स्वतःची गाडी घेऊन लॉन्ग ड्राइवला जायला कुणाला आवडत नाही. पण त्यासाठी आपल्याला गाडी चालविता येणे व आपल्याकडे स्वतःचे ड्रायविंग लायसेंस असणे आवश्यक असते. भारतात ड्रायविंग लायसेन्स हे वयाच्या १८ व्या वर्षी मिळते. तेव्हापासून आपण आपली टू व्हीलर आणि फॉर व्हीलर चालवू शकतो. RTO चे सर्व नियम व्यवस्थित पाळून आणि RTO ची परीक्षा देऊन आपण ते मिळवतो. भारतात आपली ओळखपत्र म्हणूनही आपल्याला याचा वापर करता येतो.
पण आपल्याला माहिती आहे का? भारताच्या व्यतिरिक्त आपल्याला जर परदेशातील चकचकीत रस्त्यांवर गाडी चालविण्याचा आनंद लुटायचा असेल तर आपण या काही देशात आपले भारतीय ड्रायविंग लायसेंस वापरुन गाडी चालवू शकतो. अर्थात परदेशातील रस्त्यांवर आपली गाडी चालविण्याचा आनंद हा खूपच आल्हाददायक आहे. भारतात बनवलेला आपला परवाना हा अनेक देशात अधिकृतपणे आपण वापरू शकतो. काही देशांचे नियम वेगळे आहेत, जिथे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय परवाना असावा लागतो. आज आपण या लेखात तेच वाचणार आहोत की असे कुठेल देश आहेत जिथे आपले Indian Driving License आपण वापरू (valid असते) शकतो.

List of 12 Countries You Can Drive In With An Indian Driving Licence :
१. जर्मनी :-
जर तुम्ही जर्मनी मध्ये फिरायला, शिकायला किंवा नोकरी निमित्त जाण्याची वेळ आली तर तुम्ही तुमची गाडी चालविण्याची हौस किंवा आपला वेळ वाचविण्यासाठी गाडी भाड्याने किंवा स्वतची गाडी चालवू शकता. त्यासाठी नवीन लायसेंस काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे Indian Driving License म्हणजेच गाडी चालविण्याचा भारतीय परवाना वापरुन गाडी चालवू शकता. जर्मनीमध्ये भारतीय लायसेंस हे सहा महिन्यांपर्यंत valid किंवा चालू शकते. पण ते ड्रायविंग लायसेंस हे इंग्लिश मध्ये किंवा जर्मन भाषेत असले पाहिजे. पण त्याच बरोबर आपल्याकडे इतर सर्व आवश्यक कागदपत्र असावी लागतात. तरच आपण जर्मनीमध्ये गाडी चालविण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता.
जर्मनीमध्ये आपल्याला उजव्या बाजूने गाडी चालवावी लागते आणि जर आपल्याला ओव्हरटेक करायचे असल्यास डाव्या बाजूने करावे. प्रत्येक देशाची वाहतूक व्यवस्था समजून घेऊनच आपण गाडी चालवावी. तसेच जर्मनीमध्ये आपल्या गाडीच्या वेगाला मर्यादा नाही.
२. अमेरिका :-
अमेरिकेत आपण (Indian Driving License) आपला भारतीय परवाना वापरुन गाडी चालवू शकतो. अमेरिकेमध्ये आपले भारतीय ड्रायविंग लायसेंस एक वर्षासाठी वैध असते म्हणजे एक वर्षासाठी चालू शकते. तसेच आपले भारतीय लायसेंस हे इंग्रजी भाषेत असले पाहिजे, तसे नसल्यास आपले ड्रायविंग लायसेंस अवैध ठरविले जाते. म्हणूनच आपले ड्रायविंग लायसन्स बनवताना ते इंग्रजी भाषेत असेल याची काळजी घ्या. कारण आता आपल्याला माहिती आहे की कुठे कुठे आणि कोणत्या देशात आपण आपले भारतीय ड्रायविंग लायसेंस वापरू शकतो.
