Mutual fund information in Marathi : शेअर बाजारात गेल्या एक-दोन महिन्यात रोज नवीन विक्रमांची नोंद होत आहे. गुंतवणूकदार भल्या मोठ्या संख्येने शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहे. पण इच्छा असूनही अपुरा वेळ , अपुरी माहिती याच्या आधारावर सुरुवात कशी , कुठे करावी हे कळत नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेता शेअर्स की म्युच्युअल फंड यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ होताना दिसतो. त्यामुळे आज या लेखामधून अगदी सविस्तरपणे म्युच्युअल फंड बद्दल माहिती घेऊया.

आता या म्युच्युअल फंड चे प्रकार किती आणि कोणते ? तुमचे पैसे कुठे आणि कसे गुंतवले जातात ? कोण गुंतवणूक करतो ? किती पैसे भरून सुरुवात होऊ शकते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघूया .
- अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकीचा एक पर्याय !
- तुमच्या कडून घेतलेल्या पैशाची प्रत्यक्षपणे शेअर बाजारात गुंतवणूक न करता शेअर बाजारातील कंपण्यामध्ये म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणूक केली जाते. याद्वारे तुम्ही कमी जोखीम पत्करून तुमचे पैसे गुंतवू शकता.
- म्युच्युअल फंड चे प्रकार : ( Types of Mutual fund in Marathi )
म्युच्युअल फंड दोन विभागात विभागला आहे . कसे ते बघू.
विभाग 1 ( गुंतवणूक कधी आणि कशी केली जाईल याचे उत्तर या प्रकारे ) –
अ. ओपन एंडेड फंड
ब. क्लोज एंडेड फंड
क. एक्सचेंज ट्रेडेड फंड
विभाग 2 ( गुंतवणूक करताना तुम्हाला सोयीस्कर वाटणारा पर्याय या प्रकारे ) –
अ. इक्विटी फंड
ब. डेट फंड
क. हायब्रीड फंड
ड. मनी मार्केट
इ . गोल्ड फंड अर्थात सोने
विभाग 1 ( गुंतवणूक कधी आणि कशी केली जाईल याचे उत्तर या प्रकारे ) –
अ. ओपन एंडेड फंड : या प्रकारच्या फंड मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही कधी पण गुंतवणूक करू शकता , यात विशिष्ट कालावधी आणि खरेदीची मर्यादा नसते.
ब. क्लोज एंडेड फंड : या प्रकारच्या फंड मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला फंड ने नमूद केलेल्या विशिष्ट कालावधी मध्ये आणि ठरवून दिलेल्या किमतीसाठी खरेदीची मर्यादा असते.
क. एक्सचेंज ट्रेडेड फंड : या मध्ये ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड पद्धतीने अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक केली जाते , विशिष्ट कालावधी च्या दरम्यान खरेदी साठी वेळ दिला जातो त्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करू शकता त्या नंतर तो फंड बंद होतो.
विभाग 2 ( गुंतवणूक करताना तुम्हाला सोयीस्कर वाटणारा पर्याय या प्रकारे ) –
अ. इक्विटी फंड :
हा अतिशय लोकप्रिय फंड आहे. या प्रकारच्या फंड मध्ये शेअर बाजारातील कंपन्या मध्ये पैशाची गुंतवणूक केली जाते , शेअर बाजाराच्या चढ उताराप्रमाणे फंडचे मूल्य कमी जास्त होत असते. कारण तुमच्या पैशातील जवळपास 65 टक्के रक्कम ही कंपनीच्या समभागांमध्ये टाकली जाते. त्यामुळे यात जोखीम अधिक मनाली जाते आणि उरलेली रक्कम सोने किंवा सरकारी रोखे या मध्ये गुंतवली जाते.
ब. डेट फंड :
या प्रकारच्या फंड मध्ये तुमचे पैसे ठराविक परतावा देणाऱ्या सरकारी रोखे, खाजगी कंपनी रोखे यात गुंतवले जातात. डेट फंड मध्ये इक्विटी फंड च्या तुलनेने कमी जोखीम असते. अर्थात जोखीम कमी त्यामुळे परतावा देखील इक्विटी फंड च्या तुलनेने कमी असतो.
क. हायब्रीड फंड :
नावाप्रमाणेच या फंड मध्ये इक्विटी फंड आणि डेट फंड अशा दोन्ही स्वरूपात पैसे गुंतवले जातात. मात्र इक्विटी फंड मध्ये किती आणि डेट फंड मध्ये किती गुंतवणूक करणार हे म्युच्युअल फंड सुविधा देणारी संस्था ठरवत असते.
ड. मनी मार्केट फंड :
या फंड मध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. अगदी ओवरनाइट म्हणजे एक रात्रीसाठी ते एक वर्ष इतका कमी कालावधी यासाठी असू शकतो. यात ट्रेजरी बिल , व्यावसायिक कागदपत्रे यात गुंतवणूक केली जाते.
इ . गोल्ड फंड :
नावाप्रमाणे या मध्ये सोने अर्थात गोल्ड मध्ये गुंतवणूक केली जाते. यात गोल्ड मायनिंग कंपनी किंवा गोल्ड मध्ये गुंतवणूक केली जाते.
आता या माहितीवरून गुंतवणूकदार ठरवतो की तो गुंतवणूक करताना किती जोखीम स्वीकारू शकतो आणि किती कालावधी साठी पैसे गुंतवून ठेवू शकतो. या गरजेप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले जातात.
- विभाग 2 मध्ये नमूद केलेल्या फंडचे अजून वर्गीकरण होऊन मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे अनेक प्रकारचे म्युच्युअल फंडचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत .
