न्यायमूर्ती बी व्ही नागारत्ना l Who is justice BV Nagarathna

WhatsApp Group Join Now

पहिल्या महिला सरन्यायाधीशपदावर नियुक्त होण्याची शक्यता असलेल्या नावांमध्ये न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांच्या नावाचा समावेश आहे

BV Nagarathna: सरन्यायाधीशपदी नियुक्त होण्याची शक्यता असलेल्या नावांमध्ये न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना यांचा समावेश आहे॰ त्या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनतील शक्यता आहे. २०२७ मध्ये त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधीची सर्व औपचारिकता आणि नियुक्त्यांची पूर्तता प्रक्रिया सुरु झालेली आहे, अशीही माहिती सांगितली जात आहे. जर असे ठरविल्याप्रमाणे सर्व काही घडले तर सुप्रीम कोर्टात लवकरच ९ सरन्यायाधीश शपथ घेतील. तसेच तेलंगणाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली या हायकोर्टाच्या एकमेव कार्यरत महिला मुख्य न्यायाधीश आहेत.

बी व्ही नागारत्ना यांचे विचार जर आपल्या पर्यन्त पोहोचले तरच त्यातील त्याच्या विचारांची खोली आपल्या लक्षात येईल. त्यांनी जसा महिला सबळीकरणावर भर दिला आहे तसेच एकूणच समाजाचा दृष्टीकोन कशा प्रकारे बदलला पाहिजे यावरही भाष्य केले आहे.

Who is justice BV Nagarathna
Who is justice BV Nagarathna

२८ व्या सुनन्दा भांडारे स्मारक व्याख्यान सोहळ्यातील त्यांचे काही महत्वाच्या विषयांवर भाष्य:

१.       बी.व्ही नगरत्ना म्हणतात की महिलांना सशक्तीकरणाच्या आणि सबळीकरण्याच्या दृष्टीने आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय घेतले  आहेत. लैं*गि*क भेदभाव संपवण्यासाठी अनेक न्यायालयांनी आपल्या निर्णयांमधून पावलं उचलली आहेत. तरीही मुलगा-मुलगी यांच्यात भेद आजही समाजात केला जातो.

२.      त्या पुढे त्या म्हणतात खासगी क्षेत्रात जेव्हा महिला काम करत असतात तेव्हा मातृत्वाच्या रजेनंतर त्यांना तिथे अव्हेरल जात.  त्याजागी दुसऱ्या कुणाची तरी निवड झाल्याचं त्यांना समजतं. अनेक स्त्रियांच्या नोकर्‍या, या त्यांना मूल झालं म्हणून जातात, हे नाकारता येणार नाही.

३.      महिला आणि पुरुष या दोघांनीही लक्षात घेतलं पाहिजे की विवाहसंस्था हा समाजाचा मुख्य स्तंभ आहे. तसंच कुटुंबसंस्थेची समाजात एक महत्त्वाची भूमिका असते. कुटुंब म्हणून नवरा-बायको दोघांनीही एकमेकांना समान वागणूक दिली पाहिजे. महिलांच्या सन्मानाकडे प्रत्येकानेच लक्ष दिले पाहिजे. जसे की प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे एखादा पुरुष असतो तसंच एका यशस्वी पुरुषामागे त्याचं कुटुंब असलं पाहिजे. असंही मत नागारत्ना यांनी मांडलं आहे.

त्या आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाल्या की आता ही वेळ आली आहे की पुरुषांनाही जाणीव व्हावी की महिलांना आर्थिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाल्याने त्या सबळ झाल्या आहेत. हे मत जरी त्या मांडत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या महिला  स्वतंत्र आहेत म्हणून महिलांनी पुरुषांवर अधिकार गाजवू नये. दोघांनीही एकमेकांना समान वागणूक दिली पाहिजे. ज्या नात्यात सन्मान असेल तिथे घरगुती हिं*सा*चारासारख्या घटना घडत नाहीत. असंही मत नागारत्ना यांनी मांडलं आहे.