याबरोबरच आपल्याला गाडी चालविण्याआधी आय-९४ हा फॉर्म भरावा लागतो या फॉर्म मध्ये आपण अमेरिकेत येण्याची तारीख दर्शविलेली असते. वाहन चालवताना आपण हा फॉर्म आपल्या सोबत ठेवणे आवश्यक आहे, हा फॉर्म आपण अमेरिकेत कुठेही दाखवू शकता. अमेरिकेमध्ये कार चालवताना ड्रायविंग सीट ही डाव्या बाजूला असते. हे सगळे नियम लक्षात घेऊनच कार चालवावी.
३. कॅनडा :-
अमेरिकेच्या शेजारी असलेला देश म्हणजे कॅनडा. कॅनडाला मिनी पंजाब असेही म्हटले जाते. आपण अशी माहिती वाचलीच असेल. कॅनडा मध्ये ही आपण येथील भव्य अशा रस्त्यांवर गाडी चालविण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो, ते ही आपल्या भारतीय परवान्यासोबत. पण इथले नियम इतर देशांच्या नियमापेक्षा वेगळे आहेत. या देशात आपले भारतील ड्रायविंग लायसेंस फक्त साठ (६०) दिवस वैध असते, तसेच आपले लायसेंस हे इंग्रजी भाषेतच असले पाहिजे. म्हणजे आपण जर काही दिवस कॅनडा मध्ये फिरायला गेला असाल तर आपण काही दिवस गाडी चालवू शकता. पण आपल्याला तिथेच ६० दिवसांपेक्षा जास्त वास्तव्य करायचे असेल तर आपल्याला कॅनडाचे ड्रायविंग लायसेंस काढावे लागेल.
४. स्वित्झर्लंड :-
स्वित्झर्लंड म्हणजे पृथ्वीतलावरील नंदनवन आहे आणि या स्वप्ननगरीत आपण आपले वाहने चालविणे म्हणजे एका सुंदर स्वप्ना सारखेच आहे. इथेही भारतीय लायसेंस वापरुन आपण गाडी चालवू शकतो. पण आपल्या भारतीय लायसेंसची मर्यादा ही फक्त एक वर्षा पर्यन्त वैध आहे, तसेच ते इंग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. आपल्याकडे आपले स्वतचे वाहन नसेल तर आपण आपल्या योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास आपण येथे वाहन भाड्याने घेऊन ते सुद्धा स्वतः चालवू शकता.
५. न्यूझीलंड :-
न्यूझीलंड मध्ये तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करीत असाल तर इथेही तुम्ही तुमचे भारतीय ड्रायविंग लायसेंस वापरू शकता. न्यूझीलंडमध्ये वाहन चालक परवाना हा वयाच्या २१ व्या वर्षी प्राप्त करता येतो. जर तुमचे वय २१ किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या भारतीय ड्रायविंग लायसेंस वापरुन बिनधास्त गाडी हाकू शकता. परंतु वरील देशांप्रमाणेच तुमचे लायसेंस हे इंग्रजी भाषेत असले पाहिजे. अन्यथा तुमच्याकडे न्यूझीलंड मधील ट्रान्सपोर्ट एजन्सीची परवानगी असणे आवश्यक आहे. तुमचा हा परवाना तुम्ही या देशात ज्या तारखेपासून प्रवेश केला त्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असतो.
६. फ्रांस :-
तुम्ही फ्रांस किंवा फ्रांसची राजधानी पॅरिसला जाण्याचा विचार करीत असाल तर जरूर जा. फ्रांसला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्यामुळे भारतीय पर्यटक फ्रान्समध्ये पर्यटनासाठी जातातच. पॅरिसमध्ये वाहने, विमाने व इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवली जातात. पर्यटन हा पॅरिसमधील एक मोठा व्यवसाय असून पॅरिसमधील बहुतेक लोक ह्या व्यवसायात काम करतात. फ्रांस म्हणजेच पॅरिसमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे भारतीय ड्रायविंग लायसेंस वापरू शकता. पण तुमचे भारतीय ड्रायविंग लायसेंस हे फ्रेंच भाषेत भाषांतरीत असणे आवश्यक आहे. फ्रांसमध्ये कार चालवताना ड्रायविंग सीट ही डाव्या बाजूला असते. हे सगळे नियम लक्षात घेऊनच कार चालवावी.
