच हजारच्या आसपास येईल. मात्र, बाजारात काही असे काही चांगले प्रोडक्ट्स आलेले आहेत, जे विजेशिवाय आपण वापरू शकतो. यामुळे वीज बिल जास्त येण्याची शक्यताच नसते.
सोलर कूलर म्हणजे काय? l what is solar cooler?
सोलर कूलर हे थेट सूर्यप्रकाशाचा वापर करून सौर पॅनल किंवा सौर बॅटरीमधून ऊर्जा निर्माण करून चालविले जाते. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने सौर पॅनल डिसी करंट तयार करते. त्याचा वापर एअर कूलर साठी होतो. बॅकअप बॅटरी ही सौर पॅनेलद्वारे चार्ज केली जाते आणि त्याचा वापर आपण पूर्ण दिवसभर करू शकतो. एखाद्यावेळी सूर्यप्रकाश कमी असेल तरीही बॅकअप बॅटरी द्वारे हे काम चालू राहते. महणजेच सोलर कूलर खरेदी करून आपला फायदाच होणार आहे. कारण महागड्या विद्युत ऊर्जेचा वापर कमी होऊन आपण पारंपरिक ऊर्जेचा वापर करू शकतो.
सोलार कुलरचे काम कसे चालते?
सौर उर्जेवर चालणारे सोलर कूलर हे आपले तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन कूलिंग तत्वाचा वापर करते. कोरडी आणि उबदार हवा बाहेरून गोळा करून टर्बाइन वापरून आत ढकलली जाते. त्यानंतर गोळा केलेली हवा ओल्या पारगम्य थरातून पुढे जाते जिथे ती थंड केली जाते. याचा परिणाम बाष्पीभवनात होतो ज्यामुळे कोरड्या हवेच्या तापमानात घट होते. ही प्रणाली पूर्णपणे सौर उर्जेवर किंवा १२/२४ वोल्ट उर्जेसह बॅटरीवर कार्य करते.
कूलिंग सायकलमध्ये चार विशिष्ट, प्रमुख घटक असतात: एक शोषक, एक जनरेटर, एक कंडेनसर आणि बाष्पीभवक. बाष्पीभवक हे मूलत: सर्व शीतकरण प्रणालींमध्ये वापरलेले रेफ्रिजरेशन किंवा एअर कंडिशनिंग प्लांट आहे कारण ते थंड होते.
· सौर प्रणालीमध्ये असलेल्या सौर पेशींचा वापर करून सूर्यापासून मिळणारी ऊर्जा विजेमध्ये रूपांतरित केली जाते. उत्पन्न केलेली ही डीसी ऊर्जा नंतर बॅटरीमध्ये साठवली जाते.
· गरम आणि कोरडी हवा पंख्याद्वारे खेचली जाते आणि ओलसर कुलिंग पॅडमधून पुढे ढकलली जाते. यामुळे, कोरड्या हवेचे ताज्या थंड हवेत रूपांतर होते. म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे कुलिंग सुद्धा होते.
· पॅड तळाच्या पॅनपासून वरच्या बाजूला पंप केलेल्या पाण्याने समान रीतीने संतृप्त केले जातात आणि खाली वाहून जातात. त्यानंतर शक्तिशाली ब्लोअर वापरून पॅड मधून हवा खेचली जाते ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्यास भाग पाडले जाते. यामुळे, तापमान कमी होते आणि पंखा कोणत्याही दिशेने वेगाने थंड हवा बाहेर सोडतो.
· सोलर कूलर इनडोअर आणि ओपन अशा दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे काम करतो. ते छतावर आणि भिंतींवर सहजपणे लावता येतात जे थंड आणि उत्तम वायुवीजन प्रदान करतात.
· सोलर कुलरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे कुलर दिवसा सोलर एनर्जीवर चालतात तर त्याचवेळी त्याची बॅटरी चार्ज होते आणि रात्री किमान सहा तासांच्या बॅटरी बॅकअपवर हा कुलर चालविता येणे शक्य आहे. अर्थात साध्या कुलरमुळे महिन्याला येणारे हजार ते दीड हजार रूपयांचे बिल शुन्य आहे. शिवाय, या कुलरसाठी असलेल्या वीजेचा वापर केला तर यामुळे केवळ शंभर ते दीडशे रूपयांचे बिल येणार आहे. विशेष म्हणजे हे कुलर पूर्णपणे शॉक प्रूफ आहे.
