स्क्रिप्ट कशी लिहावी? l How to write a script in Marathi

WhatsApp Group Join Now

     How to write a script in Marathi: एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट म्हणजेच कथा किंवा मग एखाद्या नाटकाची संहिता ही खूप महत्त्वाची असते किंबहुना तीच पहीली पायरी असते. अगदी युट्यूबवरचा एखादा व्हिडिओ असेल, तरी तो बनवण्यासाठी सुद्धा आधी त्या विषयावर स्क्रिप्ट लिहीली जाते. आता तुम्हाला वाटेल हे सगळे मनोरंजनाचे बघितले जाणारे म्हणजे दृश्य स्वरूपातील प्रकार म्हणून स्क्रिप्ट गरजेची असते पण असं नाही, आपण जे फक्त ऐकतो म्हणजे जे श्राव्य रूपात असतं उदाहरणार्थ रेडिओ वरील एखादा कार्यक्रम असो किंवा एखाद्या चॅनल वरील पॉडकास्ट असो तर याची सुद्धा स्क्रिप्ट लिहीली जाते. 

      पॉडकास्ट हे ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असतं परंतु सामान्यतः पॉडकास्ट म्हणजे एखादी कथा, कविता, एखादी मुलाखत किंवा दिलखुलास पणे मारलेल्या गप्पा तुम्ही एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नुसते ऐकता म्हणजे “ऑडिओ पॉडकास्ट”. 

      आता हेच तुम्हाला तुमचं स्वतःचं पॉडकास्ट चॅनल सुरू करायचं असेल तर विविध प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते अपलोड करू शकता. परंतु त्यासाठी आधी चांगली स्क्रिप्ट लिहिणं गरजेचं आहे. आता ती कशी लिहावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

        सध्या मनोरंजनाचे बरेच प्रकार आणि बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. असंच एक मनोरंजन करणारं आणि लोकप्रिय होत असलेलं माध्यम म्हणजे “पॉडकास्ट”. हल्ली लोकांना पुस्तक घेऊन ते वाचत बसायला वेळ नसतो किंवा एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला वेळ नसतो परंतु एखादी कथा किंवा मुलाखत ते काम करता करता, किंवा कार चालवताना एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऐकू शकतात. यामुळे वेळेची बचत सुद्धा होते. हे एक असं माध्यम आहे ज्यावर तुम्ही स्वतःच्या आवाजात स्वतःला आवडणाऱ्या विषयावर बोलून ते रेकॉर्ड करून विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता. परंतु त्याआधी महत्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही काय आणि कसं बोलणार हे लिखित स्वरूपात मांडणं. म्हणजेच तुमच्या पॉडकास्ट ची स्क्रिप्ट लिहिणं. तर यामध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात, आधी ते समजून घेऊ.

१. Fiction (काल्पनिक) स्क्रिप्ट (How to write a fiction script in Marathi)

          तुम्ही जर एखादी कविता, कथा सादर करणार असाल किंवा एखाद्या कादंबरीचं अभिवाचन करत असाल तर ती झाली “Fiction स्क्रिप्ट”. म्हणजेच जी काल्पनिक आहे, अशी कोणतीही गोष्ट, कथा तुम्ही रोज वेगवेगळ्या भागांत सांगू शकता. 

२. Non-fiction(सत्य घटनेवर आधारित) स्क्रिप्ट (How to write a non fiction script in Marathi)

         यामध्ये मनोगत, एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या विषयावर मारलेल्या गप्पा किंवा मुलाखत, एखाद्या विषयावर आधारित माहीती सांगणं, एखाद्या सत्य घटनेबद्दल, बातमी बद्दल विवेचन वैगरे हे सगळं Non fiction स्क्रिप्ट मध्ये येतं. 

१. स्क्रिप्टचा विषय/ Content

       आता तुम्हाला रोजच्या एपिसोड करता लागणारी स्क्रिप्ट लिहिताना सुरूवातीला हे ठरवायचं आहे की तुम्ही पॉडकास्ट मध्ये ,त्या एपिसोड मध्ये काय विषय सादर करणार आहात. कविता सादर करणार आहात की लघू कथा, एखादी भयकथा कि कोणत्या कादंबरीचं अभिवाचन करणार आहात हे ठरवून त्यानुसार एका एपिसोड मध्ये किती बोलणार तेवढाच मजकूर स्क्रिप्ट मध्ये मांडावा. 