७. ऑस्ट्रेलिया:-
आपण ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसेंस वापरुन गाडी चालवू शकता. परंतु हा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वैध आहे आणि परवाना इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये वाहन चालविण्याचा नियम भारतासारखाच रस्त्याच्या डाव्या बाजूने आहे.
८. मॉरिशस :-
मॉरिशस सारख्या निसर्गरम्य प्रदेशात जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर तिथेही तुम्हाला भारतीय ड्रायविंग लायसेससह गाडी चालविणे शक्य आहे. मॉरिशस मध्ये भारतीय ड्रायविंग लायसेंस हे एक महिन्यासाठीच वैध आहे. त्यानंतर जर आपल्याला तिकडेच वास्तव्य करायचे असेल तर तिकडचे लायसेंस काढणे क्रमप्राप्त ठरते.
९. युनायटेड किंगडम :-
हो, नक्कीच आपण युनायटेड किगडम म्हणजेच यूके मध्ये सुद्धा आपली गाडी चालविण्याची हौस पूर्ण करू शकता. लंडन च्या ऐतिहासिक रस्त्यांवर, स्कॉटिश हायलंड सारख्या नयनरम्य परिसरात आपण स्वतः गाडी चालवून तिथले सौदर्य न्याहाळू शकता. युनायटेड किगडम मध्ये सुद्धा वाहन चालविण्याचा नियम भारताप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूनेच आहे.
१०. स्पेन :-
स्पेनची संस्कृती आणि स्पेनची पाककृती याचा स्वाद आपण आपले वाहन चालवीत चाखू शकतो. स्पेनचा समुद्र किनारा, ऐतिहासिक खाणाखुणा, तेथील सुंदर आणि मोहक खेडेगाव हे सुद्धा आपण आपल्या रोड ट्रिपमध्ये पाहू शकतो. त्यासाठी आपल्याकडे तेथील तपशीलवार रोड मॅप पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमचे भारतीय लायसेंसचा वापर करू शकता. पण तिथे कधीही काही ठिकाणी तुमची ओळख करून देण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे सगळे कागदपत्र आपल्या सोबत ठेवणे सोयिस्कर पडते.
११. दक्षिण आफ्रिका :-
दक्षिण आफ्रिका मध्ये जायचे तुमचे प्रयोजन असेल तर तुम्ही आफ्रिकेचे रस्ते स्टेलेन्बोशचे द्राक्षांचे मळे, तेथील प्राण्यांचे नॅशनल पार्क हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या ड्रायविंगचा अनुभव घेत बघू शकता. हे बघता बघता आपण कॅप्टन आणि जोहंस बर्ग सारख्या दक्षिण आफ्रिकेतील संस्कृतीचा वारसा जपलेल्या शहरांचा फेरफटका सुद्धा मारू शकता. पण येथेही तुमचे भारतीय लायसेन्स इंग्रजी भाषेत छापलेले हवे.
१२. स्वीडन:- स्वीडन मध्ये सुद्धा आपण भारतीय लायसेन्स वापरुन गाडी चालवू शकता. परंतु तुमचं परवाना हा स्वीडिश, इंग्रजी फ्रेंच जर्मन किंवा नोर्वेजियन हा भाषेत छापलेला हवा.
चला तर मग आता आपण या बारा देशांमध्ये तुम्ही तुमच्या भारतीय परवान्यासह वाहन चालविण्याची मजा लुटू शकता. तर मग चला आधी आपण वाहन चालवायला शिकू आणि आपले ड्रायविंग लायसेंस काढून घेऊ. म्हणजे परदेशवारी करताना आपल्याला कोणतीच समस्या येणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतः त्या परदेशातल्या चकचकीत रस्त्यांवर गाडी घेऊन हुंदडू शकता.12 Countries You Can Drive In With An Indian Driving Licence
तुम्हाला “12 Countries You Can Drive In With An Indian Driving Licence” ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आवडली का? हा लेख कसा वाटला? तेही कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुप हि जॉईन करा.
लेखिका : सपना कद्रेकर.
Thanks for the info