सुंदर दिसण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स l Everyday tips for beautiful face in Marathi

WhatsApp Group Join Now

ब्युटीफुल टिप्स फॉर ब्युटीफुल फेस 

आपण कसे दिसत आहे हे जाणून घेण्यासाठी दिवसातून किती वेळा आरसा बघता बरं ?  सुंदर , छान टापटीप , ताजातवाणा  चेहरा आरशात पहिला की स्वतःला च छान वाटतं , बरोबर ना ? मग मन ही प्रफुल्लित होते . मन आनंदी असले की आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी आणि एकूण वातावरण च छान वाटायला लागते . पण  हे सुंदर दिसणं म्हणजे केवळ मेक-अप करून नाही तर खरच तुमची त्वचा निरोगी आहे का ? यासाठी तुम्ही काय काळजी घेता ? चला तर मग आजच्या या लेखामधून Everyday tips for beautiful face in Marathi आपण सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स बघूया. 

तुमचा चेहरा हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाचं सौंदर्य हे आतून आणि बाहेरून अशा दोन प्रकारे खुलून दिसत असतं . काही मूलभूत अशा सवयी ज्या तुमच्या शरीराला आतून निरोगी ठेवतात आणि पर्यायाने तुमच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होतात. कुठल्या अशा सवयी ज्या तुम्हाला आतून सुंदर बनवायला मदत करतील.  

1. ऑर्गेनिक पदार्थ : (organic food )

  • तुम्ही जे पदार्थ खाता ते ताजे आणि ऑर्गेनिक आहे का ? ऑर्गेनिक म्हणजे कुठल्याही केमिकल किंवा औषधी फवाऱ्यांचा वापर न करता उगवण्यात आलेले.
  • आहारातील ऑर्गेनिक पदार्थांचा वापर वाढवला तर केमिकल्स मुळे शरीरावर होणारे  वाईट परिणाम कमी होऊन तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. 
  • जंक फूड, अति प्रमाणात तळलेले पदार्थ हे पोटासाठी आणि त्वचेसाठी नुकसान पोहोचवतात. आयुर्वेदात पोट आणि चेहऱ्याचा थेट संबंध अतिशय समर्पक दिलेला आहे. 
  • पोट साफ नसेल तर चेहऱ्यावर पुटकुळया येणे , मुरूम येणे या समस्या वाढू शकतात.
  • ऑर्गेनिक भाज्या ,फळे ,पालेभाज्या खाण्यावर भर असू द्या.
  • मोसमाप्रमाणे फळभाज्या ,फळं  यांचा आहारात समावेश करा. आवश्यकतेनुसार पाणी प्या.

2. पुरेशी झोप : ( enough sleep )

  • पुरेशी झोप ही निरोगी आरोग्यासाठी अतिशय महत्वाची मनाली जाते .लवकर निजे लवकर उठे , त्यासी आयु – आरोग्य लाभे ! 
  • उशिरा पर्यंत जागे राहिल्यामुळे शरीराचे घडयाळ बिघडते , त्याची कार्य करण्याची पद्धती मध्ये बाधा निर्माण होते. शरीरात अनेक रोग- व्याधी तयार व्हायला सुरू होते. 
  • तुम्हीच बघा , ज्या दिवशी तुमची झोप छान झालीय त्या दिवशी तुमचा चेहरा आणि मन प्रसन्न असते.  दिवसभर ताजेतवाने वाटते मात्र हेच  ज्या दिवशी पुरेशी झोप नसते त्या दिवशी चेहरा मरगळलेला असतो , दिवसभर सुस्त वाटत राहते.

3तुमच्या दिवसाची सुरुवात तनाव-रहित करण्याचा प्रयत्न करा: (try to live stress free everyday)

  • साधारण एक महिना एक सोपा उपाय करून बघा .रोज लवकर उठून अर्धा तास तरी फिरायला जा. 

यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात तजेलदार होईल. आजकाल सगळ्याच सोसायटीमध्ये फिरण्यासाठी पुरेशी जागा , हिरवळ असते . त्यामुळे चालणे हा उत्तम व्यायाम म्हणून सुरू करू शकता.  यामुळे स्वतःला वेळ मिळतो , दिवसभर बैठे काम करून अनेक व्याधी मागे लागतात त्यामुळे शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे.

  • चालण्यामुळे तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते , त्यामुळे दिवसभर तणाव-रहित रहायला मदत होते. 
  • फेस योगा देखील करू शकता या  मध्ये चेहऱ्याचे व्यायाम केल्याने चेहऱ्याच्या स्नायू रीलॅक्स होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो . 

4सकारात्मक विचार करा : (think positive)

  • शरीर जसे निरोगी राहावे यासाठी आपण काळजी घेतो तसेच मनाची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे. 
  • निरोगी मनाचे गुपित हे तुमच्या विचारांवर असते , तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो.
  • सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा हा कायम प्रसन्न असतो , तणाव-रहित असतो. तेच तक्रार करणारा – नकारार्थी विचार करणारा कायम चिंतित किंवा काळजीत पडलेला असतो ,आता तुम्हीच सांगा , असा चेहरा कसा सुंदर दिसणार ? 

आता बघूया अशा काही टिप्स ज्या तुम्हाला बाहेरून सुंदर दिसयला मदत करतील . 

5. सौंदर्य प्रसाधन : (beauty products)

  • आजकाल बाजारात अनेक सौंदर्य प्रसाधनं ( beauty products ) मिळतात . पण त्यातून होणारे त्वचेचे विकार ,काळेपणा या तक्रारी मुळे बऱ्याच महिला वर्ग म्हणा किंवा तरुण पिढी म्हणा पुन्हा आयुर्वेदकडे वळू लागली आहेत.