कोण आहेत बी व्ही नागारत्ना:-Who is justice BV Nagarathna?

२६ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायमूर्ती बेंगलोर वेंकटरमय्या नागारत्ना यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी शपथ घेतली.

न्यायमूर्ती बी व्ही नागारत्ना यांचा जन्म:-  

बेंगलोर वेंकटरमय्या नागारत्ना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६२ रोजी बंगलोर येथे कर्नाटक राज्यात झाला. यांचे वडील इ एस वेंकटरमय्या हे भारताचे १९ वे सरन्यायाधीश होते. त्यांचे शालेय शिक्षण सोफिया हायस्कूल बंगलोर मधून झाले आहे.  त्यांनी १९८४ मध्ये जिजस अँड मेरी कॉलेज मधून कला शाखेतून इतिहास या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर दिल्ली विश्व किद्यालयातून विधी विद्या शाखेतून कायद्याची पदवी घेतली.

१९८७ साली त्यांनी कर्नाटकच्या बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नावनोंदणी केली आणि  केस्व्व्हि अँड कंपनी मधून वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली. मात्र १९९४ पासून त्यांनी त्यांची स्वतंत्र प्रॅक्टीस सुरू केली.

त्यांनी कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरण (KSLSA) आणि उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे प्रतिनिधित्व केले आहे. काही प्रकरणांमध्ये तर त्यांची ॲमिकस क्युरी (Amicus Curiae )म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. 2008 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाली आहे. त्यापूर्वी त्या बेंगळुरूमध्ये घटनात्मक आणि व्यावसायिक कायद्याची प्रॅक्टीस करीत होत्या. १७ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांची कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

न्यायमूर्ती बी व्ही नागारत्ना यांचे महत्वपूर्ण निर्णय :-

१.      नोटबंदीच्या निर्णया विरोधातील आक्षेप घेणार्‍या एकमेव न्यायाधीश 

न्या. नागरत्ना यांनी आपल्या निकालातील निष्कर्षात म्हटले की, नोटबंदी करण्याचा हेतू हा नक्कीच चांगला होता. नोटबंदीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया चुकली आहे

आपल्याला माहिती आहे का७ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय अवैध आहे आहे अशा प्रकारच्या ५८ याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने हा निर्णय योग्य ठरविला होता. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या पाच सदस्यीय खडपीठातील एक सदस्य होत्या. आणि त्यांनीच या निर्णयाच आक्षेप घेतला होता. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांच्यामते  आरबीआय कायदा कलम 26(2) अंतर्गत केंद्र सरकारने निर्णय घेण्याचे सगळे अधिकार स्वतःकडे ठेवण्यावर त्यांचा  आक्षेप होता.  

केंद्र सरकारला नोटबंदी करण्याचा निर्णय हा सूची १ मधील एन्ट्री 36 नुसार घेता आला होता. हे कलम चलन, नाणे, परदेशी चलन याबाबत निर्णय घेण्याबाबतचे आहे. आरबीआय कायद्याच्या कलम 26(2) अंतर्गत नोटाबंदीचा प्रस्ताव आरबीआयकडून येणे अपेक्षित होता. केंद्र सरकारने नोटांच्या सर्व मालिका बंद करणे ही बाब आरबीआयने काही मालिकांच्या नोटाबंदी करण्यापेक्षा अधिक गंभीर आहे असे त्यांचे म्हणणे होते.

नोटाबंदीचा निर्णय हा राजपत्रित अधिसूचना आणून नव्हे तर प्रत्यक्ष कायदा आणून तयार व्हायला हवा होता असेही त्यांनी म्हटले. लोकशाही असताना केंद्र सरकारला एवढ्या मोठ्या निर्णयापासून संसदेला अंधारात ठेवणे हा निर्णय अयोग्य होता, असे त्यांचे म्हणणे होते.

