कर्पुरी ठाकूर यांची ओळख l karpoori thakur information in marathi

WhatsApp Group Join Now

भारतरत्न कर्पुरी ठाकूर एक आदर्श.

भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक, बिहारचे मुख्यमंत्री, तथाशिक्षक आणि ज्येष्ठ राजनीति तज्ञ कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या शताब्दीदिनी म्हणजेच 23 जानेवारी 2024 रोजी मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला आणि याची घोषणा काल 23 जानेवारी च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवन येथे करण्यात आली. भारतरत्न सर्वोच्च भारतीय सन्मान.शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्वच प्रकारची आवड असणारे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न कर्पूरी ठाकूर. भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला त्यांच्या सामान्य जीवनशैलीची आणि एक आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे संपूर्ण जीवन आपण आपल्या आजच्या या सदरात पाहणार आहोत,

             कर्पुरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी समस्तीपुर बिहारमध्ये झाला. आपल्या गावातच त्यांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण केले. 1940 साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. त्यावेळी आपला भारत देश हा स्वतंत्र नव्हता.सगळीकडे स्वतंत्रता आं*दोलन चालू झाले होते आणि याच आंदोलनात त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. आचार्य नरेंद्र देव यांच्यासोबत त्यांनी समाजवादी आंदोलन उभे केले. 1942 साली महात्मा गांधी यांच्यासोबत केलेल्या असहकार आंदोलना दरम्यान त्यांना अटक करण्यात देखील आली.त्यावेळी त्यांना 24 महिने कारावास झाला. चांगुलपणा आणि वैचारिक सामाजिक दृष्टिकोनामुळे कर्पुरी ठाकूर एक थोर राजनेता मानले जात.एक थोर समाजसेवक असलेले कर्पुरी ठाकूर यांनी कायम अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.त्याकाळी समाजात असलेली अस्पृश्यतेची वागणूक त्यांना आवडत नसे,यासाठी त्यांनी सदैव गरीब आणि अस्पृश्य लोकांसाठी विविध उपाय योजना चालू केल्या. कर्पुरी ठाकूर त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग जे आपल्यालाही प्रेरित करतील ते आपण पाहणार आहोत-

  एक क्रांतिकारी भाषण-

          कर्पुरी ठाकूर एक महान वक्ता देखील होते. आपल्या क्रांतिकारी भाषणामुळे आणि प्रखर बोलल्यामुळे त्यांनी तरुणांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. कर्पुरी ठाकूर यांनी पटनामध्ये केलेल्या स्वातंत्र्यपूर्व भाषणामध्ये असा उल्लेख केला होता की “आपल्या भारत देशाची लोकसंख्या एवढी आहे की सगळे भारतवासी एकदा थुं*कले तरी हे सगळे इंग्रज वा*हून जातील” या वाक्यामुळे त्यांना त्याकाळी दंड देखील ठोठावण्यात आला होता. कर्पुरी ठाकूर एक दूरदृष्टी असलेले राजकारणी होते. ते कायम म्हणत “आपण जनतेचे अधिकार दाबून ठेवले तर आज ना उद्या जनता आपल्याला नक्की उलट प्रश्न केल्याशिवाय राहणार नाही” एक इमानदार व्यक्तिमत्व असलेले कर्पुरी ठाकूर कायमच लोकप्रिय नेते होते.

who-was-karpoori-thakur-in-marathi
कर्पुरी ठाकूर यांची ओळख

12 टक्के आरक्षण-

कर्पुरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 12 टक्के आरक्षण हे दिले होते त्यात एकूण 79 जातीचा समावेश त्यांनी केला होता.तसेच आदर्श व्यक्तिमत्व असलेले कर्पुरी ठाकूर कायमच लोकप्रिय नेते राहिले. कर्पुरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री बनले,जयप्रकाश नारायण आणि डॉ.राम मनोहर लोहिया हे त्यांची राजनीती गुरु होते. 1952 साली ते पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून बिहारचे मुख्यमंत्री झाले इमानदार व्यक्तिमत्व असलेले कर्पुरी ठाकूर कायमच इतरांची मदत करत असत.

