गणित विषय म्हटला की साधारणतः सगळ्याच मुलांच्या मनात भीती असते. गणित विषय समजून घेण्याचा आहे. त्यातील सूत्रे किंवा त्यातील मुख्य गोष्टी म्हणजेच सूत्र उपसूत्र इत्यादी गोष्टी समजून घेतल्या की गणित सोडवायला फार सोपे असते. गणितीय बुद्धिमत्ता लहानपणापासून जर वाढवली तर त्यात अवघड असे काही वाटत नाही. म्हणूनच गणितामध्ये सोपे करून सांगण्याच्या अनेक पद्धती आजवर शास्त्रज्ञांनी किंवा गणितज्ञांनी शोधून काढल्या आहेत.
वैदिक गणित म्हणजे काय व त्याचे आजकालच्या काळामध्ये महत्त्व what is vedic maths and its importance in new era या लेखामध्ये आपण याबद्दलची माहिती बघू.

वैदिक गणित म्हणजे काय?
गणिताला सुलभ तसेच गतिमान करण्याच्या हेतूनी शंकराचार्य श्री भारती कृष्ण तीर्थ यांनी१९११ ते १९१८या काळात वैदिक गणितीय पद्धत शोधून काढली. त्यांना ध्यान आणि वेदाची खूप आवड होती. सलग आठ वर्ष ध्यान करत असताना वैदिक सूत्रांचे ज्ञान त्यांना झाले. ऋग्वेद अथर्ववेद यातून त्यांना या सूत्रांचे ज्ञान मिळाले म्हणून वैदिक गणित असे म्हटले जाते.व त्यावर त्यांनी पुस्तक लिहिले.ही वेद नावाच्या भारतीय शास्त्रामध्ये असलेली गणिताची एक प्रणाली आहे. यामध्ये विविध सूत्राद्वारे बीजगणितीय आणि अंकगणितीय गणना सुलभ आणि वेगवान करणे हा हेतू आहे. वैदिक गणितात असलेली तंत्रे मानसिक रित्या गणित करण्याची क्षमता वाढवतात. वैदिक गणितामुळे मेंदूची क्षमता पाचपटीने वाढते. तसेच वेळेची बचत सुद्धा होते.
इतिहास —गणिताची ही सूत्रे प्राचीन वेदांमध्ये समाविष्ट होती. जगापुढे शंकराचार्य श्री भारती कृष्ण यांनी आणली.१८८४ मध्ये ओरिसामध्ये जन्मलेले शंकराचार्य यांनी ऋग्वेदामधून हे सूत्र शोधून काढले व पुस्तकाद्वारे जगापुढे मांडले. वेदां मधून त्यांना अप्रत्यक्षरीत्या शोधून काढले.
वैदिक गणिताचे चार स्तर आहेत. मुख्यपणे कनिष्ठ आणि वरिष्ठ ते दोन दोन भागांमध्ये विभागले आहेत.
इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतची मुलं वैदिक गणित शिकू शकतात.
स्पर्धात्मक परिक्षेकरता सुद्धा वैदिक गणिताचा उपयोग होतो.
बारावी नंतर वैदिक गणितातील डिप्लोमा करता ऍडमिशन घेता येते. भारतामध्ये पुष्कळ विश्वविद्यालयांमध्ये अशी सुविधा आहे.
तसेच अनेक खाजगी संस्थांमध्ये सुद्धा वैदिक गणित शिकवले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी ज्या संस्थांमध्ये केली करून घेतली जाते तिथे सुद्धा वैदिक गणिताचे वेगळे वर्ग घेतले जातात. वैदिक गणित हे उद्योजकता विकास या कार्यक्रमांतर्गत सरकारतर्फे सुद्धा शिकवले जाते. यामध्ये बेसिक लेव्हल, मास्टर लेव्हल आणि ग्रँडमास्टर लेव्हल यामध्ये हे गणित शिकवले जाते.
वैदिक गणितातील सूत्रे—
वैदिक गणितामध्ये १६ सूत्रे यांना फॉर्म्युला म्हणतात व १३ उपसूत्र यांना सब फॉर्मुला असे म्हणतात. याद्वारे ही गणिते सोडवली जातात. अंकगणित, बीज गणित, भूमिती, शंकू , वर्ग वर्गमूळ काढणे या सगळ्यांमधली उदाहरणे या फॉर्म्युल्या द्वारा सोडवले जातात.