सध्या देशात सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पाठपुरावा करीत आहे. रुफटॉप (घराच्या गच्चीवर किंवा घराच्या वरील पत्रा,कौलावर) सोलार पॅनल करिता बँकाही गृहकर्जा सोबत निधि उपलब्ध करून देत आहेत. आताच अर्थ मंत्रालय, अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि बँकांमध्ये झालेल्या बैठकीत असे सूचित केले गेले आहे की रुफटॉप सोलरचे राष्ट्रीय पोर्टल हे ग्राहकांना घरे बांधण्यासाठी दिलेल्या कर्जाशी देखील जोडले जाणार आहे. अशा दृष्टीने आपण सोलार पॅनल लावून घेतले तर आपण सोलर कूलरचा वापरही करू शकतो.
सरकार सोलर कुलरसाठी किती अनुदान देते?
सरकारने सौर पॅनलसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. ही सबसिडी सुमारे ६० टक्के इतकी आहे, पण पुढचे ४० टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. सूर्य घर योजनेच्या वेबसाईटवर तुम्हाला सबसिडीची योजना बघता येईल. सरकारी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रति किलोवॅट ३० हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त जर तुम्ही ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल वापरणार असाल तर तुम्हाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल.
सौर पॅनेलचे काही फायदे म्हणजे ते अक्षय आणि स्वच्छ उर्जेचा स्रोत वापरतात, हरितगृह वायु उत्सर्जन कमी करतात आणि वीज बिल कमी करतात. काही तोटे असे आहेत की ते सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेवर आणि तीव्रतेवर अवलंबून असतात, त्यांना साफसफाईची आवश्यकता असते आणि प्रारंभिक खर्च जास्त असतो. सौर पॅनेलचा वापर मोठ्या प्रमाणावर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक उद्देशांसाठी तसेच अवकाशात , अनेकदा बॅटरीसह केला जातो.
सोलर कूलर वापरण्याचे फायदे:-
सौर ऊर्जा वापरताना आपल्याला अनेक फायदे मिळतील. सौरऊर्जेचा वापर हा अक्षय ऊर्जा निर्मितीचा एक प्रभावी मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. ही ऊर्जा एअर कूलर आणि इतर उपकरणांमध्ये वापरली जाऊ शकते. सोलर पॅनेल हे २५ वर्षांहून अधिक काळ टिकू शकतात आणि घरातील इतर सर्व उपकरणांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात.
१. सोलर कूलर इतर पारंपरिक पद्धतीपेक्षा फार कमी वेळात आपले कुलिंग सिस्टिम चालू करतो.
२. सोलर कूलर हा सौर ऊर्जेचा वापर करीत असल्यामुळे आपल्याला विजेच्या बिलाची चिंता नाही त्यामुळे विजेचा ऑपरेटिंग खर्च कमी होतो.
३. सोलर कूलरमुळे आपल्या पर्यावरणाची योग्य रीतीने काळजी घेतली जाते अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये यासाठी कर सवलत दिली जाते. म्हणजेच आपण सोलार कुलरमुळे पर्यावरणाचे योग्य रीतीने संरक्षण करू शकतो.
४. सोलार कूलर साठी जे पाणी वापरले जाते ते ते पर्यावरणासाठी घातक नसते तसेच सोलार ऊर्जेचा उपयोग केल्यामुळे ओझोनचा थर कमी होतो.
याप्रकारे तुम्ही सोलार कूलरचा वापर करू शकता. सोलार कूलर मुळे आपण पर्यावरणाचे एक प्रकारे संरक्षणच करीत आहोत. त्यामुळे आपण असे प्रॉडक्ट वापरल्याने पोल्युशन फ्रेंडली आयुष्य जगू शकतो. तर ही माहिती वाचून तुम्ही सुद्धा सोलार कूलर खरेदी करण्याचा विचार करीत आहत ना?मग चला खरेदी साथी बाहेर पडू.
मैत्रिणींनो तुम्हाला या वर्षीच्या उन्हाळ्यासाठी तुम्हाला “सोलर कूलरचा” वापर करायचा विचार करीत असाल तर ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आवडली का? तुमच्यापैकी कुणी सोलर कुलरचा वापर करीत असाल तर कमेन्ट करून सांगा तुमचं अनुभव. हा लेख कसा वाटला? तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.”
लेखिका : सपना कद्रेकर मुंबई