खिशातील पैसे काढून दिले-

एकदा कर्पुरी ठाकूर यांच्याकडे एक तरुण सरकारी नोकरी मागण्यासाठी आला असता.त्यांनी त्यांच्या खिशातील काही पैसे काढून त्याला दिले आणि आपला पारंपारिक व्यवसाय पुढे असाच चालू ठेव म्हणून त्याला समजून सांगितले त्यांच्या या एका वाक्यानंतर त्या तरुणांने आपल्या व्यवसायात खूप प्रगती साधली आणि आपला पारंपारीक व्यवसाय पुढे नेला.कर्पुरी ठाकूर सर्वासाठी एक प्रेरणास्थान होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर मुलगा ओमप्रकाश याला लिहिलेले पत्र-

    कर्पुरी ठाकूर जेव्हा दोनदा बिहारचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपला मुलगा ओमप्रकाश याला एक पत्र लिहिले, त्यात त्यांनी कुठल्याही आमिषाला आणि लोभाला बळी पडू नको याने फक्त बदनामीच होते असा मजकूर त्या पत्रात लिहला.एक उच्चपदस्थ वडील त्यांनी आपल्या मुलाला दिलेला हा मोलाचा सल्ला मी कितीही मोठ्या पदावर गेलो तरी तू माझ्या पदाचा गैरवापर करू नकोस आणि लोकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नकोस .कायम ते आपल्या मुलांना समजून सांगत की पदाचा गैरवापर कधीही करू नका.

मुलागा आजारी असताना नाकारलेली मदत-

         एकदा कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा लहान मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत असताना आजारी पडला.त्यावेळी त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले ही गोष्ट जेव्हा इंदिरा गांधी यांना समजली तेव्हा इंदिरा गांधी यांनी प्रतिनिधी पाठवून कर्पुरी ठाकूर यांच्या मुलाला एम्स मध्ये भरती केले.डॉक्टरांनी त्याला हृदयविकार असल्याकारणाने याच्यावरती त्वरित परदेशी उपचार करून ऑपरेशन करावे लागेल असा सल्ला दिल. यावेळी सुद्धा आपल्या मुलाला या हॉस्पिटलमध्येच जे उपचार होतील तेच करा असे सांगितले यासाठी कुठलीही सरकारी मदत मी घेणार नाही असे स्पष्ट सांगितले. यानंतर इंदिरा गांधी स्वतः त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेल्या आणि आपण इलाजासाठी तुमच्या मुलाला अमेरिकेला पाठवू सगळा खर्च मी करते असे देखील त्या म्हणाल्या.पण या गोष्टीसाठी कर्पुरी ठाकूर यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर जयप्रकाश, कर्पुरी ठाकूर यांचे राजकीय गुरु यांनी  त्यांच्या मुलाचा सर्व वैद्यकीय खर्च करून त्याला इलाजासाठी न्युझीलँडला पाठवले.

   शिक्षणाची आवड असलेले तर कर्पुरी ठाकूर-

      मॅट्रिक पास झालेले कर्पुरी ठाकूर यांनी भारत स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गावात मध्ये राहून तेथील शाळेत शिक्षकाचे काम देखील केले. शिक्षणाची विशेष आवड असणारे कर्पुरी ठाकूर हे बिहारचे शिक्षण मंत्री सुद्धा राहिले त्याकाळात त्यांनी सर्वांना मोफत शिक्षण दिले.गरीबांना सर्व शिक्षण शुल्क माफ केले तसेच हिंदी विषय हा अभ्यास क्रमांत सामावून घेतला. शिक्षण क्षेत्रासाठी देखील त्यांनी खूप मोलाचे योगदान देखील दिले आहे.