प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान आर बी आय ने सादर केलेल्या दस्तऐवजा नुसार त्यातले एक आक्षेपार्ह विधान असे होते की, ‘केंद्र सरकारला हवे होते किंवा केंद्र सरकारची इच्छा होती’. त्यानुसार, नोटबंदीचा हा निर्णय आर बी आयने स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय नव्हता. आणि तो तर २४ तासात घेण्यात आला होता.  आरबीआयचे मत ही शिफारस आहे असे मानणे योग्य नाही, असेही न्या. नागरत्ना यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले होते. न्या. नागरत्ना यांनी आपल्या निकालात असे म्हटले आहे  की, नोटाबंदी करण्यात आलेल्या ९८ टक्के नोटा या बँकेच्या माध्यमातून बदलून देण्यात आल्या. त्याशिवाय, चलनात 2000 रुपयांची नवी नोट आणण्यात आली. हा निर्णय म्हणजे नोटबंदीच्या निर्णयाने अपेक्षित परिणाम झाला नाही अथवा प्रभावी ठरला नाही, याकडेही न्या. नागरत्ना यांनी लक्ष वेधले. 

२.      बिलकीस बानो खटला :

काय आहे बिलकीस बानो खटला?

या प्रकरणाची सुरुवात झाली ती २००२ साली गुजरात मध्ये गोध्रा ट्रेनमधून कारसेवक प्रवास करीत होते आणि त्या ट्रेन च्या दोन बोगींना आग लावण्यात आली होती, त्यात त्या कार सेवकांचा अंत झालाच पण त्याच बरोबर ट्रेनमधील आणखी प्रवासीही मृत्यूमुखी पडले. त्यावेळी गुजरात मध्ये जी दं*ग*ल झाली . त्यावेळी संपूर्ण गुजरात पे*टू*न उठले होते, आणि त्या दंगलीवेळी बिलकीस बानो या पाच महिन्यांच्या गर्भवतीवर ब*ला* त्का*र केला गेला. हे एवढ्यावरच न थांबता तिच्या कुटुंबातील सात जणांची ह* त्या करण्यात आली. बिलकीस बानो यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाची दाद मागितली. त्यावेळी काही विशेष कारणास्तव हे प्रकरण महाराष्ट्रात वर्ग केले गेले होते. २००८ मध्ये यातील ११ आरोपींना मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवून जन्म*ठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई हायकोर्टाने देखील ही शिक्षा काम ठेवली होती. या दोषींनी १८ वर्षांचा तुरुं*ग*वास भोगला होता. राधेश्याम शाही यानं कलम ४३२ आणि ४३३ अन्वये माफ व्हावी म्हणून गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. गुजरात कोर्टाने यातील ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयासंदर्भात बिलकीस बानो यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्दबादल ठरवला. या खंडपीठाने असेही म्हटले आहे की, गुन्हेगारांवर ज्या राज्यात खटला चालवला जातो आणि शिक्षा सुनावण्यात येते तेच राज्य दो*षींच्या माफीबाबत निर्णय घेऊ शकते. आणि याकडे फक्त शिक्षा होणे एवढ्यावरच मर्यादित न राहता स्वतंत्र भारतात एका महिलेचा सम्मान झाला पाहिजे असे मत न्या. बी. व्ही. नागरत्ना यांनी व्यक्त केले आहे.

अशा प्रकारे बी व्ही नागरत्ना यांची आपण काही विशेष न्यायदान पद्धती बघितली आता आपण सरन्यायाधीशांची नियुक्ती कशा प्रकारे होते ते पाहू.

सरन्यायाधीशांची निवड कशाप्रकारे होते ते पहा:-

आपल्या भारतात सरन्यायाधीश पदाची निवड ही राष्ट्रपतींकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्तींसाठी  एखाद्या न्यायमूर्तींची शिफारस राष्ट्रपतींना करण्यात येते.  राष्ट्रपती हे केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यानं सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. 

तुम्हाला ही माहिती (Who is justice BV Nagarathna)कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

4 thoughts on “न्यायमूर्ती बी व्ही नागारत्ना l Who is justice BV Nagarathna”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top