घरगुती उपाय (Everyday tips for beautiful face in Marathi)

आजीबाईच्या बटव्यात जशी घरगुती औषधी असतात तशीच अनेक घरगुती उपायांनी चेहऱ्याची काळजी देखील घेतली जाऊ शकते कुठलेही साईड इफेक्ट शिवाय ! कुठले ते बघूया . यातील कुठलेही पदार्थ वापरताना चेहऱ्याचा प्रकार (तेलकट त्वचा ,कोरडी त्वचा, संवेदनशील त्वचा )समजून घेऊन मगच चेहऱ्यासाठी वापरा . 

अ .कोरफड –  (  benefits of Aloe Vera  in marathi )

  • अनेक वर्षापासून सौंदर्य निखारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कोरफड मुळे चेहऱ्याची त्वचा नितळ होण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. पुटकुळया ,मुरूम कमी होण्यास मदत होते. आजकाल बाजारात कोरफड जेल , ज्यूस मिळतो.
  • कोरफड रोप घरी लावलेले असल्यास त्याचा गर कसा काढावा याची पद्धत नीट समजून घ्यावी. चुकीच्या पद्धतीने काढल्यास आणि वापरल्यास त्याचा परिणाम तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते.
  • या गरात थोडे खोबरेल तेल वापरुन तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकतात व पाच ते दहा मिनिटांनी धुवून टाकू शकता. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात.
  • कोरफड बाजारात सहज उपलब्ध होते. 

ब . मुलतानी माती – ( benefits of multani mati in marathi )

  • मुलतानी माती देखील चेहऱ्याचे सौंदर्य खुलवते. मुलतानी माती वापरल्यामुळे चेहऱ्यावरच्या मृत (face dead skin ) झालेल्या पेशी निघून जातात.
  • तेलकट त्वचा असल्यामुळे चेहऱ्यावर पुटकुळया येणे , मुरूम येणे हा त्रास होतो. तेव्हा मुलतानी मातीच्या वापरामुळे अतिरक्त तेल निघून जाण्यास मदत होते, मुलतानी माती वापरल्यामुळे पुटकुळया-मुरूम या पासून आराम मिळतो.
  • गुलाब पाण्यात मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा चमकदार , ताजीतवानी होते.  
  • मुलतानी माती देखील बाजारात सहज उपलब्ध होते.

क. कच्चे दूध – ( benefits of raw milk in Marathi )

  • कच्च्या दुधाने रोज चेहऱ्याला मसाज केल्याने चेहरा मऊ , तजेलदार तसेच चमकदार होण्यास मदत होते. 
  • चेहरा उन्हामुळे काळवंडला असेल तर कच्च्या दुधाच्या वापराने लाभ होतो. 
  • चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्याची त्वचा मॉइश्चरायझ  करायला फायदेशीर ठरते. 
  • कच्च्या दुधामध्ये डाळीचे पीठ (बेसन )आणि मध घालून त्याचा फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावून साधारण  5 ते 10 मिनिटांनी धुवून टाकू शकता. 
  • बऱ्याच जणांना डोळ्याच्या खाली काळे डाग ( डार्क सर्कल ) असतात . ते देखील कच्च्या दुधाच्या नियमित वापरल्याने कमी होण्यास मदत होते.
  • कच्चे दूध वापरणे अतिशय सोपं आणि तितकेच फायदेशीर आहे शिवाय कुठल्याही साईड इफेक्ट ची भीती नाही. 

ड. हळद –  ( benefits of turmeric in Marathi )

  • हळद ही अॅंटी सेप्टिक असल्याने आपण कुठल्याही जखमेवर घरगुती उपाय म्हणून हमखास वापरतो. सौंदर्याच्या टिप्स मध्ये सुद्धा हळद मागे नाही. हळदीचा वापर गेले कित्येक वर्ष चेहरा उजळवण्यासाठी केला जातो. 
  • चिमूटभर हळद , डाळीचे पीठ ( बेसन ) , गुलाबपाणी अथवा दूध , दुधाची साय  हे सारे एकत्र करून चेहऱ्याला हा पॅक लावल्याने चेहऱ्याचा पोत सुधारतो. चेहरा तजेलदार होतो. त्वचा मऊ होते.

इ. नारळाचे तेल – ( benefits of coconut oil in Marathi )

  • नारळाचे तेल हा देखील सोपा उपाय आहे .नारळाच्या तेलाने चेहरा तसेच हात -पाय यांना देखील मसाज करू शकता यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. 
  • त्वचे वरच्या सुरकुत्या कमी होतात.

ई. तांदळाची पिठी – ( benefits of rice flower in Marathi )

  • तांदूळ हा सुद्धा असाच नैसर्गिक पदार्थ आहे ज्याच्या पिठीचा वापर चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी केला जातो.
  • तांदूळाची पिठी ,कच्चे दूध , साय हे एकत्र करून याचा वापर स्क्रब म्हणून आणि फेस पॅक म्हणून देखील करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघू जाण्यास मदत होते.त्यामुळे मुरूमाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास फायदा होतो.

चेहरा प्रसन्न ठेवण्यास अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सुहास्य ! स्वतःला आनंदी ठेवा . “ स्मायलिंग फेस इज बेस्ट रेमेडी टु लुक ब्यूटीफूल ! “

आजचा लेख (Everyday tips for beautiful face in Marathi) कसा वाटला ते नक्की कळवा . असेच माहितीपर लेख आणि कथा वाचण्यासाठी ‘लेखमित्र’ संकेतस्थळाला भेट द्या आणि व्हॉटस्अप  चॅनेल ला जॉइन करा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top