आर्थिक विवंचनेत सुद्धा नाकारलेली मदत-

         कर्पुरी ठाकूर यांच्या बद्दल एक प्रसिद्ध असलेला किस्सा एकदा पटनामधील देवीलाल यांनी त्यांच्या एक मित्रला सांगितले होते की सध्या कर्पुरी ठाकूर आर्थिक अडचणी मध्ये आहेत जर कर्पुरी ठाकूर तूम्हाला काही पैसे मागतील तर तुम्ही ते नक्की द्या.हे पैसे तुमचे माझ्याकडे कर्ज राहतील व ते मी फेडेल यानंतर देवीलाल यांनी असे त्यांच्या मित्राला अनेकदा विचारले की कर्पुरी ठाकूर यांनी तुम्हाला पैसे मागितले का? यावर त्यांच्या मित्राचे नाही असेच उत्तर त्यांना  मिळाले.सन्मानी असलेल्या कर्पुरी ठाकुर यांनी कधीच कोणाचीही मदत नाही आणि आपला स्वाभिमान ढळू दिला नाही. त्यांची ही विशिष्ट जीवनशैली कायमच सर्वांना एक आदर्श राहिल.

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन-

       समाजात असलेली जातीय दरी कर्पुरी ठाकूर यांना पसंत नव्हती यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहला नेहमीच प्रोत्साहन दिले.ज्या ठिकाणी आंतरजातीय विवाह होत त्या ठिकाणी स्वतः कर्पुरी ठाकूर हजर राहत आणि वधू-वरांना आशीर्वाद देत. यामुळे त्याकाळी आंतरजातीय विवाह करणाऱ्यास एक आधार मिळत असे.

       कर्पुरी ठाकूर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये एक नायक म्हणून प्रसिद्ध होते. लाखो रुपये खर्च करून मुला मुलींचे लग्न लावण्यात येते पण भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांनी त्यांच्या मुलीचे लग्न हे एका मंदिरात लावले होते.एकदा उपमुख्यमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री असलेले कर्पुरी ठाकूर हे नेहमीच रिक्षाने प्रवास करत.

     सत्तरच्या दशकात जेव्हा बिहार सरकार पटनामध्ये राजकीय नेत्यांना अल्प दरात जमीन देत होती. त्याकाळी सुद्धा कर्पुरी ठाकूर यांनी ती जमीन घेण्यास साफ नकार दिला. यावर एका आमदाराने त्यांना तुम्ही जमीन घेतली तर तुमचे मुलेमुली इथे राहतील,त्यांच्यासाठी तुम्ही ही जमीन घ्या अशी विनंती केली यावर त्यांनी माझी मुलेमुली गावी असलेल्या माझ्या घरातच राहतील.मला ही जमीन नकोय असे स्पष्ट शब्दात सांगितले. काही दिवसानंतर जेव्हा ते आमदार कर्पूरी ठाकूर यांच्या गावी आले असता त्यांनी कर्पुरी ठाकूर यांची झोपडी पाहिली तेव्हा ते खूप रडले, एक राजकीय उच्चपदस्थ व्यक्ती आणि त्याची ही झोपडी त्यातही त्याच्या चेहऱ्यावर असलेले समाधान हे सगळे पाहून त्या व्यक्तीला गहिवरून आले.

भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचा आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा शिकण्यासारखा आहे. एक थोर स्वातंत्र्य सैनिक ते एक संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांनी समाजहिताच्या अनेक गोष्टी करत आपल्या भारतात एक नवे पर्व चालू केले. स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात आपले एक आगेळवेगळे स्थान निर्माण करून केले.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
      धन्यवाद !

2 thoughts on “कर्पुरी ठाकूर यांची ओळख l karpoori thakur information in marathi”

  1. सर्व भारतीयांना माहीत असावी असे व्यक्तिमत्व. माहीतीपूर्ण लेख. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top