ही सूत्रे आणि उपसूत्रे संस्कृत मध्ये दिलेली आहेत. अर्थात त्याचे भाषांतर विविध भाषांमध्ये सगळ्यांना समजावे म्हणून केले गेलेले आहे
सूत्रांची नावे–
१)एकाधिकेण पूर्वेण—–मागच्या पेक्षा एक अधिक
२) निखिलं नवतश्चरमं दशतः—-सर्व नऊ पासून आणि शेवटचे 10 पासून
३)उध्वतिर्यग्भ्याम्–अनुलंब आणि क्रिस क्रॉस
४)परावत्यं योजयेत–हस्तांतरित करा आणि समायोजित करा
५) शून्यं साम्यसमुच्चये–जेव्हा बेरीज समान असते तेव्हा बेरीज शून्य असते
६)शून्यमन्यत–एक गुणोत्तर असल्यास दुसरा शून्य आहे
७)संकलनव्यवकलनाभ्याम्—बेरीज आणि वजाबाकी करून
८)पूरणपूरणाभ्याम्—पूर्ण किंवा पूर्ण झाल्यामुळे
९)चालना कलनाभ्याम्–फरक आणि समानता
१०)यावदूनम्–त्याची कमतरता कितीही असो
११)व्यष्टिसमष्टि–भाग आणि संपूर्ण
१२)शेषाण्यकेनचरमेण–शेवटच्या अंकाने उर्वरित
१३)सोपान्त्यव्दयमन्त्यम्–अंतिम आणि उपांन्त्य
१४)एकन्यूनेन पुर्वेण—-मागच्या पेक्षा एक कमी
१५)गुणितसमुच्चय–बेरीजचे गुणाकार हे उत्पादनाच्या बेरजेइतके असतात.
१६)गुणकसमुच्चयः–बेरजेचे कारक घटकांच्या बेरीज इतके असतात
उपसूत्रांची नावे—-
१)अनुरुपयेना—प्रमाणानुसार
२)आद्यमद्येन्यंत यंत्रे ना–प्रथम प्रथम आणि शेवटचे शेवटचेच
३)सिस्यते शेषसंज्ञा–अवशेष स्थिर राहतो
४) वेस्तानं–
५)केवलैः सप्तकम् गुण्यात –
६)समुच्चयगुणितः–उत्पादनातील ग्राहकांची बेरीज
७) लोपनस्थापनाभ्यम्–पर्यायी निर्मूलन आणि धारणा करून
८) यवदुनं तवदुनं–कमतरते द्वारा कमी
९ यवतुनं तवदुनं वर्गांका योजयेत्—जी काही कमतरता असेल त्या रकमेने कमी करा आणि कमतरतेचा वर्ग करा.
१०)अंत्ययोर्दशके–शेवटचे एकूण दहा
११)अंत्ययोरेवा–फक्त शेवटच्या अटी
१२) विलोकनम–निरीक्षण करून
१३)गुणितस्मुचायः समुच्चयागुणितः —बेरजेचे उत्पादन म्हणजेच उत्पादनांची बेरीज
अर्थात हे सगळे सूत्र आपण जेव्हा प्रत्यक्षात गणित सोडवू तेव्हाच समजतात.
वैदिक गणितातील युक्त्या–
१० या संख्येला पूर्ण अंक म्हणतात व नऊ ला ब्रम्ह संख्या म्हणतात.
वैदिक गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, इतर क्रिया करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. ज्या सामान्य गणित करताना जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा अतिशय कमी वेळात गणित सोडवले जातात. या युक्त्यांमुळे मुलांची गणित करण्याची आवड वाढते.
उदाहणासाठी आपण बेरजेचे उदाहरण बघू.
९७७४५+६२३१८+८५५१२+५०४५२
एकाधिकेन पूर्वेण हे सूत्र वापरून हे गणित सोडवूया.
१)दिलेले गणित स्तंभामध्ये थोडी जागा सोडून लिहिले जाईल.
९ ७ ७ ४ ५
.
६ २ ३ १ ८
. .
८ ५ ५ १ २
. .
५ ० ४ ५ २
————–
२ ९ ६ ०२ ७
२)५व ८ यांची बेरीज करा=१३
३) ८ च्या वर असलेल्या एक वर चिन्हांकित करा
४) तीन ला दोनने जोडा ३+२=५
५)५+२=७
६) उत्तराच्या ठिकाणी ७ लिहा
७)अशा प्रकारे पुढच्या संख्या एकमेकांना जोडत चला व हातच्या संख्या असतात ती संख्या न लिहिता मागच्या स्तंभातल्या संख्येवर चिन्हांकित केले जात त्याला त्या संख्येत जोडत जायचे.