      किंवा जर तुम्ही सत्य घटनेवर आधारित काही सादर करणार आहात तर कशाबद्दल बोलणार आहात ते आधी ठरवावे. म्हणजेच तुमच्या पॉडकास्ट मधून श्रोत्यांना काय कंटेट आपण देणार आहोत हे आधी ठरवून त्यानुसार स्क्रिप्ट लिहायला घ्यावी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो विषय निवडला आहे त्याबद्दल लोकांना ऐकायला आवडेल की नाही आणि कशा पद्धतीने ते ऐकायला आवडेल याचा विचार करून स्क्रिप्ट लिहा. 

२. स्क्रिप्टची सुरवात कशी करावी?

      कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली आणि आकर्षक असणं खूप महत्वाचं असतं. तुमचा पॉडकास्ट लोकांनी संपूर्ण ऐकायला हवा, रोज ऐकायला हवा आणि त्याचसोबत तुम्हाला फॉलो करायला हवं असं जर वाटत असेल तर पहीले वीस सेकंद हे खूप महत्त्वाचे. या वीस सेकंदात तुम्ही तुमच्या भागाची सुरूवात कशी करताय, संपूर्ण एपिसोड का ऐकला पाहिजे हे कसं सांगताय त्यावर संपूर्ण एपिसोड अवलंबून असतो.

      म्हणजेच लोकांनी तुम्हाला पुढची तीस मिनिटे किंवा चाळीस मिनिटे का ऐकलं पाहिजे हे तुम्हाला पहिल्या वीस सेकंदात सांगायचं आहे. आणि प्रत्येक वेळी पहिल्यांदा ऐकणाऱ्या श्रोत्यांचा विचार करून ही स्क्रिप्ट लिहीली पाहिजे. एक लक्षात ठेवा, रोज कोणी ना कोणी तुम्हाला पहिल्यांदा ऐकत असतो, त्यामुळे रोजच्या एपिसोडची सुरूवात ही चांगलीच झाली पाहिजे. त्यामुळे या गोष्टी स्क्रिप्ट लिहिताना लक्षात ठेवा की आजचा एपिसोड बरेच जण पहिल्यांदा ऐकणार आहेत. 

३. स्क्रिप्टची वेळ

      स्क्रिप्ट लिहिताना हे डोक्यात असुद्या की तुमचा एपिसोड किती मिनिटांचा असणार आहे, त्यानुसार शब्दमर्यादा,स्क्रिप्ट असायला हवी. आता जर तुमचा एपिसोड २० मिनिटांचा असेल किंवा एक तासाचा तर त्यानुसार कथा, कादंबरी निवडायला हवी.

        किंवा जर तुम्ही कोणाची मुलाखत घेत आहात तर आधीच तुमच्या वेळेनुसार काय काय आणि किती प्रश्न विचारणार आहात हे ठरवून घ्या. थोडक्यात स्क्रिप्ट लिहिताना आपल्याला किती वेळ बोलायचं आहे त्यानुसार ती लिहा.

४. स्क्रिप्ट मध्ये सादरीकरण/ एपिसोड बद्दल माहिती कशी द्यावी ?

      ऑडिओ म्हटलं की नुसतं ऐकायचं असं नाही. तर तुम्ही जशी स्क्रिप्ट लिहीणार त्यानुसार ती वाचणार, सादर करणार. त्यामुळे तुम्हाला ती लिहितानाच ती अशी लिहायची आहे की तुमचं पॉडकास्ट ऐकताना श्रोत्यांना तुम्ही सांगत असलेले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. 

      उदाहरणार्थ, “रात्रीचे अकरा वाजून गेले होते. उमाला घरी जायला एकही रिक्षा मिळत नव्हती. नेमकं त्या रात्री इतका मुसळधार पाऊस पडत होता की छत्री असून तिचा काडीचाही उपयोग होत नव्हता. विजा चमकत होत्या, पावसामुळे रस्त्यावरचे दिवे बंद झाले होते. त्यामुळे सगळीकडे काळोख होता.” 

       आता ही स्क्रिप्ट ऐकताना डोळ्यासमोर रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात रिक्षा शोधणारी एक मुलगी श्रोत्यांना डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजेच तुम्ही जे सांगताय ते “Visualize” करता आलं पाहिजे. 