- तुमचे पैसे तयार आहे , तुमची गुंतवणूक कशात करायची हे तुम्हाला समजले असेल. पण ही गुंतवणूक आपल्यासाठी करणार कोण ?
तर अॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच मालमत्ता व्यवस्थापन कंपनी तुमच्यासाठी विविध प्रकारचे म्युच्युअल फंड बाजारात आणत असते. या कंपनीमध्ये प्रत्येक फंड व्यवस्थापनासाठी फंड मॅनेजर नेमून दिलेला असतो.
हा फंड मॅनेजर कंपनीच्या नियमाप्रमाणे आणि शेअर मार्केट तसेच इतर गुंतवणुकीच्या माध्यमांचा बारकाईने अभ्यास करून धोरण ठरवत असतो . त्याप्रमाणे ‘अबक’ या ठिकाणी इतकी गुंतवणूक करायची , ‘अबक 1’ या ठिकाणी इतकी गुंतवणूक करायची याप्रमाणे ठरवत असतो.
उदाहरण : मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे म्युच्युअल फंड जसे की
- HDFC म्युच्युअल फंड
- SBI म्युच्युअल फंड
- ICICI म्युच्युअल फंड
- म्युच्युअल फंड चे कामकाज कसे चालते?
- म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले पैसे फंड मध्ये टाकायचे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या फंड ची नेट अॅसेट वॅल्यू ( nav ) म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य किती आहे हे बघावे लागते.
- nav मुळे फंड चे प्रती यूनिट मूल्य आपल्याला मिळते.
उदाहरण :
अबक या फंड ची एक यूनिट चे मूल्य म्हणजे nav – Rs.10 आहे . मी या फंड मध्ये Rs.5000 गुंतवण्यासाठी दिले . तर माझ्याकडे 500 यूनिट जमा होतील.आणि जसे जसे माझ्या फंड चा nav वाढेल तसे तसे माझ्या गुंतवणुकीचे मूल्य वाढेल.म्हणजे अबक या फंड साठी nav Rs.12 झाला तर माझ्या 500 यूनिट चे मूल्य 500*12 = 6000 होईल. याउलट nav Rs.9 झाला तर मूल्य 500*9 = 4500 होईल.
- शुल्क आकारणी :
- मालमत्ता व्यवस्थापन कंपनी गुंतवणूकदाराला सेवा सुविधा देण्यासाठी काही शुल्क आकारत असते.
- एन्ट्री लोड आणि एक्झिट लोड : म्युच्युअल फंड खरेदी करताना जे शुल्क घेतले जाते ते एन्ट्री लोड आणि
- म्युच्युअल फंड विकताना जे शुल्क घेतले जाते ते एक्झिट लोड म्हटले जाते. तुम्ही जे पैसे गुंतवणुकीसाठी देतात त्या मधून ही रक्कम काढून घेतली जाते.
- प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी चे शुल्क हे वेगवेगळे असू शकतात.
- साधारणपणे एक्झिट लोड 1% तो 2% इतका असू शकतो , यातही तुम्ही खरेदी केलेले यूनिट जर विशिष्ट कालावधी आधी विकला तर तुम्हाला त्या नुसार शुल्क आकारणी होऊ शकते.
- कमीत कमी किती रुपयापासून गुंतवणूक करता येऊ शकते?
- कमीत कमी Rs.100 रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. अर्थात पुन्हा प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी चे नियम यासाठी विभिन्न असू शकतात.
- पैसे गुंतवणुकीचे उपलब्ध पर्याय-
- SIP म्हणजे अनेकांसाठी ओळखीचा असा सिप / एस आय पी
- लम्प सम
- एस आय पी ( SIP ) आणि लम्प सम :
- एस आय पी द्वारे पैसे गुंतवणुकीकडे लोक कमालीचे आकर्षित होत आहे याचे कारण म्हणजे ठराविक तारखेला ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते. ही रक्कम गुंतवणूकदार स्वतः ठरवत असतो.
- या पद्धतीमुळे शेअर मार्केट मधील चढ उताराचा फायदा गुंतवणूकदाराला होत असतो.
- अगदी Rs.100 पासून ही सुरुवात होऊ शकते तेव्हा एस आय पी कडे वाढणारा ओढा साहजिक आहे. आजची छोटी सुरुवात उद्यासाठी मोठा फायदा घेऊन येऊ शकते.
लम्प सम :
- याद्वारे तुम्ही एकदाच मोठी रक्कम टाकून म्युच्युअल फंड चे यूनिट खरेदी करू शकतात.
- म्युच्युअल फंड विषयाचा विस्तार पाहता भाग 2 हा भाग लवकरच घेऊन येत आहे.
त्यात म्युच्युअल फंड चे फायदे – तोटे , विभाग 2 मध्ये नमूद केलेले महत्वाच्या म्युच्युअल फंडचे अजून काही वर्गीकरण करून मालमत्ता व्यवस्थापन कंपनी अनेक पर्याय आणि योजना सध्या बाजारात उपलब्ध आहे. याविषयी जाणून घेऊ.तसेच मागच्या काही वर्षात म्युच्युअल फंड ने दिलेले परतावे ,काही उत्कृष्ट परतावे दिलेले फंड बघूया .
हा लेख कसा वाटला ते आवर्जून कळवा. नियमित माहितीपूर्ण असे लेख आणि उत्तम कथा वाचण्यासाठी वेबसाईट नक्की भेट द्या.
धन्यवाद !
लेखिका – सौ. वैशाली जोशी पाठक ,पुणे
खूपच सुंदर माहिती
धन्यवाद.
Very helpful…
Thank you