अशाच प्रकारे वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांच्या वैदिक गणितात दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी याचा जर सराव केला तर हे गणित अजिबात कठीण नाही.
एक उदाहरण वजाबाकीचे बघू
४४-१८=२६
एकाधीकेण पूर्वेण या वैदिक गणिताच्या सूत्राचा वापर करून आपण खालील वजाबाकी करू.
४ ४
_
.
१ ८
——–
२ ६
८>४, म्हणून एकला संख्यांकित करायचे(एकाधिक)
आठ चे पूरक म्हणजे १०-८=२, चार मध्ये दोन मिळवायचे आणि त्याला उत्तरांमध्ये लिहायचे. एकला संख्यांकित केले आहे म्हणजेच १+१=२, चार मधून दोन वजा करायचे व उत्तरात लिहायचे.
कुठले सूत्र वापरायचे हे त्या त्या गणितावर निर्भर असते त्याकरता वैदिक गणित नीट शिकावेच लागते.
गणित सोडवण्याचा सराव करावा लागतो.
वैदिक गणितामध्ये अशा अनेक लहान लहान युक्त्या आहेत ज्यांनी गणित सोडवणे सोपे होते आणि हे सगळ्याच पद्धतीच्या गणितांमध्ये वापरले जाते
वैदिक गणिताचे फायदे–
१) गणित सोडवायला गती येते.
२) मानसिक रित्या गणित सोडवता येते त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी होतो.
३) या वैदिक पद्धत म्हणजे सूत्र आणि उपस्थित दिले आहेत त्यांच्या वापरामुळे गणितातील रुची वाढते.
४) सूत्रामुळे विद्यार्थ्यांच्या गणित करण्याच्या चुका कमी होतात.
५) गणित सोपे होतात.
६) वैदिक गणित सोडवण्याची पद्धत वापरून कठीण समस्या सोडवल्या जातात.
७) सर्जनशीलतेचा विकास होतो.
८) स्मरणशक्ती आणि धारणा सुधारते.
९) फक्त नऊ पर्यंत पाढे माहिती असले की पुढचे पाढे सहज येतात .
१०) वैदिक गणित शिकले की विद्यार्थी त्याची गती आणि म्हणून त्यातील समज वाढवू शकतो.
अजूनही म्हणावे तसे वैदिक गणिताला महत्त्व प्राप्त झालेले नाही. कारण आपल्या देशामध्ये संस्कृतचा प्रचार खूप कमी आहे. म्हणूनही कदाचित तसे असेल.
वैदिक गणिताकरता उपलब्ध असलेली पुस्तके—
१) वैदिक गणित–जगद्गुरु भारती कृष्ण तीर्थ
२) वैदिक बीजगणित–वीरेंद्र कुमार
३) विद्यार्थींयो हेतू वैदिक गणित–राजेश कुमार ठाकूर
४) वैदिक गणित –सुमिता बोस
५) वेदिक सिस्टम ऑफ मॅथमॅटिक्स–पी के भट्टाचार्यजी
६) वैदिक गणित-डॉक्टर प्रेम भारती
७) वैदिक वाङ्ममय मे गणित शिक्षा–डॉक्टर वैजनाथ पांडे
८) सहज सोपे वैदिक गणित–आशा कवठेकर, प्रसाद ढापरे
लेखामध्ये सोडवलेली बेरीज आणि वजाबाकी ही फक्त उदाहरणार्थ दिलेली आहे. वैदिक गणित सोडवताना नीट प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.
वैदिक गणिताचा ठराविक लेव्हलचा अभ्यासक्रम देखील आहे.
वैदिक गणिताची अशी अनेक मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा फायदा आजच्या पिढीने नक्की करून घ्यावा अशी अपेक्षा आहे.
वैदिक गणित म्हणजे काय आणि आजकालच्या काळात त्याचे महत्त्व what is vedic maths and its importance in new era हा लेख आपल्याला कसा वाटला ते आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देऊन नक्की कळवा आणि प्रतिक्रिया द्या तसेच आमचे इतरही लेख आणि कथा नक्की वाचा व आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा व आमच्या व्हाट्सअप चॅनललाही जॉईन व्हा. धन्यवाद!
लेखिका– वैशाली देव( पुणे )
Nicely explained…… practicing it an early age would help a lot though .Lot of strength in Vedas!