        आता जर तुम्ही एखादी मुलाखत घेणार असाल तर ते आधीच ही स्क्रिप्ट मध्ये नीट मांडायला हवं. तुम्ही कोणकोणते प्रश्न विचारणार आहात.? तुम्ही कशाबद्दल बोलणार आहात.? “प्रश्न उत्तरे” अशी मुलाखत घेणार की छान गप्पा मारता मारता सगळं जाणून घेणार. हे सगळं स्क्रिप्ट मध्ये लिहावं. यातही जर तुम्ही गप्पा मारत बोलणार असाल तर फक्त महत्वाचे मुद्दे, प्रश्न लिहू शकता. 

        जर तुम्ही एखाद्या सत्य घटनेवर पॉडकास्ट करत असाल तर ते सुद्धा शब्द न शब्द तपासून खात्री करून मग ते स्क्रिप्ट मध्ये लिहावं. अशा वेळी तुम्ही जे बोलणार ते जसेच्या तसे शब्द न शब्द लिहून काढा जेणेकरून चुकीची माहिती दिली जाणार नाही. 

५. Mid Roll Break / Music Transition

      जर तुमचा एपिसोड खूप वेळ चालणार असेल तर मधे एखादा ब्रेक घेऊ शकता. हे करावचं असं नाही परंतु त्या ब्रेक मध्ये तुम्ही एखादी जाहिरात करू शकता. जर पॉडकास्ट नवीन असेल आणि जाहिराती येत नसतील तर एखादं म्युझिक ट्रान्झिशन टाकू शकता. आता हे तुमच्या स्क्रिप्ट च्या गरजेनुसार असावं. ते केवळ पाच सेकंदाचं असावं. परंतु ते अशा पॉईंट, ट्विस्ट ला टाकावं की श्रोत्यांची उत्कंठा वाढवून पुढे काय हे ऐकण्यासाठी त्यांनी ते म्युझिक ऐकून पूढे पॉडकास्ट ऐकला पाहिजे. तर स्क्रिप्ट लिहितानाच हे लक्षात ठेवून त्यानुसार स्क्रिप्ट लिहावी.

६. Keywords

      जर तुम्हाला तुमचं चॅनल, तुमचा पॉडकास्ट ग्रो करायचा असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे असं वाटत असेल तर स्क्रिप्ट लिहितानाच असे Keywords वापरावे की तुमच्या विषयासंदर्भात ते जास्त वापरले जातात. म्हणजे तुमचा विषय आहे त्याबद्दल लोकं सर्च करताना कोणते शब्द सर्च करतात ते शब्द जास्त वापरा. स्क्रिप्ट लिहिताना हे लक्षात ठेवून तसे keywords वापरा. (How to write a script in Marathi)

७. स्क्रिप्टचे शिर्षक

      आता तुमच्या शोचं, पॉडकास्ट चं शिर्षक हे तर महत्वाचं आहेच. ते आकर्षक असावं परंतु त्यासोबतच तुमच्या प्रत्येक एपिसोडचं शिर्षक हे सुद्धा छान साजेस असावं. त्या एपिसोड मध्ये तुम्ही कशाबद्दल बोलणार आहात हे कमीत कमी शब्दांत सांगणारं असावं. म्हणजे कमी शब्दांत खूप काही सांगणारं असावं.

      आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रिप्ट लिहिताना लक्षात ठेवायच्या आहेत. मुख्य म्हणजे लोकांना काय ऐकायला आवडेल त्याचा अभ्यास करून विषय निवडा, तुमच्या पॉडकास्ट मधून जी माहिती देणार आहात ती किती उपयुक्त आहे हे सुद्धा विचारात घेऊन त्यानुसार स्क्रिप्ट लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही करत असलेल्या प्रयत्नां मध्ये सातत्य राखणं महत्त्वाचं आहे. हे सगळं केलं तर तुम्ही एक यशस्वी पॉडकास्ट चालवू शकता. तुमच्या पॉडकास्ट प्रवासासाठी “लेखक मित्र” कडून तुम्हाला खूप शुभेच्छा. 

      बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजून अशा कोणत्या प्रकारचे लेख, माहिती वाचायला आवडेल तेही सांगा. असे अजून माहितीपूर्ण लेख वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला नक्की भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!

धन्यवाद!

3 thoughts on “स्क्रिप्ट कशी लिहावी? l How to write a script in Marathi”

  1. वैशाली देव

    खूपच उपयुक्त माहिती नेमक्या शब्दात सांगितली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top